हिना खानवर चिडले फॅन्स म्हणाले, असे व्हिडिओ टाकू नकोस

हिना खानवर चिडले फॅन्स म्हणाले, असे व्हिडिओ टाकू नकोस

लॉकडाऊनमुळे सगळे सेलिब्स ऑनस्क्रिन दिसत नसले तरी ते सध्या आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटत आहेत. आपल्या फॅन्ससाठी वेगवेगळे व्हिडिओ करण्याचे काम सध्या अनेक जण करत आहेत. काहीजण कुकींग, काही जण वर्कआऊट, काही जण त्यांचे काही खास अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत आहे. हिंदी मालिका विश्वातील कमोलिका अर्थात हिना खान देखील तिच्या सोशल्सवर सतत अॅक्टिव्ह असते. ती तिचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत असते. पण तिने एक व्हिडिओ टाकला आणि त्या व्हिडिओवर तिच्या फॅन्सनी तिला असे व्हिडिओ टाकू नको असा सल्ला दिला. पण तेवढ्यावरच हिना खान थांबली नाही तर तिनेही त्या फॅनला उत्तर दिले. 

अभिनेत्री मिताली मयेकरच्या बिकिनी फोटोने सोशल मीडियावर वाढला हॉटनेस

नेमकं झालं काय?

हिना खान तिच्या सोशल मीडियावर सतत काही तरी पोस्ट करते. सध्या ती तिचा जास्त वेळ वर्कआऊटमध्ये घालवते. घरच्या घरी वर्कआऊट करुन तिने काही व्हिडिओ ती तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करते. पण तिने तिचा वर्कआऊट व्हिडिओ पोस्ट करणे तिच्या फॅनला रुचले नसावे. हिनाच्या एका फॅनने तिचा व्हिडिओ रिट्विट करत काहीतरी चांगलं आणि वेगळं करं. तुझे वर्कआऊट व्हिडिओ सतत टाकू नकोस त्यापेक्षा काहीतरी चांगला क्वालिटी कंटेट टाक असा सल्ला दिला

शिल्पा शेट्टीचा खुलासा, सुखी जीवन जगण्यासाठी ‘या’ व्यक्तीला करते फॉलो

हिना खानने दिलं उत्तर

 फॅनची ही मागणी आणि टीका लक्षात घेऊन तिनेही याला उत्तर देण्याचे ठरवले तिने त्या व्यक्तिला टॅग करत लिहिले की, तुमचे म्हणणे तुमच्या जागी बरोबर आहे. पण माझ्या व्हिडिओमुळे अनेकांना प्रेरणा मिळते. जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा नसेल तर तुम्ही पाहू नका. कारण मी शेअर केलेला हा व्हिडिओ चांगला कटेंट आहे. तुम्ही तो पाहून त्यावर कमेंट करुन प्रेम दाखवले त्याबद्दल मी आभारी आहे. 

इन्स्टाग्रामवरुनही ट्रोलर्सना केले ट्रोल

Instagram

हिना खान इथेच नाही थांबली तर तिने ट्रोलर्ससाठी एक  खास पोस्टही लिहिली होती. व्हिडिओ रेकॉर्ड करुन लोकांबद्दल वाईट बोलणे हा आता ट्रेंड झाला आहे. अशा लोकांवर कडक कारवाई करणे फारच गरजेचे आहे.त्यानंतरही तिने तिचे वर्कआऊट व्हिडिओ पोस्ट करणे सुरुच ठेवले आहे. 

घरीच साजरी केली ईद

हिना खानने लॉकडाऊनच्या काळात ईदही साजरी केली. तिने ईदचे अनेक व्हिडिओ आतापर्यंत शेअर केले आहे. तिने ईदच्या दिवशी तयार केलेल्या हैदराबादी मटण बिर्याणीचा व्हिडिओही फारच प्रसिद्ध झाला होता. त्यावेळी तिने तिचे ईदचे आऊटफिटवाले फोटोही पोस्ट केले होते. कामाबाबत सांगायचे झाले तर हिना खान हा टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. तिने अनेक मालिकांमधून काम केले आहे.तिने कसौटी जिंदगी की या नव्या मलिकेत कमोलिकाची भूमिका साकारली होती. 


तर हिना खानला ट्रोलर्सना चांगलेच उत्तर दिले आहे.

कपिल शर्माची सोशल मीडियावर होतेय वाह वाह