ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
‘हिरकणी’च्या कथेने भारावून गेलो…

‘हिरकणी’च्या कथेने भारावून गेलो…

‘हिरकणी’ म्हटलं की सर्वप्रथम आठवते ते म्हणजे शाळेतील इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील गोष्ट आणि ती गोष्ट आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. यामुळे सर्वत्र केवळ ‘Hirkani’चीच चर्चा चालू आहे. याला अपवाद आता बॉलीवूडही राहिलं नाही. कोजागिरीच्या रात्री हिरकणीने तिच्या बाळाच्या भेटीसाठी रायगडाची खोल कडा उतरुन जाण्याचं धाडस केलं होतं. हिरकणीची झलक दाखवण्यासाठी या चित्रपटाच्या टीमने कोजागिरीचा दिवसच निवडला होता. कोजागिरीच्या दिवशीच या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे या चित्रपटाचा ट्रेलर माधुरी दीक्षित आणि अजय देवगण यांना देखील आवडला आणि  त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर देखील केला. 

अंगावर काटा आणणारं ट्रेलर

ही गोष्ट आहे रायगडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या साध्या गवळण हिरा उर्फ ‘हिरकणी’ या धाडसी आईची. सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे कोजागिरीच्या रात्री आई हिरकणी गडावर आणि लेकरु घरी एकटे असते. आपले बाळ घरी एकटे असेल, भुकेले असेल या विचाराने व्याकूळ झालेली हिरकणी कोजागिरीच्या रात्री गड उतरुन खाली जाण्याची जोखीम उचलते. ती अशा परिस्थितीत हे धाडस करते, ज्याचे वर्णन करण्यात “जिथून फक्त पाणी खाली जाऊ शकते आणि वारा वर येऊ शकतो.” असे करण्यात आले आहे.

गड उतरताना हिरकणीला कोणत्या-कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो याची झलक ट्रेलर मध्ये दाखवण्यात आली आहे. तसेच ‘हिरकणी’ची भूमिका अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अतिशय सुंदररित्या साकारली आहे. हिरकणीच्या चेह-यावरील आनंद, नाराजी, हास्य, काळजी, प्रेम सोनालीने खूप छान पध्दतीने दाखविल्या आहेत. अभिनेता अमित खेडेकरने ‘जीवा’ व्यक्तिरेखेची भूमिका साकारली आहे. ऐतिहासिक कथा, कलाकारांची नवीन जोडी, चित्रपटातील गाणी आदी गोष्टींमुळे ‘हिरकणी’ चित्रपटाविषयी उत्सुकता वाढणार यात मुळीच शंका नाही.

महाराष्ट्राचा इतिहास आहे सुवर्ण

अजय देवगणने ट्विटरवर प्रसाद ओक दिग्दर्शित ऐतिहासिक मराठी चित्रपट ‘हिरकणी’ चा ट्रेलर शेअर केला आणि त्यासोबत लिहीलं की, मी मातृत्वाच्या या धाडसी कथेबद्दल ऐकलं आहे. ‘हिरकणी’ चं ट्रेलर शेअर करताना मला खूप आनंद होत आहे.”

ADVERTISEMENT

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण लवकरच त्याचा चित्रपट ‘तानाजी’ घेऊन येत आहे. हा चित्रपट 17 व्या शताब्दीतील छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती आणि शूर योद्धा तानाजी मालुसरे यांच्या शौर्यावर आधारित आहे. या चित्रपटाबाबत बोलताना अजय देवगणने सांगितलं की, ‘तानाजी’ च्या शूटींगची तयारी करताना शानदार मराठी इतिहासाबाबत बरंच काही जाणून घेता आलं. हा एक पीरियड ड्रामा आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊत करत आहे. या चित्रपटात अजयसोबतच काजोलही असणार आहे.

दिवाळीत भेटीला येतेय ‘हिरकणी’

‘हिरकणी’ चित्रपटाचं लिखाण चिन्मय मांडलेकर यांनी केलं आहे. मागीज पिक्चर्स यांच्या सहकार्याने इरादा एंटरटेनमेंटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. फाल्गुनी पटेल या निर्मात्या आणि लॉरेन्स डिसूझा हे सहनिर्माते आहेत. राजेश मापुस्कर हे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आहेत. २४ ऑक्टोबरला दिवाळीची मनोरंजक भेट म्हणून ‘हिरकणी’ येतेय तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

हेही वाचा –

ADVERTISEMENT

बॉलीवूड अभिनेत्री रायमा सेन करतेय मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला

नव्या वर्षात ५ चित्रपट उलगडणार देशाचा इतिहास

14 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT