गुंजन सक्सेना' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, वायूसेनेला बदनाम करण्याचा आरोप

गुंजन सक्सेना' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, वायूसेनेला बदनाम करण्याचा आरोप

जान्हवी कपूरचा ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ चित्रपट रिलीजनंतर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. वायूसेनेची पहिली महिला पायलट अशी ओळख असलेल्या गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे. रिलीजनंतर या चित्रपटाची सगळ्यांकडून प्रशंसा करण्यात आली होती. पण आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या काही क्षणांचा राष्ट्रीय महिला आयोगाकडून चांगलाच समाचार घेण्यात आला आहेत. करण जोहर निर्मित हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवरुन हटवण्यात यावा अशी मागणी आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी केली आहे. नेमकं प्रकरण काय ते देखील जाणून घेऊया.

खऱ्या आयुष्यातही व्हायचे आहे गुंजन सक्सेनाच्या वडिलांसारखे- पंकज त्रिपाठी

महिला आयोग नाराज

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी या संदर्भात एक ट्विट केले होते. ज्यामुळेच महिला आयोग या चित्रपटावर नाराज असल्याचे कळले होते. त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, भारतीय वायूसेना ही महिलांच्याबाबतीत खराब असल्याचे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. देशाचा  मान असणाऱ्या या वायूसेनेला अशापद्धतीने दाखवण्यात येत असेल तर मात्र हे चुकीचे आहे.या चित्रपटाचे स्क्रिनिंग हे आताच्या आता थांबवणे फारच आवश्यक आहे., असे ट्विट करत त्यांनी चित्रपटात दाखवण्यात आलेल्या स्त्री-पुरुष भेदभावावर आणि वायूसेनेत महिला अधिकारी आल्यानंतर तिच्यावर होणाऱ्या अन्यायावर हा चित्रपट बनवण्यात आल्यामुळे वायूसेना वाईट असते अशी इमेज बनली जाईल. हेच महिला आयोगाला नको आहे. 

सडक2 च्या ट्रेलरला प्रेक्षकांची नापसंती, लाईक्सपेक्षा जास्त डिस्लाईक्स

काय म्हणाली खरी गुंजन सक्सेना

Instagram

चित्रपटासंदर्भात खऱ्या गुंजन सक्सेनाला विचारण्यात आल्यावर तिने दिलेले उत्तर फारच महत्वाचे आहे ती म्हणाली की, 1999 साली कारगिल युद्धावर गेलेली मी पहिली महिला पायलट होते. कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती असतात. त्यामुळे चांगले आणि खराब असे वातावरण सगळीकडेच असते. एखाद्या क्षेत्रात बदल होत असताना तो बदल स्विकारण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. काहींना बदल स्विकारायला थोडा वेळ लागतो. पण पुढे ती म्हणाली की, वायूसेनेकडून तिला नेहमीच पाठिंबा मिळाला. अगदी घरापासून ते भारतीय वायूसेनेपर्यंत सगळ्यांना माझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मला खूप मदत केली. ज्यावेळी तुम्ही परीघाबाहेर जाऊन काहीतरी करण्याचा विचार करता त्यावेळी तुम्हाला हमखास काही अडचणींचा सामना करावा लागतो, असेही तिने सांगितलेट्रेनिंगच्यावेळी सहअधिकारी, कमांडिग ऑफिसर आणि पर्यवेक्षकांना कायम मदत केल्याचे सांगायला ती विसरली नाही. शिवाय तिने एक महत्वाचा संदेशही देऊ केला तो म्हणजे महिला आणि पुरुष ट्रेनीमध्ये कोणतेही अंतर नसते. वायूसेनेत गेल्यावर त्यांना पहिला धडा देण्यात आला तो स्त्री-पुरुष समानतेचा होता तो असा की, विमान उडवताना त्या विमानाला तुम्ही कोण आहात ते माहीत नसते. महिला विमान उडवते का पुरुष विमान उडवतो याचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे ट्रेनिंगही कायम कठीण असते. यात तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. 

रेकॉर्ड ब्रेक ठरला तानाजी, यंदा 'या' बॉलीवूड चित्रपटांना छोट्या पडद्यावर सर्वाधिक पसंती

चित्रपटात वायूसेनेमध्ये दाखवला भेदभाव

 गुंजन सक्सेना यांनी वायूसेनेने कायम त्यांना पाठिंबा दिला असे सांगितले पण काही गोष्टींचे आकलन करायला आणि बदल स्विकारायला काहींनी वेळ लावला हे देखील सांगितले. पण चित्रपटात ते फारच वेगळ्या पद्धतीने दाखवल्याचे आरोप होत आहे. महिला आयोगाने खऱ्या गुंजन सक्सेनाने समोर येऊन याचा खुलासा करावा अशी मागणी केली आहे. 


‘धडक’नंतर जान्हवी कपूर गुंजन सक्सेना यांच्या रोल साकारताना दिसली. पहिल्या चित्रपटाच्या तुलनेत तिला या चित्रपटात अनेकांची पसंती मिळाली.पण आता चित्रपटाच्या वादामुळे सगळ्यांचे लक्ष वेगळ्याविषयाकडे वळले आहे.