कसौटीतून कुठेही जाणार नाही कमोलिका, एकता कपूरचा खुलासा

कसौटीतून कुठेही जाणार नाही कमोलिका, एकता कपूरचा खुलासा

सध्या हिंदी मालिंकामध्ये चर्चा आहे ती एकाच मालिकेची…. कसौटी जिंदगी २ ची. या मालिकेचा टीआरपी इतका चांगला आहे की, या मालिकेत अगदी खुट्ट जरी झाले तरी लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होतात. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेतील कमोलिका म्हणजेच हिना खानच्या एक्झिटवरुन चर्चा रंगल्या होत्या. फायनली तिने या मालिकेतून एक्झिटसुद्धा घेतली. त्यानंतर कमोलिकाचा चाहता वर्ग चांगलाच नाराज झाला. पण थांबा कारण कमोलिका कुठेही जाणार नाही याचा खुलासा एका व्हिडिओमधून झाला आहे. या व्हिडिओत एकता कपूरच हिना खान परतण्याचे संकेत देत आहे.


प्रेरणच्या आयुष्यात एका नव्या पुरुषाची होणार एन्ट्री


पाहा व्हिडिओ

एका फॅनपेजने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून यामध्ये क्रिस्टल डिसूजा, करिश्मा तन्ना, एकता कपूर आणि हिना खान मजा करताना दिसत आहे. ज्यामध्ये एकता कपूर शेवटी  हिना खानकडे बोट दाखवून हिच कमोलिका या मालिकेत राहणार आहे असे सांगत आहे. आता याचा अर्थ स्पष्ट आहे की, शोची प्रोड्युसर एकता कपूरलाही कमोलिकाच्या रुपात हिना खानच हवी आहे. त्यामुळे आता हिना खान कधी परतणार याची वाट पाहायची आहे.


कुटुंबासोबत घालवला क्वालिटी टाईम


हिना खान मालिकेच्या एक्झिट दरम्यान इतकी चर्चेत आली की, तिचा फॅन फॉलोविंगही चांगलाच वाढला आहे. त्यामुळे ती कुठे आहे काय करत आहे या सगळ्यावर आता नजर ठेवली जाते. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले ज्यामध्ये हिना आपल्या कुटुंबासोबत क्वावालिटी टाईम घालवताना दिसत आहे. तिने मालदिव्समधील काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.

हिना खानचे मालदिव्समधील फोटो पाहिलेत का?


हिना खानची एक्झिट दिखावा ?


मालिका कशा हिट करायच्या हे केवळ एकता कपूरलाच कळते. इतकी वर्ष मालिका विश्वात स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या हिना खानने इतकी जुनी मालिका रिमेक करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लोकांना अचानक पुन्हा एकदा प्रेरणा आणि अनुरागची प्रेमकहाणी आठवण्याची इच्छा झाली. गुगल, युट्युबर या मालिकेचे टायटल ट्रॅक पुन्हा वाजू लागले. एकताने कित्येक दिवस या नव्या मालिकेतील प्रेरणा आणि अनुराग यांचे चेहरे दाखवले नव्हते. उर्वशी ढोलकियाने साकारलेली कमोलिका कोण साकारणार याची उत्सुकता लोकांमध्ये जागवली आणि मग हिना खानचा कमोलिका रुपातील प्रोमो शेअर केला. ही मालिका टीआरपीमध्ये नंबर १ असावी म्हणून एकता कपूर कमोलिकाच्या एक्झिटचा दिखावा तर करत नाही ना?अशी शंकाही येते.

डॉन3 मधून शाहरुखचा पत्ता कट, गली बॉयला मिळाली संधी 


 कसौटी रंजक मोडवर


जर तुम्ही कसौटी जिंदगी की ची फार वर्षांपूर्वी आलेली मालिका पाहिली असेल तर तुम्हाला प्रेरणा अनुरागची प्रेमकहाणी माहीत असेल आणि नसेल माहिती तरी ती आता कळू शकेल. कारण हा दुसरा भाग तिच प्रेमकहाणी पुढे घेऊन जाणारा आहे. अनुराग आणि प्रेरणा यांचे चेहरे बदलले आहेत. पण मालिकेत त्यांच्या प्रेमात अडचणी आणणाऱ्या विलन मात्र तशाच आहेत. पण आता इतक्या वर्षांनी ही मालिका येत आहे म्हटल्यावर यात थोडा बदल तर असणारच म्हणा. या मालिकेतील प्रेरणा पहिल्या प्रेरणापेक्षा चांगलीच हुशार आहे. पण तिच्या आयुष्यात आता आणखी एका पुरुषाची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. हे केवळ एकता कपूरच्याच मालिकेत होऊ शकते.