सासू-सुनेचं भांडण मागे पडून या मालिका होत आहेत लोकप्रिय

सासू-सुनेचं भांडण मागे पडून या मालिका होत आहेत लोकप्रिय

टीव्ही मालिकांतील हिंदी चॅनेल्सवर आजही सास-बहू ड्रामा लोकप्रिय असले तरी मराठीमध्ये मात्र प्रेक्षकांची आवड आता बदलली आहे. कारण सध्या मराठी मालिकांमध्ये पसंती मिळते आहे ती ऐतिहासिक आणि पौराणिक मालिकांना. टीव्हीवरील मालिकांच्या लिस्टवर नजर टाकली असता सध्या प्रत्येक मराठी चॅनेलवर एकतरी ऐतिहासिक किंवा पौराणिक मालिका दिसत आहे. मुख्य म्हणजे या मालिका प्राईमटाईमला असून प्रेक्षकांनी टीआरपीच्या शर्यतीत त्यांनाच कौल दिला आहे. POPxoMarathi ने नुकत्याच घेतलेल्या एका पोलमध्ये प्रेक्षकांनी पुढील मालिकांना पसंती दिली आहे. या पोलमध्ये सर्वात जास्त पसंती मिळाली ती स्वामिनी, स्वराज्यरक्षक संभाजी आणि स्वराज्यजननी जिजामाता या ऐतिहासिक मालिकांना. याच निमित्ताने छोट्या पडद्यावरील या ट्रेंडवर टाकलेली एक नजर. 

स्वराज्यरक्षक संभाजी

ऐतिहासिक मालिकांमध्ये सर्वात आधी सुरू झालेली आणि अजूनही लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे स्वराज्यरक्षक संभाजी. संभाजीराजांचे रूप आणि इतिहास या मालिकेत दाखवण्यात आला असून प्रमुख भूमिकेत डॉ. अमोल कोल्हे आहेत. या मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत कार्तिक केंढे. या मालिकेने एप्रिलमध्येच 500 भागांचा टप्पा पार केला असून आजही मालिका टीआरपीमध्ये कायम आहे. या मालिकेतील अनेक कलाकारांना आता चांगलीच लोकप्रियता मिळाली असून यातील एका कलाकाराला तर हॉलीवूड चित्रपटातही भूमिका मिळाली आहे.

स्वामिनी

ही मालिका अगदी काही दिवसांपूर्वी सुरू झाली असली तरी तिला पहिल्या दिवसापासूनच चांगली पसंती मिळत आहे. घाडगे आणि सून या मालिकेच्या जागी स्वामिनी ही पेशव्यांचा इतिहास आणि मुख्यतः माधवराव-रमाबाई यांची प्रेमकथा दाखवण्यात येत आहे. या मालिकेत रिएलिटी शो सूर नवा ध्यास नवा मधील सृष्टीसेना म्हणजेच सृष्टी पगारे ही कंटेस्टंट प्रेक्षकांसमोर रमाबाईच्या भूमिकेत पहिल्यांदाच दिसत आहे. या मालिकेने पहिल्या आठवड्यातच चांगली लोकप्रियता आणि टीआरपी मिळवल्याचं दिसतंय. यात ऐश्वर्या नारकर, रोहिणी हट्टंगडी यासारखे लोकप्रिय आणि अनेक नवे कलाकारही आहेत. 

स्वराज्यजननी जिजामाता

'ललित 205' या मालिकेत दिसलेली अभिनेत्री अमृता पवार या मालिकेत जिजामातांच्या मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेतून स्वराज्याच्या जननी जिजामातांचा संपूर्ण प्रवास उलगडणार आहे. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे सर्वेसर्वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडण-घडणीत सगळ्यात मोठा वाटा राजमाता जिजाऊंचा होता. जिथे-जिथे स्वराज्याबद्दल बोललं जातं तिथे-तिथे या रयतेच्या राजाचा उल्लेख होतोच. आपली लढाई लढण्याचं बळ ज्या माऊलीमुळे शिवबाच्या पंखांमध्ये आलं ती जिजाऊ. सध्या या मालिकेत जिजाऊंच बालपण दाखवण्यात येतंय.

पौराणिक मालिकांमध्ये 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' प्रसिद्ध

एकीकडे ऐतिहासिक मालिका तर दुसरीकडे पौराणिक मालिकांनाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या पौराणिक मालिकांमध्ये सध्या सर्वात जास्त लोकप्रिय मालिका म्हणजे बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही मालिका. संत बाळूमामांच्या जीवनावर आधारित या मालिकेची मांडणी अत्यंत साधी पण प्रभावी आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीला या मालिकेतील बाळूमामा ही व्यक्तिरेखा पडत आहे. या मालिकेत बाळूमामांच्या भूमिकेत सुमीत पुसावळे आणि सत्यवाच्या भूमिकेत कोमल मोरे दिसत आहे.

 

सो...आता सासू-सूनांच्या भांडणाचा जमाना गेला आणि प्रेक्षकांची पसंती ऐतिहासिक आणि पौराणिक मालिकांना मिळतेय हेच खरं. मग तुम्हालाही आवडत आहेत का या मालिका. आम्हाला कळवा की, तुम्हाला अजून कोणत्या विषयांवर POPxoमराठीवर वाचायला आवडेल.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.