कसौटी जिंदगी की : कोमोलिकाच्या मृत्यूचा सीन झाला लीक

कसौटी जिंदगी की :  कोमोलिकाच्या मृत्यूचा सीन झाला लीक

सीरियल "कसौटी जिंदगी की" आजकाला फारच चर्चेत आहे. काही दिवसांपासून बातम्या आहेत की, कोमोलिका म्हणजेच हिना खान लवकरच सीरियलला बाय बाय करणार आहे. अखेर ती वेळ जवळ आलीच, जेव्हा हिना खानने सीरियलमधील आपल्या भूमिकेला निरोप दिला. तुम्हाला आठवतच असेल की, कोमोलिकाची एंट्री किती धमाकेदार झाली होती ते. त्याच पद्धतीने तिची विदाईही शानदार झाली. अनुराग, प्रेरणा, निवेदिता आणि अनुपम यांनी एकत्र येऊन कोमोलिकाला निरोप दिला. कोमोलिकाच्या एक्झीटनंतर लगेचच सीरियलमध्ये लवकरच मिस्टर बजाजची एंट्री होणार आहे.   


अनुराग- प्रेरणा एकत्र येऊन शिकवला धडा


शूटींगच्या शेवटच्या दिवशी सर्व कलाकारांनी मिळून हिना खानला जंगी फेअरवेल पार्टी दिली. या पार्टीमध्ये एकदा नाहीतर दोनदा केक कापण्यात आला. पहिल्यांदा शूटींगनंतर दुपारी हिना खानसोबत सगळ्यांनी केक कापला. या दरम्यान सीरियलमधल्या कलाकारांनी धम्माल केली.


‘कसौटी जिंदगी की’ फेम प्रेरणा आणि कोमोलिकाचं झालं सेटवर भांडण


सोशल मीडियावर या फेअरवेल पार्टीचा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला आहे. केक कापल्यानंतर अनुराग म्हणजेच पार्थ आणि प्रेरणा म्हणजे एरिका फर्नांडिसने एकत्रितपणे हिना खानवर हल्लाबोल केलं आणि पूर्ण चेहऱ्यावर केक लावला. तुम्हीही बघा सीरियलच्या सेटवरील या कलाकारांच्या मस्तीचा व्हिडीओ. हा व्हिडीओ पार्थ समथानच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे.

अशी होणार कोमोलिकाची विदाई


आपल्या सगळ्यांनाच आत्तापर्यंत हे कळून चुकलं आहे की, कोमोलिका म्हणजे हिना खान आपल्या आगामी बॉलीवूड प्रोजेक्टमुळे कसौटी जिंदगी की या सीरियलला निरोप देत आहे. पहिल्यांदा हिना खान नकारात्मक भूमिकेत दिसणार म्हणून तिचे फॅन्स नाराज होते. पण हिनाने या भूमिकेत जीव ओतला आणि दाखवून दिलं की, तिच्यापेक्षा चांगली ही भूमिका कोणीच साकारू शकत नाही. आता जेव्हा फॅन्सना तिचा अभिनय आवडू लागला होता तेव्हा तिच्या जाण्याने प्रेक्षक नाराज आहेत.


Hina Khan trapped in Cyber Crime 1


कोमोलिकाच्या विदाईचा सीन शूट करण्यात आला असून तो व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


Hina Khan- Last day at Kasautii


या व्हिडीओमध्ये हिना खान गोल्डन ड्रेसमध्ये दिसत असून कळतंय की, हा कोमोलिकाच्या मृत्यूचा सीन शूट केला जात आहे. व्हिडीओमध्ये हिना खानच्या डुप्लीकेटसोबत पार्थ आणि एरिकाही दिसत आहेत. तुम्हीही पाहा कोमोलिकाचा हा शेवटच्या सीनचा व्हिडीओ
 

 

 


View this post on Instagram


 

 

@realhinakhan IG story . . #kasautiizindagiikay #kasautiizindagiikay2 #parthsamthaan #ericafernandes #parica #anupre #hinakhan


A post shared by Kasauti Zindagi Kay (@anuprexparica) on
या सीनच शूटींग झाल्यानंतर सीरियलच्या कलाकारांनी एकत्र येऊन पुन्हा एकदा हिना खानला मिनी फेअरवेल दिलं. सगळेच कलाकार पार्टीमूडमध्ये दिसत आहेत. पाहा हिना खानच्या फेअरवेलचे फोटो…


Hina Khan- Last day at Kasautii1


Hina Khan- Last day at Kasautii5


Hina Khan- Last day at Kasautii2


Hina Khan- Last day at Kasautii3


Hina Khan- Last day at Kasautii4


Hina Khan- Last day at Kasautii6


'कसौटी जिंदगी की' ची 'प्रेरणा' श्वेता तिवारीचं पुन्हा टीव्हीवर कमबॅक


कान्समध्ये दिसणार जलवा


सीरियलला निरोप दिल्यानंतर हिना खान कान्समध्ये जलवा दाखवणार आहे. हिना खान पहिली अशी टीव्ही कलाकार आहे जी बॉलीवूडच्या अभिनेत्रींसोबत कान्स रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवेल.


Hina Khan- Last day at Kasautii8


या खास क्षणासाठी हिना खानने अनेक ड्रेसेसच्या ऑप्शनचा विचारही करून ठेवला आहे. आता हिनाचा कान्स रेड कार्पैटवरचा लुक कसा असेल हे पाहणं इंटरेस्टींग असेल.


वेबसीरिजनंतर आता सैफला टीव्ही सीरियलचे वेध


फोटो सौजन्य - Instagram