गेल्या दोन वर्षांपासून हिना खानच्या करिअरला वेगळंच वळण लागलं आहे. हिना खानच्या आयुष्यात आता अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. इतकंच नाही यावेळी हिना खानने सौंदर्याच्या बाबतीत मात दिली आहे ती म्हणजे चक्क कतरिना कैफला. हिना खानला Third Sexiest Asian Woman of 2019 घोषित करण्यात आलं आहे. युकेमधील एका वृत्तपत्राने जगातील 50 सेक्सिएस्ट एशियन वूमन घोषित केल्या असून यामध्ये हिनाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर पहिला क्रमांक पटकावला आहे आलिया भटने. मागच्या वर्षी दीपिका पादुकोण पहिल्या क्रमांकावर होती तर यावर्षी दीपिकाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागणार आहे. शिवाय पहिल्या पाच क्रमांकामध्ये अजून एका टीव्ही अभिनेत्रीला मान मिळाला आहे आणि ती अभिनेत्री आहे सुरभी चंदना. तर कतरिना कैफच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी अशी आहे की, कतरिना यावेळी सहाव्या क्रमांकावर घसरली आहे.
हिना खानसाठी हे वर्ष अप्रतिमच ठरलं आहे. कसौटी जिंदगी की मधील कमोलिकाची भूमिका मिळाल्यापासून ते अगदी कान्स फेस्टिव्हलमधील हिनाचा लुक या सगळ्याचीच चर्चा वर्षभर राहिली. त्याशिवाय हिनाचा नुकताच एक अल्बमदेखील प्रदर्शित झाला आहे. प्रियांक शर्मा बरोबर असलेल्या या अल्बमलादेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. हिना खानचे असंख्य चाहते आहेत आणि हिना सतत आपल्या चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते. हिना खानने फॅशन आयकॉन म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि त्याशिवाय कान्सच्या रेड कारपेटवरदेखील यावर्षी हिनाने पहिल्यांदाच आपली वर्णी लावली आणि तिच्या लुकने रेड कारपेटदेखील गाजवलं.
हिना सध्या लहान पडद्यापासून लांब असली तरीही ती लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेपासून हिनाने आपल्या करिअरला सुरूवात केली. त्यानंतर खतरों के खिलाडी आणि बिग बॉस हे दोन रियालिटी शो करून हिनाच्या करिअरला एक वेगळं वळण लागलं आणि हिनाला खूपच चांगले प्रोजेक्ट मिळायला लागले. टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात फिट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. शिवाय हिनाकडे अनेक ऑफर्सही येत आहेत. हिनाने आतापर्यंत अनेक पुरस्कारही जिंकले आहेत. आता अजून एक मानाचा तुरा तिच्या आयुष्यात तिला मिळाला आहे.
टीव्ही अभिनेत्री हिना खान ‘कसौटी जिंदगी की 2’ (Kasautii Zindagii Kay) या मालिकेपूर्वी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या हिंदी मालिकेत दिसली होती. या मालिकेमध्ये तिने आदर्श सून अक्षरा सिंघानियाची भूमिका साकारली होती. शिवाय रिएलिटी शो ‘बिग बॉस’ मध्ये रनर अप म्हणून जिंकल्यावर तिला तिची प्रतिमा बदलण्याची गरज वाटू लागली होती. म्हणूनच हिना खानने एकता कपूरची प्रसिद्ध हिंदी मालिका कसौटी च्या रीबूटमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. हिना खानला या मालिकेमध्ये कोमोलिकाची भूमिका करण्याची संधी मिळाली आणि तिनेही ऑफर झटपट स्वीकारली. हिना खान साकारत असलेली कोमलिकाची भूमिका लोकांना आवडू लागली होती. मात्र काही जुन्या कमिटमेंटसमुळे आणि मालिकेत निर्माण झालेल्या वादांमुळे हिना खानने या मालिकेतून ब्रेक घेतला असं म्हटलं जातं.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.