अभिनेत्री हिना खानच्या व्हायरल व्हिडिओने फॅन्स हैराण

अभिनेत्री हिना खानच्या व्हायरल व्हिडिओने फॅन्स हैराण

'ये रिश्ता क्या कहलाता है' ते 'बिग बॉसपर्यंत आपल्या दमदार अभिनयाने आणि अदांनी टीव्हीवर आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री हिना खान (Hina Khan). आता चित्रपट 'हॅक्ड' (Hacked) मधून बॉलीवूडमध्ये एंट्री करणार आहे. नुकतंच तिच्या चित्रपटाचं ट्रेलर रिलीज करण्यात आलं. जे पाहून तिचे फॅन्स मात्र हैराण झाले आहेत. नेमकं काय होतं या ट्रेलरमध्ये जाणून घेऊया.

हिनाचा हॅक्डमधला हटके अंदाज

अक्षरा असो वा कोमोलिका असो हिनाने नेहमीच वेगवेगळ्या भूमिका करण्याला पसंती दिली आहे. हा चित्रपटही त्याला अपवाद नाहीयं. या ट्रेलरमध्येही लोकांना हिना खानचा हटके अंदाज पाहायल मिळत आहे. तसंच या ट्रेलरमधून इंटरनेटमुळे तुमचं आयुष्य कसं बर्बाद होऊ शकतं. हेही दाखवण्यात आलं आहे. हॅक्डचं ट्रेलर पाहिल्यावर हिनाच्या फॅन्समध्ये पुन्हा एकदा तिच्या जबरदस्त अभिनयाची चर्चा आहे. एवढंच नाहीतर चित्रपटाच्या कल्पनेलाही पसंती मिळत आहे. हा चित्रपट सस्पेंससोबतच भरपूर ड्रामाचा तडका असलेला आहे. हे ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

काय आहे हॅक्डचं नेमकं कथानक

हिना खान (Hina Khan) सोबत या चित्रपटात रोहन शाह (Roshan Shah) मुख्य भूमिकेत आहे. या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे की, 19 वर्षांचा मुलगा हिना खानच्या प्रेमात वेडा होतो. पण हिना मात्र त्याला सीरियसली घेत नाही. मग तो तिचं आयुष्य आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो. मग पुढे काय होतं? यावरच ही कथा आहे. हिना खान एका हॅकरचं हृदय तोडून यात वाईटरित्या फसताना दाखवली आहे. हा चित्रपट 17 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. आता पाहूया टीव्हीवरचीही सून बॉलीवूडमध्ये काय धमाल करते.

चित्रपटच नाहीतर वेबवरही हिना

Instagram

टीव्ही आणि चित्रपटांसोबतच हिना लवकरच कुशल टंडन सोबत ओटीटी प्लॅटफॉर्मवरील एका हॉरर चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाचं नाव अजून ठरलेलं नाही. पण या चित्रपटाबाबतही हिना फारच उत्सुक आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन देबात्मा मंडल करत असून यामध्ये अदिती आर्य आणि ऋषभ सिन्हा दिसतील. 

View this post on Instagram

Hey y’all !

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

आता पाहूया टीव्हीप्रमाणे हिनाच्या अभिनयाचं नाणं मोठ्या पडद्यावरही खणखणीत ठरतं का? बेस्ट ऑफ लक हिना खान. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.