ADVERTISEMENT
home / Women's Day
Womens Day Special : हिरकणी येतेय तुमच्या घरी

Womens Day Special : हिरकणी येतेय तुमच्या घरी

8 मार्चला जगभरात महिला दिन साजरा केला जातो! स्त्रीशक्तीचा जागर करण्याचा हा दिवस. या दिनाचे औचित्य साधून इतिहासातल्या एका रणरागिणीवर आधारित असलेल्या हिरकणी या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर सोनी मराठी या चॅनलवर होणार आहे. आपल्या तान्ह्या बाळाच्या ओढीने व्याकुळलेल्या हिरकणीच्या शौर्याची ही गाथा आहे. आपल्या बाळासाठी रायगडाचा अतिकठीण कडा उतरणारी हिरकणी ध्येयाने झपाटलेल्या स्त्रीशक्तीचं नेतृत्व करते. जेव्हा हा सिनेमा आलेला तेव्हा तुम्हाला पाहायचा राहिला असेल किंवा पुन्हा पाहायचा असेल तर तुमच्यासाठी खास संधी आहे महिला दिनी.

आजची स्त्रीही खरी हिरकणी

आजच्या काळात घर आणि करिअर अशी तारेवरची कसरत करत स्वतःची आवडही जपणारी प्रत्येक स्त्री या हिरकणीइतकीच सामर्थ्यवान आहे. आई, मुलगी, बहीण, पत्नी अशा कैक भूमिका साकारणारी स्त्री ही स्वयंसिद्धा आहे. ‘ती’च्या असण्याने जग समृद्ध आहे. स्त्री ही आदिमाता आहे, जननी आहे. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आणि सर्व क्षेत्रात नाव कमवत आहेत. चूल आणि मूल या चौकटीतून स्वतःला बाहेर काढून घराबरोबरच स्वतःची ओळख जपणारी स्त्री ही आजच्या काळातील खरी हिरकणी आहे.

हिरकणीचं साहस

Instagram

ADVERTISEMENT

घरी भुकेलेल्या आपल्या तान्ह्या बाळासाठी हिरकणी आपल्या जिवाची पर्वा न करता रायगडाचा रौद्र कडा उतरली होती. आपल्या बाळासाठी हिरकणीने दाखवलेल्या या सामर्थ्याची दखल खुद्द छत्रपती शिवाजीमहाराजांनी घेतली आणि तिच्या शौर्याला सलाम म्हणून त्या कड्याच्या जागी बांधलेल्या बुरुजाला ‘हिरकणी बुरूज’ हे नाव दिले. इतिहासातल्या या घटनेवर आधारित चित्रपट हिरकणी आहे. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने हिरकणीची भूमिका ताकदीने साकारली आहे. तर अभिनेता प्रसाद ओक आणि अमित खेडेकर हेही मुख्य भूमिकेत आहेत. अभिनेता प्रसाद ओकने हिरकणीमध्ये अभिनयासोबत दिग्दर्शनही केलं आहे. कच्चा लिंबू या चित्रपटानंतर त्याने दिग्दर्शित केलेला हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने इतिहासातील ही कणखर आई प्रेक्षकांसमोर आली. या चित्रपटासाठी खास सुप्रसिद्ध गायिका आशा मंगेशकर यांनी खास आईची आरतीही गायली होती. तसंच या चित्रपटातील पोवाड्यात तब्बल 9 मराठी कलाकार आणि 6 लोककला प्रकारांचाही समावेश होता. असा भव्यदिव्य हा पोवाडा शूट करण्यात आला होता.

स्त्री शक्तीचा जागर

सोनी मराठी वाहिनीने देखील आपल्या मालिकांमधून स्त्रीची कणखर बाजू दाखवण्याचा सतत प्रयत्न केला आहे. सोनी मराठी वाहिनी नेहमीच वेगळ्या धाटणीच्या मालिकांमधून स्त्रियांना मानवंदना देत असते. मग ती स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या जिजामाता ही मालिका असु दे किंवा स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई सोनी मराठी वाहिनीच्या मालिकांनी सतत स्त्री शक्तीला महत्व दिलं आहे. अशा स्त्रीशक्तीचा जागर आपणही करू या. तेव्हा या स्त्रीसामर्थ्याचे मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या ‘हिरकणी’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर नक्की पाहा ‘महिला दिन विशेष’ ८ मार्च रोजी दु. १ वाजता आणि संध्या. ७ वाजता. या मराठी वाहिनीवर.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

 

ADVERTISEMENT

हेही वाचा –

महिलांना #Insurance ची गरज का आहे

नोकरी करणाऱ्या महिलांनी गरोदरपणी अशी घ्यावी स्वतःची काळजी

04 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT