Year Ender:2019 मध्ये हे बॉलीवूड कलाकार झालेत मालामाल

Year Ender:2019 मध्ये हे बॉलीवूड कलाकार झालेत मालामाल

2019 वर्ष संपून लवकरच आपण 2020 मध्ये पदार्पण करणार आहोत. त्यामुळे या वर्षी बॉलीवूडमध्ये घडलेल्या काही ठळक घडामोडी जाणून घेण्यात तुम्हाला नक्कीच रस असेल. बॉलीवूडच्या काही कलाकारांसाठी हे सरणारं वर्ष नक्कीच भरभराटीचं ठरलं आहे. कारण नुकतीच सर्वात जास्त कमाई करणाऱ्या कलाकारांची यादी फोर्ब्स इंडीयाने जाहीर केली आहे. ज्यामध्ये बॉलीवूडच्या काही कलाकारांच्या नावाची नोंद टॉप 10 मध्ये झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार ही यादी या कलाकारांच्या कमाईचा करण्यात आलेला अंदाज आणि त्यांची सोशल मीडियावरील लोकप्रियता यावरून ठरवण्यात आलेली आहे. बॉलीवूडमधील काही कलाकार आणि सेलिब्रेटी या वर्षी यामुळे मालामाल झाले आहेत. ही त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच खुशखबर आहे. 

या वर्षी कोणत्या सेलिब्रेटीजने केली आहे सर्वात जास्त कमाई

सेलिब्रेटीजमध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्यांच्या या लिस्टमध्ये नंबर वन पोझिशनवर आहे भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर आहे अभिनेता अक्षय कुमार. अभिनेता अक्षय कुमारने सर्वात जास्त कमाई करण्यात अनेक बॉलीवूड कलाकारांना मागे टाकलं आहे. कारण त्याने यावर्षी अंदाजे 293.25 कोटी रूपये कमावले आहेत. या यादीत तिसऱ्यानंबरवर आहे बॉलीवूडचा भाईजान सलमान खान. या वर्षी सलमान खानने देखील अंदाजे 239.25 कोटींची कमाई केली असा अंदाज आहे. त्यानंतर चौथ्या स्थानावर आहेत महानायक अमिताभ बच्चन. 2019 या वर्षी अमिताभ बच्चन यांनी जवळजवळ 229.25 कोटींची कमाई केली आहे असा अंदाज दर्शवला जात आहे. त्याच सोबत या लिस्टमध्ये शाहरूख खान सहाव्या तर रणवीर सिंग सातव्या क्रमांकावर आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर या लिस्टमध्ये नवव्या स्थानावर आहे.

हे ही वाचा -

Year Ender 2019: या वर्षी हिट ठरला बायोपिक फॉर्म्युला

कोणत्या बॉलीवूड अभिनेत्रींचा यात आहे समावेश

या वर्षी अभिनेत्रीच्या कमाईचा विचार केल्यास या लिस्टमध्ये टॉप 10 मध्ये आलिया भट आणि दीपिका पदूकोन यांच्या नावाचा समावेश आहे. या लिस्टमध्ये दिलेल्या अंदाजानुसार आलियाने 59.21 कोटी कमावले आहेत ज्यामुळे ती आठव्या क्रमांकावर आहे. तर दीपिका पदूकोन यावर्षी या यादीत दहाव्या नंबरवर असून तिने 48 कोटींची कमाई केल्याचा अंदाज आहे. त्याची या वर्षीची अंदाजे कमाई आहे 76.96 आहे. फोर्ब्स इंडीया मॅगझिनने या वर्षीच्या टॉप 100 सेलिब्रेटीजची लिस्ट जाहीर केली आहे. 

हे ही वाचा -

#Lucky2020 : नवीन वर्षात ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार 'गुडन्यूज'

फोटोसौैजन्य - इन्साग्राम

 

हे ही वाचा  -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

या कारणासाठी किआरा अडवाणीला व्हाचययं आहे प्रेग्नंट

Good News: करण पटेल आणि अंकितावर झाली ‘मेहर’, सोशल मीडियावर केले जाहीर

शिकारीफेम नेहा खानच्या दिलखेचक अदा

घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य आणतील हे