मालिका कसौटी जिदंगी के 2 मध्ये सध्या मिस्टर बजाजची मावशी आणि त्याची मुलगी तन्वी या प्रेरणाच्या आयुष्यात ढवळाढवळ करून तिला त्रास देत आहेत. तर दुसरीकडे अनुराग प्रेरणाला परत मिळवण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये लवकरच मालिकेत जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. अनुराग आणि मिस्टर बजाजमधील वैर एक वेगळंच वळण घेणार आहे.
या मालिकेच्या Kasautii Zindagii Kay 2 नव्या प्रोमोनुसार अनुरागला प्रत्येक वेळी नीचा दाखवण्यासाठी मिस्टर बजाज आता कोमोलिकाची मदत घेणार आहेत. नव्या प्रोमोनुसार अनुराग प्रेरणा सांगतो की, तिने फक्त अनुरागचं प्रेम पाहिलं आहे. आता त्याचा वेडेपणा पाहा. तर कोमोलिका मिस्टर बजाजला सांगताना दिसत आहे की, ज्या माणसाने मला बरबाद केलं. त्याला मी कसं सोडेन.
कोमोलिकाच्या भूमिकेबाबत बोलायचं झाल्यास हिना खान पुन्हा एकदा या मालिकेत रि-एंट्री करणार आहे. मध्यंतरी तिने बॉलीवूड प्रोजेक्टमुळे मालिकेतून ब्रेक घेतला होता. हिना या महिन्याच्या अखेरीस विक्रम भट्टचा सिनेमा हॅक्डचं ही शूटींग सुरू करणार आहे. या चित्रपटात हिनासोबत दिसणार आहे रोहन शाह. रोहन या चित्रपटात तिच्या ऑब्सेस्ड प्रियकराच्या भूमिकेत दिसणार आहे.
मालिका कसौटी जिंदगी के 2 मध्ये एकीकडे मिस्टर बजाजच्या सोबतीला कोमोलिका आहे तर दुसरीकडे अनुरागच्या सपोर्टसाठी अजून एका सौंदर्यवतीची एंट्री मालिकेत होणार आहे. ही सौंदर्यवती दुसरी तिसरी कोणी नसून ही आहे मिस्टर बजाजची एक्सवाईफ. सध्या या भूमिकेसाठी ऑडीशन्स सुरू आहेत. मग तुम्ही आहात उत्सुक Parth Samthaan आणि Erica Fernandes च्या या मालिकेतील नव्या वळणाबाबत. आम्हाला नक्की कळवा.