सेलिब्रेटीज सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असतात. सध्या अनेक सेलिब्रेटीज त्यांचे बालपणीचे अथवा करिअरच्या पदार्पणाचे फोटो शेअर करताना दिसतात. या माध्यमातून त्यांना त्यांच्या आयुष्यातील जुन्या आठवणी जागवता येतात शिवाय चाहत्यांसोबत कनेक्टही होता येतं. सोशल मीडियावर नवीन प्रमाणेच अनेक जुने आणि दिग्गज सेलिब्रेटीदेखील स्वतःला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत असतात. आजही सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ड्रिमगर्ल आणि बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री असलेल्या हेमामालिनी यांनी सोशल मीडियावर त्यांच्या जुन्या आठवणींना असाच उजाळा दिला आहे.
हेमामालिनी यांचा दिव्य अवतार –
हेमामालिनी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक जुना फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये हेमामालिनी चक्क लक्ष्मी देवीच्या अवतारात दिसत आहेत. त्यांनी या फोटोसाठी महालक्ष्मी देवीचा गेटअप आणि आर्शीवाद मुद्रेत बसलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत कॅप्शन दिली आहे की, “मी हा फोटो खूप वर्षापासून शोधत होते. हे फोटोशूट एका तामिळ मासिकासाठी करण्यात आलं होतं (आता नाव मात्र आठवत नाही). पण मला चांगलं आठवतं की, एव्हिएम स्टुडिओमध्ये मी शूटिंग केलं होतं. राज कपूर यांच्यासोबत सपनो के सौजागरमध्ये पदार्पण करण्याआधी हे शूट केलं होतं. त्यावेळी मी फक्त चौदा ते पंधरा वयाची असेन. मी हा फोटो माझे आत्मचरित्र बियॉन्ड दी ड्रिमगर्लमध्ये वापरणार होती जे राम कमल मुखर्जी यांनी लिहीलं आहे. पण दुःखाची गोष्ट ही की त्यावेळी मला हा फोटो सापडला नाही. पण शेवटी अथक प्रयत्नाने मला हा फोटो आज सापडला आहे ज्यामुळे मी खूप खूष झाली आहे. म्हणूनच मी तो तुमच्यासोबत शेअर करत आहे” हेमामालिनी या फोटोसोबत अशी भावनिक पोस्ट शेअर केली आहे की त्यातून या फोटोचं त्यांच्या जीवनात असलेलं महत्त्व नक्कीच जाणवत आहे. कारण या फोटोतूनच त्यांच्या बॉलीवूड करिअरला सुरूवात झाली होती.
ड्रिमगर्लच्या बॉलीवूड प्रवासाला अशी झाली होती सुरूवात
हेमामालिनी यांनी 1968 मध्ये सपनो के सौदागर या चित्रपटातून त्यांच्या बॉलीवूड करिअरला सुरूवात केली होती. पण त्यांच्या बॉलीवूड प्रवासाला सुरुवात मात्र त्यांनी शेअर केलेल्या या फोटोपासून झाली होती. या चित्रपटानंतर हेमामालिनी यांची बॉलीवूड घोडदौड अतिशय वेगाने सुरू झाली. त्यांनी शोले, सीता और गीता, सत्ते पे सत्ता, राजाजानी, ड्रिमगर्ल अशा अनेक चित्रपटात काम केलं. ज्यानंतर पुढे त्यांना बॉलीवूडमध्ये ड्रिमगर्ल या नावानेच ओळखण्यात येऊ लागलं. आज अभिनेत्री या लेखिका, दिग्दर्शिका, नृत्यांगणा आणि राजकीय नेत्यादेखील आहेत. 2003 साली त्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत बागबान या चित्रपटात त्या शेवटच्या दिसल्या होत्या. शिवाय वयाच्या बहात्तराव्या वर्षीदेखील त्यांच्या सौंदर्यात काहीच कमी झालेली नाही. त्यांची मुलगी इशा देओल आणि अहाना देओल यांच्यासोबत बऱ्याचदा दिसतात. शिवाय या वयातही त्यांची नृत्यसाधना अविरत सुरू आहे. या वर्षी गणेशोत्सवामध्ये त्यांनी त्यांची मुलगी इशासोबत टेलिव्हिजनवर नृत्यदेखील सादर केले होते.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
इन्स्टाग्रामवर दीपिकालाही मागे टाकलं श्रद्धा कपूरने, सर्वात जास्त आहेत फॉलोव्हर्स
कश्मीरा शाहचं हॉट फोटोशूट पाहुन क्लिनबोल्ड झाला कृष्णा अभिषेक
सोनम कपूरने हॅलोविनसाठी केला मर्लिन मुनरो लुक, सोशल मीडियावर झाली ट्रोल