अभिनेत्री हेमामालिनी आहे अब्जपती, पाच वर्षांत कोट्यवधींचा झालाय नफा

अभिनेत्री हेमामालिनी आहे अब्जपती, पाच वर्षांत कोट्यवधींचा झालाय नफा

लोकसभा निवडणुकीची धूम सर्वत्र सुरू झाली आहे. काही बॉलीवूड सेलिब्रेटीदेखील निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत. उत्तरप्रदेशच्या मथुरा लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री हेमामालिनी पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहे. यासाठी त्यांनी त्यांच्या संपत्तीचा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार हेमाामालिनी अब्जपती असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या पाच वर्षात 34 कोटी 46 लाखांचा नफा त्यांना झाला आहे. असं असलं तरी हेमामालिनी यांचे पती अभिनेता धर्मेंद्र यांची संपत्ती मात्र 12 कोटी 30 लाखांची वाढ झाली आहे. आयकर विभागाला दाखल करण्यात आलेल्या अहवालानुसार दोघांच्या संपत्तीमध्ये गेल्या पाच वर्षांत अंदाजे 10-10 कोटींची वाढ झाल्याचे आढळून आले आहे. हेमामालिनी यांनी 2013-14 मध्ये 15 लाख 93 हजारांची कमाई केली होती. 2014-15 मध्ये त्यांनी 3 कोटी 12 लाख रूपये कमावले, 2015-16 मध्ये 1 कोटी 9 लाख रूपये, 2016-17 मध्ये 4 कोटी 30 लाख 14 हजार तर मागील वर्षी हेमामालिनी यांनी तब्बल 1 कोटी 19 लाख 50 हजारांची कमाई केली आहे. अशा प्रकारे त्यानी गेल्या पाच वर्षात कोटींचा फायदा कमावला आहे.


hema malini


हेमामालिनी यांची एकूण संपत्ती


पाच वर्षात कमावलेल्या या संपत्ती शिवाय हेमामालिनी यांच्याकडे दोन आलिशान कार आहेत. त्यापैकी एक मर्सिडीज कार असून त्या कारची किंमत 33 लाख 62 हजार 654 रू. आहे जी हेमामालिनी यांनी 2011 मध्ये खरेदी केली होती. शिवाय दुसरी कार टोयाटो कंपनीची असून तिची किंमत पावणे पाच लाख रू. आहे जी त्यांनी 2005 मध्ये खरेदी केली आहे. याशिवाय धर्मेंद यांना जुन्या गाड्यादेखील आवडत असल्यामुळे त्यांनी त्यांची जुनी रेंज रोव्हर, मारूती आणि एक मोटर सायकल अजूनही तशाच ठेवल्या आहेत. या गाड्या जुन्या असल्यामुळे त्या सद्यस्थितीत वापरल्या जात नसून तशाच पडून आहेत. या व्यतिरिक्त दागदागिने, रोख, एफ.डी, शेअर्स, बंगले अशी संपत्ती गृहीत धरल्यास हेमामालिनी यांची संपत्ती एक अब्ज एक कोटी 95 लाख 300 रू च्यावर असल्याचा अंदाज आहे.


hemamalini 2


हेमामालिनी यांची ही शेवटची निवडणूक


हेमामालिनी यांनी  ही त्यांची शेवटची निवडणूक असून भविष्यात त्या यानंतर कोणतीही निवडणूक लढविणार नसल्याचं म्हटलं जात आहे.यानंतर तरूण उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठी सहभाग घ्यावा अशी त्यांची ईच्छा आहे. मथुरेच्या जनतेला सर्व चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात असे त्यांचे स्वप्न आहे. मात्र मागील पाच वर्षांत अनेक गोष्टी करण्याच्या राहून गेल्याची खंत त्यांना वाटत आहे. उर्वरित विकासकामे पुढील पाच वर्षात पूर्ण करण्यासाठी  त्या निवडणुकीच्या मैदानात पुन्हा उतरत आहेत. हेमामालिनी यांचे शालेय शिक्षण दहावीपर्यंत झाले असून त्यांनी नृत्यकलेचे शास्त्रीय शिक्षण घेतले आहे. हेमामालिनी यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदान वाखाण्याजोगे आहे. त्यांनी अनेक सूपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. हेमामालिनी यांना त्यांच्या अभिनय कारकिर्दीसाठी पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 2014 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकण्यापूर्वी त्यांनी 2003 ते 2009 आणि 2011- 2012 या कार्यकालासाठी लोकसभा सदस्य म्हणून कार्य केले आहे. 2002- 2003 मध्ये त्यांनी राष्ट्रीय चित्रपट विकास विभागाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.


hemamalini 1


पुन्हा एकदा धर्मेंद्र-राखीच्या 'पल-पल दिल के पास' गाण्याची जादू


प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचे वेकेशन फोटो व्हायरल


सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडलेले हे कलाकार,सध्या काय आहे त्यांचे स्टेटस


फोटोसौजन्य-  इन्स्टाग्राम