टीव्हीवरील ‘या’ आदर्श सुनेने दाखवलाय पहिल्यांदाच बोल्ड अंदाज

टीव्हीवरील ‘या’ आदर्श सुनेने दाखवलाय पहिल्यांदाच बोल्ड अंदाज

लहान पडदा आणि त्यावरील मालिका म्हटलं की त्यातील सुनांना नेहमीच आदर्श असल्याचं दाखवण्यात येतं. अशा या आदर्श सुना असलेल्या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात मात्र बोल्ड आणि ब्युटीफूल आहेत. पण त्यातही सध्या जास्त चर्चेत असलेली ‘आदर्श बहू’ म्हणजे हिना खान. हिना खान सध्या तिच्या फॅशन सेन्स आणि इतर गोष्टींसाठीही खूपच चर्चेत असते. हिनाने नुकतचं एक बोल्ड फोटोशूट केलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. हिनाचे असंख्य चाहते आहेत. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून हिनाने टीव्हीवर पदार्पण केलं. अक्षराच्या भूमिकेत हिनाला चाहत्यांचं खूपच प्रेम मिळालं. त्यानंतरही हिनाने आपल्या यशाची घोडदौड सुरूच ठेवली आहे. हिना नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. आपले अनेक फोटोज ती पोस्ट करत असते. त्याचप्रमाणे तिने आता हे नवे बोल्ड फोटो पोस्ट केल्यानंतर तिच्या या फोटोवर अनेक कमेंट्स येत आहेत. 

ब्लॅक नाईट वेअरमधील हॉट हिना

हिना खानने नुकत्याच केलेल्या या फोटोशूटमध्ये ब्लॅक नाईट वेअर घातला आहे. लेस नेकलाईनच्या या स्ट्रेपी नाईटीमध्ये हिनाचा लुक खूपच ग्लॅमरस आणि हॉट आहे. तसंच तिने यासह मॅचिंग सॅटिन कव्हरदेखील घेतलं आहे. जे तिच्या हातात दिसून येत आहे. हिनाचे हे ब्लॅक अँड व्हाईट फोटोज सध्या व्हायरल होत आहेत. तसंच केसांचं पार्टिशन करून कर्ल काढलेले हिनाचे केसही या फोटोमध्ये तिचं सौंदर्य अधिक खुलवून आणत आहेत. तिच्या या फोटोनंतर हॉट, स्टनिंग, बोल्ड, ग्लॅमरस अशा बऱ्याच कमेंट्स तिच्या इन्टाग्रामवर चाहते करत आहेत. 

कान्समध्ये दिसला कोमोलिकाचा जलवा

कंट्री ऑफ ब्लाईंडचा लुक केला होता पोस्ट

काही दिवसांपूर्वीच हिना खानने आपला इंडो-हॉलीवूड चित्रपट कंट्री ऑफ ब्लाईंडचा पहिला लुक शेअर केला होता. यामध्ये हिना एका आंधळ्या मुलीची भूमिका साकारत आहे. पण असं असूनही ती यामध्ये तीर चालवताना दिसत आहे.  याशिवाय हिना सध्या विक्रम भट्टच्या चित्रपटातही काम करत आहे. काही दिवासंपूर्वीच हिनाने ‘कसौटी जिंदगी की’ ही एकता कपूरची मालिकादेखील यासाठी सोडली. हिनाने यामध्ये कमोलिकाची नकारात्मक भूमिका साकारली होती. या भूमिकेतही हिनाच्या चाहत्यांनी तिला प्रचंड प्रेम दिलं. हिना सध्या ज्या भूमिका करत आहे त्या प्रत्येक भूमिकेसाठी तिचं कौतुक होत आहे. त्याव्यतिरिक्त तिने ‘खतरों के खिलाडी’ आणि ‘बिग बॉस’ या दोन्ही रियालिटी शो मध्ये आपला दबदबा दाखवून दिला आहे. 

कसौटीतून कुठेही जाणार नाही कमोलिका, एकता कपूरचा खुलासा

कान्समध्येही हिनाचा होता सहभाग

हिना खानने यावर्षीच्या कान्समध्येही आपला सहभाग नोंदवला होता. हिना खानच्या लुकमुळे ती चर्चेत आली होतीच. पण त्याव्यतिरिक्त एका मॅगझिनच्या संपादकांनी हिनाला यावेळी हिणवल्याबद्दलही तिची अनेक सेलिब्रिटीजने बाजू घेतली होती. पण या सगळ्याकडे लक्ष न देता हिनाने केवळ आपल्या कामाकडे लक्ष देत कान्समध्येही सगळ्यांचं मन जिंकलं. इतकंच नाही यावेळी तिने प्रियांका चोप्रा आणि निक जोन्ससहदेखील आपले फोटो पोस्ट केले होते. हिना सध्या वेगवेगळया प्रोजेक्टवर काम करत असून व्यक्तीगत आयुष्यासाठीही चर्चेत असते. तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल हादेखील हिनाला नेहमी साथ देताना दिसतो.

'कसौटी जिंदगी की ’ मालिका सोडल्यानंतर हिना खान कुटुंबासोबत मालदीवमध्ये