आमीर खानचा भाचा अभिनेता इमरान खान सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. काही महिन्यांपूर्वी तो पत्नी अवंतिकापासून वेगळा झाला हे कळत होते. पण त्यांच्यात अचानक काय बिनसले हे मात्र कळत नव्हते. पण आता या दोघांच्या वेगळे होण्याचे कारण समोर आले आहे. पैसा हा या मागचे कारण असून इमरान आर्थिक अडचणीत सापडलेल्या इमरानला म्हणूनच त्याची पत्नी अवंतिका त्याला सोडून गेली या बातमीवर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा करणार लग्न, केला व्हिडिओ शेअर
इमरान खानने त्याच्या करीअरची सुरुवात उत्तम केली होती. पण त्याचे चित्रपट म्हणावे तितके चालले नाहीत. उलट त्याचे चित्रपट पडू लागले. त्यामुळेच त्याला चित्रपटाच्या ऑफर्स येणं बंद झालं. त्याने जितका पैसा कमावला होता. तो पैसा आता संपला असून गेल्या चार वर्षांपासून इमरान खान घरीच बसून आहे. त्यामुळे अवंतिका आणि तिच्या मुलीचा खर्च तो उचलण्यास असमर्थ असल्यामुळेच अवंतिकाने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला.
एक वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार पैसा हेच इमरानला सोडण्याचे कारण नव्हते. तर इमरानचा बदलत चाललेला स्वभाव या मागचे कारण होते. इमरान विनाकारण चीडचीड करु लागला होता. त्याच्या या बदलत जाणाऱ्या स्वभावाचा परीणाम तिच्या मुलीवर होऊ नये म्हणूनच तिने त्याच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.सध्या अवंतिका आपल्या कुटुंबासोबतच राहात आहे.
आमीर खानचा भाचा असूनही स्वत:चे वेगळे अस्तित्व इमरान खानने निर्माण केले होते. जेनेलिया देशमुखसोबत ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटापासून त्याने त्याच्या करीअरला सुरुवात केली.त्याचा चॉकलेट बॉय अंदाज त्यावेळी सगळ्यांनाच आवडला होता. म्हणूनच तो सगळ्यांना या चित्रपटात आवडला होता. त्यानंतर त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. किडनॅप (2008), लक (2009), आय हेट लव्ह स्टोरी (2009),दिल्ली बिल्ली (2011), एक मै एक और तू (2012), कट्टी बट्टी (2015) अशा काही चित्रपटातून त्याने काम केले. पण त्याचे काही चित्रपट काही खास चालले नाहीत. तो चित्रपटात येण्याआधीपासूनच अवंतिकासोबत रिलेशनशीपमध्ये होता. 2011 साली त्याने अवंतिकासोबत लग्न केले.
इमरानने आतापर्यंत अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. वेगवेगळ्या आशयाचे चित्रपट त्याने केले आहेत. पण तरीसुद्धा त्याचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकले नाहीत. त्यामुळेच काही चित्रपटांनतर मात्र त्याला ऑफर्स येणेच बंद झाले. चित्रपटाशिवाय त्याच्याकडे काहीही नसल्यामुळे सध्या तो नैराश्याच्या गर्तेत गेला आहे. एकूणच आमीर खानचा भाचा असूनही त्याला मि्टर परफेक्शनिस्टची जागा काही घेता आली नाही.
बॉलीवूड अभिनेत्री रायमा सेन करतेय मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.