हिंदी चित्रपटांना टक्कर देत ‘हिरकणी’ महाराष्ट्रभर हाऊसफुल्ल

हिंदी चित्रपटांना टक्कर देत ‘हिरकणी’ महाराष्ट्रभर हाऊसफुल्ल

‘हिरकणी’ची कथा तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण ती पडद्यावर साकारण्याचं स्वप्नं प्रसाद ओक आणि सोनाली कुलकर्णीने पूर्ण केलं. यंदाची दिवाळी ऐतिहासिक आणि मराठमोळी पद्धतीने साजरी करण्यासाठी प्रसाद ओक यांनी माऊलीच्या धैर्याची गोष्ट सांगणारा ‘हिरकणी’ हा सुंदर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘हिरकणी’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या अगोदरच प्रेक्षकांची चित्रपटाप्रती उत्सुकता वाढवली होती. त्यामुळे कधी हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि बघायला जातोय अशी भावना अनेकांची होती. ‘हिरकणी’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी इतकी गर्दी केली की चित्रपटाच्या तिकीटगृहावर हाऊसफुल्लची पाटी झळकली. हिंदी चित्रपटांना टक्कर देत हिरकणीने सगळीकडे हाऊसफुल्लची पाटी झळकवली आहे. पुन्हा एकदा मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आले असं म्हणायला काहीच हरकत नाही. 

हिरकणीची घोडदौड चालूच

‘हिरकणी’ ज्या आठवड्यात प्रदर्शित झाला त्या आठवड्यात मराठी आणि हिंदी असे एकूण 5 चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या दिवाळी सेलिब्रेशनसाठी पाच चित्रपटांची मेजवाणी मिळाली. पण अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी मराठी चित्रपटाला प्राधान्य दिले. ‘हिरकणी’ चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला आणि लगेच काही दिवसात, महाराष्ट्रभरात सोमवारी 150 आणि मंगळवारी सुद्धा 150 पेक्षा जास्त शोज् हाऊसफुल्ल झाले. इतकेच नव्हे तर एका दिवसात 70 पेक्षा जास्त शोज् वाढले आणि महाराष्ट्रात अनेक थिएटर्स देखील वाढले आहेत. रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि ‘हिरकणी’ला मिळालेल्या या यशामुळे ख-या अर्थाने यावर्षीची दिवाळी मराठमोळ्या पद्धतीने साजरी झाली असे म्हणता येईल. 

‘हिरकणी’ येत आहे प्रेक्षकांचं मन जिंकायला...
 

सोनालीने साकारलेली ‘हिरकणी’ प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली

सोनाली कुलकर्णीने साकारलेली ही हिरकणी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली असून पुन्हा एकदा सोनालीने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे. प्रसाद ओकने पुन्हा एकदा दिग्दर्शनाची अप्रतिम चुणूक दाखवत या चित्रपटाला योग्य न्याय दिला आहे असं म्हणावं लागेल. सोनालीने याविषयी आपला अनुभव ‘POPxo मराठी’बरोबरदेखील शेअर केला होता. रायगडावर केलेलं शूट. तिथले अनुभव तिने आपल्या प्रेक्षकांशी शेअर केले होते. अगदी वर्षभर तिने त्यासाठी पार्लरमध्ये जाणंही टाळलं होतं हे तिने कटाक्षाने सांगितलं. तिने हिरकणीसाठी घेतलेली मेहनत आता पुन्हा एकदा रंग दाखवत आहे. इतकंच नाही तर तिच्याबरोबरील अन्य कलाकारांनीही अत्यंत उत्तम काम करत दिलेली कामगिरी लिलया पेलली आहे यात वाद नाही. 

‘हिरकणी’च्या कथेने भारावून गेलो…

प्रसाद ओकचे अप्रतिम दिग्दर्शन

‘कच्चा लिंबू’ या चित्रपटानंतर प्रसाद ओककडून प्रेक्षकांच्याही अपेक्षा वाढल्या होत्या. हिरकणी प्रदर्शित झाल्यानंतर त्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत आहे. प्रसाद ओकने पुन्हा एकदा अप्रतिम दिग्दर्शन करत या चित्रपटाच्या कथेला योग्य न्याय दिला आहे. त्यामुळे सध्या चित्रपट अगदी जोरात असून प्रेक्षकांचा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद लाभत आहे असं म्हणावं लागेल. शिवाय मॅगीज पिक्चर्स यांच्या सहकार्याने इरादा एंटरटेनमेंटने या चित्रपटाची निर्मिती केली असून राजेश मापुस्कर हे या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रॉड्युसर आहेत. लॉरेन्स डिसुझा या चित्रपटाचे सहनिर्माते असून फाल्गुनी पटेल या निर्मात्या आहेत. त्या काळातील कथा पडद्यावर आणण्याासाठी सगळ्यांच्याच प्रयत्नांना यश आले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Film Review : महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण पान सादर करणारी 'हिरकणी'

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.