कान्समध्ये दिसला कोमोलिकाचा जलवा

कान्समध्ये दिसला कोमोलिकाचा जलवा

आत्तापर्यंत टीव्हीवर आपल्या प्रत्येक भूमिकेने मन जिंकलेली टीव्ही अभिनेत्री हिना खान. अक्षरा असो वा कोमोलिका असो तिने प्रत्येक भूमिकेत प्रेक्षकांचं मन जिकलं आहे आणि आता तिने कान्समध्ये आपला जलवा दाखवला.


hina-khan-cannes1


टीव्ही अभिनेत्री आणि लवकरच चित्रपटात झळकणाऱ्या हिना खाने कान्स फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर डेब्यू केला. यावेळी तिचा लुक खूपच सुंदर वाटत होता. रेड कार्पेटवरचा तिचा आत्मविश्वासही वाखाणण्याजोगा होता. तिच्याकडून पाहून असं जाणवलंच नाही की, ती पहिल्यांदाच या रेड कार्पेटवर डेब्यू करत आहे.





हिना खान आपल्या पहिल्यावहिल्या रेड कार्पेट डेब्यूसाठी निवड केली ती डिझाईनर जियाद नकड (Ziad Nakad) च्या सिल्व्हर शिमरी गाऊनची. मिनिमल मेकअप, न्यूड लिपस्टीक आणि हेअर बन यामुळे तिचा लुक एकदम परफेक्ट वाटत होता. हिना या गाऊनमध्ये खूपच स्टनिंग दिसत होती. हिना खानने अगदी सहजतेने कँडीड पोज दिले. मुख्य म्हणजे हिनाचं हे स्टाईलिंग केलं आहे सायली विद्या हीने. सायलीने आत्तापर्यंत अनेक मराठी सेलिब्रिटीजचंही स्टाईलिंग केलं आहे.


Hina Khan at Caans8


हिना खानच्या आगामी शॉर्ट फिल्म लाईन्स स्क्रिनिंग कान्समध्ये ठेवण्यात येणार आहे. याच निमित्ताने हिना खान कान्सला पोचली आहे. या फिल्मचं दिग्दर्शन हुसैन खानने केलं आहे. यामध्ये हिना एका स्ट्राँग वुमनच्या भूमिकेत दिसणार आहे. जी खूपच जबाबदार आणि स्वावलंबी आहे.


फिल्म करिअरसाठी केलं टीव्हीला अलविदा




 

 

 


View this post on Instagram


 

 

Lovely bond @realhinakhan @the_parthsamthaan @iam_ejf @poojabanerjeee @sahilanandofficial


A post shared by hinakhan fc(90k fam )😍😍😍😘😘 (@_realhinakhan) on




हिना खानने आपल्या फिल्मी करिअरसाठी टीव्हीच्या करिअरला मात्र अलविदा केल्याचं चित्र आहे. ये रिश्ता क्या कहलाता है मधल्या अक्षरा या भूमिकेने हिना खानला खरी ओळख दिली होती त्यानंतर ती बिग बॉसच्या 11 व्या सिझनच्या फायनल 2 पर्यंत हिनाने मजल मारली होती. त्यानंतर ती दिसली कोमोलिकाच्या नकारात्मक पण हटके आणि नखरेल भूमिकेत एकता कपूरच्या कसौटी जिंदगी की 2 मध्ये. पण तिच्या फिल्म कमिटमेंट्समुळे तिने कसौटीला बाय बाय केलं. हिना खानने तिला मिळालेल्या फिल्मी प्रोजेक्ट्समुळे असं केलं आहे. हिनाने एकाच वेळी तीन प्रोजेक्ट साईन केले असून त्यात एक इंटरनॅशनल प्रोजेक्टही आहे.


कान्समध्ये फडकणार मराठीची पताका


कान्सची जत्रा


फ्रेंच रिव्हेरामध्ये होत असलेल्या 72 व्या कान्स फिल्म फेस्टिवलला 14 मे ला सुरूवात झाली असून हा फेस्टिव्हल 25 मे पर्यंत चालणार आहे. हिनाने जरी या फेस्टिव्हलच्या कार्पेटवर पहिल्यांदा डेब्यू केलं असलं तरी आता उत्सुकता आहे ती बॉलीवूड सेलेब्सच्या लुकची. ज्यामध्ये सोनम कपूर, दीपिका पदुकोण, कंगना रणौत, हुमा कुरेशी, ऐश्वर्या राय आणि पहिल्यांदाच देसी गर्ल प्रियांका चोप्राही दिसणार आहे.