हिना पांचाळच्या ‘दिलखेचक अदा’ तुम्ही पाहिल्यात का

हिना पांचाळच्या ‘दिलखेचक अदा’ तुम्ही पाहिल्यात का

‘बिग बॉस’ मराठी सीझन 2 सध्या खूपच गाजत आहे. तर यामध्ये सहभागी असलेले बऱ्याच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यामध्ये एक नाव घेण्यासारखं म्हणजे हिना पांचाळ. हिना पांचाळला घरात येऊन बरेच आठवडे झाले असले तरीही तिच्या खेळामुळे ती या घरामध्ये टिकून आहे. हिनाने बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती चर्चेत आहे ते तिच्या दिसण्यावरून. बॉलीवूडची ‘दिवा’ मलायका अरोरा हिच्यासारखी हुबेहूब हिना दिसते. त्यामुळे तिला मलायकाची कॉपीदेखील म्हटलं जातं. पण आता बिग बॉसमध्ये येऊन हिनाने आपली अशी एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. हिना बिग बॉसमध्ये जाण्याआधीही इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह होती. ती आपले बरेच फोटो शेअर करायची. पण आता हिनाचे अनेक चाहते झाले असून तिचे फॉलोअर्सही वाढले आहेत. आम्ही तुमच्यासाठी हिनाचे काही खास फोटो घेऊन आलो आहोत. 

BBM2 : दिवसेंदिवस वाढतेय शिवानीची लोकप्रियता

हिनाच्या अदा मलायकासारख्या

Instagram

हिना पांचाळचे फोटो पाहिले असता तिचं सौंदर्य आणि अदा या मलायका अरोरासारख्याच दिसून येतात. जर नीट निरखून पाहिलं नाही तर पटकन हिनाला मलायका असल्याचं म्हटलं जातं. पण हिनाने स्वतंत्र ओळखही निर्माण केली आहे. दाक्षिणात्य चित्रपटात तिने अनेक आयटम साँग्जवर डान्स केला आहे. हिना खरं तर गुजराती आहे पण तरीही ती चांगलं मराठी बोलते. 

हिनाचं बालपण गेलं ठाण्यात

Instagram

हिना गुजराती असली तरीही तिचं बालपण हे ठाण्यात गेलं आहे. त्यामुळे तिला मराठी समजतं आणि बोलता येतं. तिच्या शाळेत सगळेच मराठी बोलत असल्याने तिला मराठी यायला लागलं. हिनाने बिग बॉसमध्ये सुरुवातीला सांगितलं की, ती आधी टॉमबॉय होती. पण डान्स करायला लागल्यानंतर तिने हळूहळू आपल्यात बदल घडवून आणला. तिने बऱ्याचदा बाईकही चालवली असून तिचे अपघात झाल्याचंही तिने सांगितलं. इतकंच नाही तिने अजिबातच कोणत्याही प्रकारचं डान्सचं प्रशिक्षण घेतलेलं नाही. बिल्डिंगमध्ये कार्यक्रमांना डान्स करत ती डान्स शिकली. त्यानंतर तिने गणेश आचार्यचा डान्स ग्रुप जॉईन केला. ती आधी त्या ग्रुपमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करायची. डान्सिंग ही तिची आवड होती. पण त्यानंतर ते तिचं पॅशन बनलं आणि मग प्रोफेशन झाल्याचंही तिने याआधी बिग बॉसमध्ये सांगितलं. 

#BBM2update : टास्कसाठी नाही करणार विश्वासघात, शिव होतोय भावनिक

हिनाला व्हायचं होतं महिला उद्योजक

instagram

हिनाला लहानपणापासून महिला उद्योजक व्हायचं होतं. पण तिच्या घरची परिस्थिती खराब झाली. तिच्या वडिलांचा बिझनेस बंद झाला. त्यानंतर ती या क्षेत्रात आली. अचानक तिच्या खांद्यावर घरची जबाबदारी आली. पण तिने न डगमगता ती जबाबदारी पेलली आणि त्यानंतर आपल्या भावाबहिणीचीही जबाबदारी पेलली. आता ती संपूर्ण घर सांभाळत असून तिने या इंडस्ट्रीमध्ये एक जागा निर्माण केली आहे असं म्हणावं लागेल. ती बिग बॉसमध्ये कितीही भांडत असली तरीही तिने तिची हळवी बाजूही बऱ्याचदा दाखवून दिली आहे. त्यामुळेच प्रत्येक नॉमिनेशननंतरही हिनाला तिचे चाहते आणि प्रेक्षक बिग बॉसमध्ये सेव्ह करत असल्याचं दिसून येत आहे. हिना चुका करत असली तरीही पुन्हा त्यातून शिकून ती नव्याने रोज उभी राहत असल्याचंही तिच्या चाहत्यांना दिसत आहे.

#BBM2 : बिग बॉसच्या आदेशानंतर शिवानी व्हावं लागलं शांत