अबब! हेमामालिनीची संपत्ती ऐकून तुम्हीही व्हाल अवाक...

अबब! हेमामालिनीची संपत्ती ऐकून तुम्हीही व्हाल अवाक...

बऱ्याचशी जुन्या नट्यांची संपत्ती नक्की किती आहे असा प्रश्न बऱ्याच जणांंना उद्भवतो. त्यापैकी रेखा, जया बच्चन,  हेमामालिनी यांची संपत्ती तर खूपच जास्त आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसांचा विचारही पोहचू शकणार नाही इतकी संपत्ती या अभिनेत्रींकडे आहे.  त्यातही बॉलीवूडची ड्रीमगर्ल हेमामालिनीची संपत्ती ऐकून तरी तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांची लव्ह स्टोरी तर प्रसिद्धच आहे. 1980 मध्ये या दोघांनी लग्न केलं. हेमामालिनीशी लग्न करण्यासाठी धर्मेंद्रने आपल्या पहिल्या बायकोला सोडलं इतकंच नाही तर त्याने मुस्लिम धर्म स्वीकारून हेमामालिनीशी लग्न केलं कारण हिंदू धर्मानुसार दोन बायको करणं शक्य नव्हतं. हे सर्व पुन्हा एकदा सांगायचं कारण इतकंच की हेमामालिनी मोठ्या आणि लहान पडद्यापासून दूर असली तरीही पुन्हा एखदा चर्चेत आली आहे ते तिच्या संपत्तीसाठी. हेमामालिनी भारतीय जनता पक्षाची खासदार असून दोन वेळा निवडून आली आहे. 2019 पर्यंत हेमामालिनीकडे असलेल्या संंपत्तीचा आकडा हा 101 कोटी इतका आहे. आली ना तुम्हाला पण चक्कर? होय हेमामालिनी ही 101 कोटींची मालकीण असून 2014 च्या तुलनेत तिची संपत्ती ही 34 कोटी रूपयांनी वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे.  या सगळ्यात बंगला, तिचे दागिने, रोख रक्कम, शेअर्स, मुदती ठेवी या सगळ्याचा समावेश आहे. ही माहिती इतर कोणीही दिली नसून तिच्या प्रतिज्ञापत्रातूनच मिळाली आहे. तिने निवडणुकीसाठी उभे राहताना आपली संपत्ती सांगितली तेव्हा तिने या सगळ्याचा उल्लेख केला होता. 

या बॉलीवूड कलाकारांनी चित्रपटातील भूमिकेसाठी स्वतःच्या वजनात केले असे बदल

हेमामालिने कमावले 5 वर्षात इतके रूपये

प्रतिज्ञापत्रात हेमामालिनीने सांगितल्याप्रमाणे तिच्याकडे 2014-15 या वर्षात साधारण 3.12 कोटी इतके रूपये होते. तर 2015 - 16 मध्ये तिच्याकडे असलेली कमाई ही 1.19 इतकी होती. त्यानंतर एक वर्षात या संपत्तीची वाढ होऊन साधारण ही संपत्ती झाली होती 4.30 कोटी. तर 2014 - 2019 या पाच वर्षांच्या काळामध्ये तिची कमाई 9.87 कोटी दरम्यान झाली असल्याचंंही तिने सांगितले होते. याशिवाय हेमामालिनी यांच्याकडे दोन महागड्या गाड्या आहेत ज्यापैकी एक आहे मर्सिडीज आणि या गाडीची किंमत आहे 33.62 लाख. तर दुसरी कार आहे टोयोटा जी तिने साधारण पंधरा वर्षांपूर्वी 4.74 लाखांना विकत घेतली होती. ही सर्व संपत्ती मिळून या पाच वर्षामध्ये तिच्या संपत्तीमध्ये 34 कोटी रूपयांनी वाढ झाली असल्याचेही तिने सांगितले आहे.

चेन्नईत अक्षय कुमारच्या मदतीमुळे उभी राहणार पहिली 'ट्रान्सजेंडर' इमारत

रेखा आणि जया बच्चन यादेखील करोडोंच्या मालकीण

हेमामालिनीप्रमाणेच जया बच्चनदेखील खासदार आहेत आणि रेखाही खासदार आहेत. या दोघींही करोडोंच्या मालकीण असल्याचे सांगण्यात आले आहे. इतकेच नाही मागच्या निवडणुकीच्या वेळी जया बच्चन यांची संपत्तीदेखील साधारण 1 हजार कोटी इतकी दाखवण्यात आली होती. या अभिनेत्रीची संपत्ती इतकी आहे  की ते ऐकूनदेखील तुम्ही अवाक व्हाल. ही संपत्ती अर्ज दाखल करताना दाखवावी लागते आणि या अभिनेत्रींनी आपली इतकी संपत्ती या अर्जाद्वारे दाखवली होती. सामान्य माणसाचे तर ही संपत्ती ऐकूनही डोळे पांढरे होतील इतकी ही संपत्ती आहे. 

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ‘मंगली’ ला मराठीचे वेध

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.