हिना पांचाळचा गोव्यामध्ये हॉट 'हिप्स डोन्ट लाय' डान्स

हिना पांचाळचा गोव्यामध्ये हॉट 'हिप्स डोन्ट लाय' डान्स

बिग बॉस मराठीतील सीझन 2 खऱ्या अर्थाने गाजवला तो वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या हिनाने. आपल्या डान्सच्या मनमोहक अदा असोत वा खेळामध्ये मुलांना टक्कर देणं असो हिनाने अगदी बाजी लावत आपलं नाव निर्माण केलं. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतरही हिना आपल्या मादक अदांनी सर्वांना घायाळ करते आहे. हिना सध्या गोव्यामध्ये असून तिने आपल्या सोशल मीडियावर एक हॉट व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये 'हिप्स डोन्ट लाय' या गाण्यावर हिना डान्स करत असून हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल व्हायला सुरूवात झाली. हिनाने हॉट काळ्या बिकिनीमध्ये डान्स करत चाहत्यांना आपल्या मादक अदांनी घायाळ केलं असल्याचं दिसून आलं आहे. 

 

हिना नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

हिना पांचाळ नेहमीच आपल्या अकाऊंटवरून आपल्या आयुष्यातील घडामोडी पोस्ट करत असते. सध्या हिना गोव्यामध्ये असून तिने तिथल्या वँटागोर बीचवरून एक डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे. काळ्या बिकिनीमधील हा व्हिडिओ सध्या  धुमाकूळ घालत आहे. हिना अतिशय बोल्ड असून तिच्या कॅप्शनही नेहमी बोल्ड असतात. तसाच हिनाचा डान्समधील इंटरेस्ट पाहता ती नेहमीच आपले वेगवेगळे डान्सही सोशल मीडियावर पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वीच तिने सालसा करताना व्हिडिओ पोस्ट केला होता त्यासाठीदेखील तिचं अनेक चाहत्यांनी कौतुक केलं होतं. आता पुन्हा असा बिकिनीमधला हॉट डान्स व्हिडिओ हिनाने शेअर केला आहे.  काही सेकंदाचा हा व्हिडिओ असला तरीही तिचे चाहते मात्र हिनाला पाहून नक्कीच आनंदी झाले आहेत. फारच कमी वेळात या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून येत आहे. 

#BBM2 ही दोस्ती तुटायची नाय….

हिना, शिव आणि वीणाचं त्रिकूट

बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतरही या त्रिकूटाने आपली मैत्री कायम ठेवली आहे. वास्तविक सध्या शिव आणि वीणा काश्मीर आणि अमृतसरचा दौरा करत असून हिना मात्र गोव्यात मजा करत आहे. हिना नेहमीच आपल्या बोल्ड बोलण्यासाठी आणि अदांसाठी प्रसिद्धी मिळवत आहे. या व्हिडिओनंतरही तिला विविध प्रतिक्रिया विविध स्तरातून मिळत आहेत. पण हिना मात्र आपला डान्स एन्जॉय करत कोणाचाही जास्त विचार न करता आपल्याला हवे तसे व्हिडिओ पोस्ट करत असते. तसंच तिच्या चाहत्यांनाही तिचा असा अवतार पाहायला नक्कीच आवडतो. हिप्स डोन्ट लाय म्हणत हिनाने पुन्हा एकदा आपल्या अदा प्रेक्षकांना दाखवून दिल्या आहेत. तसंच तिला यासाठी अनेक चाहत्यांकडून प्रतिक्रियादेखील येत आहेत. 

हिना पांचाळच्या ‘दिलखेचक अदा’ तुम्ही पाहिल्यात का

हिनाचं फोटोशूटही हॉट

हिना नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रसिद्धीझोतात राहते. काही दिवसांपूर्वीच हिनाने केलेल्या फोटोशूटमध्येही ती अतिशय हॉट दिसत आहे. हिना नुकतीच पावनी पांडेच्या बोअर हो गयी या अल्बममध्ये दिसली होती. तिचा हा अल्बमदेखील तिच्या चाहत्यांना आवडला होता. यामध्ये पूर्ण पंजाबी लग्न झालेल्या मुलीच्या अवतारात हिना दिसली. तिचं हे गाणंही सध्या गाजत आहे. याप्रमाणेच हिनाकडे अजूनही काही डान्सचे नवे प्रोजेक्ट्स असल्याचं म्हटलं जात आहे. लवकरच तिच्या चाहत्यांना हिना वेगळ्या गाण्यांमध्ये दिसून येईल असंही सांगितलं जात आहे. शिवाय बाकीच्या अपडेट्स हिना सोशल मीडियावर सांगतच असते. त्यामुळे तिचे चाहतेही तिच्याबरोबर जोडलेले राहतात यात काही शंका नाही.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.