राणू मंडलबाबत प्रश्न विचारताच का भडकला हिमेश रेशमिया

राणू मंडलबाबत प्रश्न विचारताच  का भडकला हिमेश रेशमिया

सोशल मीडियावर सध्या सतत चर्चेत असलेली एक व्यक्ती म्हणजे राणू मंडल. बंगालमधील एका रेल्वे स्टेशनवर गाणारी राणू रातोरात स्टार झाली. ज्यामुळे राणूच्या गाण्याची आणि सेलिब्रेटी होण्याची चर्चा सगळीकडे सूरू झाली. मात्र आता याच राणू मंडलच्या डोक्यात प्रसिद्धीची हवा शिरली आहे असं म्हटलं जात आहे.  राणूचे पत्रकार आणि चाहत्यांशी फटकारून वागण्याचे काही व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. याबाबत तिला लॉंच करणाऱ्या गायक आणि संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमियाने संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. ज्यावरून त्याला राणू मंडलला लॉंच केल्याचा पश्चाताप झाल्याचं दिसून येत आहे.

Instagram

का संतापला हिमेश रेशमिया

हिमेशच्या मते त्याने राणूप्रमाणे अनेक लोकांना गाण्याची संधी दिली आहे. त्यामुळे त्याने फक्त एका व्यक्तीमधील गायन कौशल्याचा शोध घेतला इतकंच काम केलं आहे. प्रसिद्धीच्या झोतात आल्यावर कोणी कसं वागावं हे त्याच्या हातात नाही.  म्हणूनच आताजर राणू चुकीची वागत असेल तर त्याबाबत कोणीही त्याला जबाबदार धरू नये असं त्याचं म्हणणं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रश्नाबाबत उत्तर देताना हिमेशचा तोल गेला आणि संतापून तो पत्रकाराना म्हणाला की, "मी राणू मंडलचा मॅनेजर नाही"

कशी झाली राणू रातोरात स्टार

बंगालच्या रेल्वे स्थानकावर गायलेल्या गाण्याचा एक व्हिडिओ एकाने रेकॉर्डकरुन सोशल मीडियावर टाकला आणि तो हा हा म्हणता प्रसिद्ध झाला इतका की, राणूला चक्क हिमेश रेशमियाच्या चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. हिमेशने तिच्यातील गायकाचे गुण हेरले आणि तिला पहिला ब्रेक दिला.  गायक होण्यासाठी राणूचे ग्रुमिंग असे करण्यात आले ज्यामुळे बघणाऱ्यांना हीच ती स्टेशनवर गाणारी राणू हे ओळखणे ही कठीण झाले. एवढंच नाही तर तिच्या आवाजाची तुलना थेट गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजाशी थेट केली जाऊ लागली. काही वर्षांपूर्वी मुंबईत वास्तव्याला असणारी राणू मंडल पतीसोबत फिरोज खान यांच्या घरी काम करायची. पतीच्या निधनानंतर राणूने मुंबई सोडली ती कायमचीच. मुंबईत असताना ती गाणं गायची. पण घरातल्यांच्या विरोधामुळे तिने क्लबमध्ये गाणं बंद केलं. नवरा नाही. मुलीने लक्ष द्यायचे टाळले यामुळेच मग तिच्यावर रेल्वे स्टेशनवर गाण्याची वेळ आली. या वयात तिच्यामधील कौशल्य कोणतरी हेरलं आणि ती पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आली. मात्र आता याच राणूच्या डोक्यात या प्रसिद्धीची हवा शिरल्याचं म्हटलं जात आहे.

राणू मंडल सोशल मीडियावर होतेय ट्रोल

काही दिवसांपासून हेव्ही मेकअप, बदललेला लुक, पत्रकारांना दिलेली उद्धट उत्तरे, चाहत्यांना सेल्फी घेण्यासाठी दिलेला नकार यामुळे राणू मंडल ट्रोल होत आहे. तिच्यावर याबाबत अनेक मीम्सदेखील तयार केले  गेले आहेत. या मीम्समुळे राणू मंडळ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आता तिला लॉंच केलेल्या हिमेश रेशमियानेदेखील तिच्या या वागण्याबाबत संताप व्यक्त केला आहे.

 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

गुन्हेगारी जगाचा वेध घेणारा 'आयपीसी 307 A', सचिन देशपांडे मुख्य भूमिकेत

रितेशने धर्मेंद्रजींना दिल्या वाढदिवसाच्या अशा शुभेच्छा

Year Ender 2019: या वर्षी हिट ठरला बायोपिक फॉर्म्युला