या कारणामुळे झाले होते अंकिता-सुशांत सिंहचे ब्रेकअप

या कारणामुळे झाले होते अंकिता-सुशांत सिंहचे ब्रेकअप

सुशांत सिंह राजपूत गेल्यापासून आजपर्यंत त्याच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे. सुशांतच्या आत्महत्येमागे सातत्याने रिया चक्रवर्तीचे नाव समोर येत आहे. रियाला CBI चौकशीसाठी अनेकदा फेऱ्याही माराव्या लागत आहे. दरम्यान सुशांतच्या आयुष्यात असलेली सगळ्यात जवळची आणि सगळ्यांची आवडती व्यक्ती म्हणजे अंकिता लोखंडे. पवित्र रिश्ताच्या सेटपासून सुरु झालेला त्यांच्या प्रेमाचा प्रवास तब्बल 6 वर्ष सुरु होता. पण अचानक असे काय झाले की, या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला हे अनेकांना कळले नाही. या दोघांनी त्यांच्या ब्रेकअपचे कारणही कोणाला सांगितले नाही. पण सुशांतच्या मानसशास्त्रीय डॉक्टरांकडून यासंदर्भात एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. सुशांत- अंकिताचे नेमके ब्रेकअप का झाले याचे कारण या डॉक्टरांनी सांगितले आहे. जाणून घेऊया नेमके कारण

रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ आल्या बॉलिवूडच्या या अभिनेत्री, केले ट्विट

प्रेमाला झाली सुरुवात

Instagram

मालिका विश्वातील सगळ्यात आवडती मालिका म्हणून जी मालिका ओळखली जाते ती म्हणजे ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर या दोघांची ओळख झाली. लीड रोल साकारणारी ही जोडी मालिकेच्या शूटिंग दरम्यानच रिलेशनशीपमध्ये होती. त्या मालिकेतून या जोडीला खूप प्रेम मिळाले. या मालिकेनंतर या दोघांनी एक डान्स रिअॅलिटी शो केला. ज्यामध्ये सुशांतने अंकिताला प्रपोझ केले.त्यामुळे त्यांच्या फॅन्सचा आनंद  गगनात मावेनासा झाला होता. पण 2016 साली त्यांच्या लग्नाच्या बातमीसोबतच ब्रेकअपची बातमी समोर आली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. या दोघांमध्ये अचानक काय झाले ते कोणाला कधीही कळले नाही. त्यांनी कधीच या विषयी सोशल मीडिया किंवा इतर गोष्टींचा आधार घेतला नाही. त्यांनी एकमेकांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला खरा पण त्याचे कारण कायमच गुलदस्स्यात राहिले. 

बिग बॉसच्या नव्या टीझरचा नेमका अर्थ तरी काय?,येणार नवा सीझन

डॉक्टरांनी सांगितले ब्रेकअपचे कारण

Instagram

सुशांत सिंह राजपूत मानसिक तणावाखाली होता. या विषयी आता आपण बरेच ऐकले आहे. त्याच्या डॉक्टरांकडून अधिक माहिती घेतल्यानंतर त्याच्या आणि अंकिताच्या नात्याविषयी अधिक माहिती मिळाली. सुशांतने दिलेल्या माहितीनुसार सुशांत हा अंकिताला आजही विसरु शकला नव्हता. त्याचे अंकितावर खूप प्रेम होते. पण चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी त्यांचे सगळे व्यवस्थित होते. पण चित्रपटात सुशांतला संधी मिळाल्यानंतर अंकिता सतत फोन करुन त्याची चौकशी करत राहायची. सुशांतच्या हिरोईनसोबतच्या सीन्सवर ती नाराज असायची.सुशांतने तिला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला. काही काळासाठी अंकिताने त्याचे ऐकलेसुद्धा पण पुन्हा अंकिताने सतत संशय घेणे सुरु केल्यामुळे त्या दोघांनी एकमेकांपासून दूर राहण्याचे ठरवले. त्यांच्यातील प्रेम कमी होऊन अंकिताचा संशय अधिक झाल्यामुळे सुशांतने वेगळे होण्याचा निर्णय घेतला अशी माहिती डॉक्टरांनी दिली. पण अंकिता कशीही वागली तरी अंकिता ही त्याच्यासाठी फार महत्वाची व्यक्ती असल्याचा खुलासाही त्याने केला आहे. 

दोघेही आपल्या आयुष्यात खूश

अंकिता आणि सुशांतचे ब्रेकअप झाले असले तरी देखील त्यांनी एकमेकांच्या खासगी आयुष्यात कधीच ढवळाढवळ केली नाही. सुशांतचे ब्रेकअपनंतर अनेक अभिनेत्रींशी नाव जोडले गेले. पण  रिया चक्रवर्तीसोबत तो शेवटचा रिलेशनशीपमध्ये होता. तर अंकिताही तिच्या आयुष्यात खूश असून विकी पंजाबीसोबत ती रिलेशनशीपमध्ये आहे. 


आता अंकिता- सुशांतच्या फॅन्सना त्यांच्या ब्रेकअपचा आता तरी खुलासा झाला असेल.

नेहा कक्करला पु्न्हा लागले आहेत लग्नाचे वेध, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना