#StrengthOfAWoman : दीपिका पादुकोण, सोनम कपूरसारख्या अनेक बॉलीवूड अभिनेत्रींचा आहे वेगळा बिझनेस

#StrengthOfAWoman : दीपिका पादुकोण, सोनम कपूरसारख्या अनेक बॉलीवूड अभिनेत्रींचा आहे वेगळा बिझनेस

बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या चित्रपटांबरोबरच आपला स्वतःचा बिझनेस (business) अर्थात व्यवसाय चालवतात आणि इतकंच नाही त्या बिझनेस क्षेत्रातही अव्वल आहेत. यापैकी काही आता चित्रटाच्या दुनियेत टॉपवर आहेत, तर काही अभिनेत्रींनी एक काळ गाजवला होता. फक्त चित्रपटातच नाही तर या क्षेत्रातही या अभिनेत्रींनी आपलं स्वतःचं स्थान पक्कं केलं आहे. लवकरच महिला दिन येत आहे. त्यानिमित्ताने या अभिनेत्रींचा आम्ही एक आढावा घेतला आहे. तुम्हालाही नक्की या अभिनेत्रींबद्दल आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल जाणून घ्यायला आवडेल याची आम्हाला खात्री आहे. Happy Women's Day to all in advance.


दीपिका पादुकोण


Deepika Padukone- All About You


बॉलीवुडची राणी ‘पद्मावती’ अर्थात दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आपले चित्रपट आणि नवरा रणवीर सिंहवरील आपल्या प्रेमाव्यतिरिक्त तिच्या ब्रँडसाठीदेखील ओळखली जाते. दीपिका बऱ्याचदा आपला फॅशन ब्रँड ‘ऑल अबाउट यू- All About You’ चं फॅशन कलेक्शन सोशल मीडियावर शेअर करत असते. इतकंच नाही तर तिच्या ब्रँडला बाजारामध्ये चांगलीच मागणी आहे.


सोनम कपूर


Sonam Kapoor


Also Read Hobbies That Make Money In Marathi


बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) चित्रपटांमध्ये काम करण्याबरोबरच तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. तिने आपली बहीण रिया कपूरबरोबरच क्लोदिंग लाइन (Rheson) हा ब्रँड निर्माण केला असून या ब्रँडसाठी ती काम करते. सोनमचा ब्रँडही फॅशन ब्रँड असून बऱ्याच मोठ्या लोकांकडून तिच्या ब्रँडला मागणी आहे. शिवाय सोनम कपूरचा नवरा आनंद आहुजादेखील एक यशस्वी उद्योगपती असून त्याचेही फॅशन ब्रँड्स आहेत.


अनुष्का शर्मा


Anushka Sharma -Nush


अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही बॉलीवूडमधील हिट अभिनेत्रींपैकी एक असल्याचं नेहमीच म्हटलं जातं. अनुष्काचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊन असून तिचा स्वतःचा क्लोदिंग लाइन ‘नुष- Nush’ ब्रँडदेखील आहे. अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन हाऊस अन्वये आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे.


जूही चावला


Juhi Chawla
बॉलीवूड अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) आता चित्रपटामध्ये जास्त काम करत नाही. पण शाहरूख खानबरोबर जुहीने आपली आयपीएल टीम ‘कोलकाता नाइट राइडर्स- Kolkata Knight Riders’ विकत घेतली आहे. ही टीम शाहरूखबरोबर जुही शेअर करते. शिवाय नुकतंच जुहीला ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ मध्ये प्रेक्षकांनी पाहिलं होतं.


प्रिटी झिंटा


Preity Zinta
मागील काही वर्षांपासून प्रिटी झिंटा चित्रपटांपासून दूर आहे. प्रिटी झिंटा (Preity Zinta) लवकरच काही चित्रपटांमध्ये दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण बॉलीवूडपेक्षाही आपल्या बिझनेस करिअरसाठी प्रिटी जास्त चर्चेत असते. प्रिटीदेखील आयपीएल टीम ‘किंग्स इलेवन पंजाब’ची मालकीण असून बऱ्याच सीझनपासून प्रिटी हा बिझनेस करत आहे.


सुष्मिता सेन


Sushmita Sen
बॉलीवूडची सर्वात फिट अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आपल्या बॉयफ्रेंडच्या नावांसाठी चर्चेत तर असतेच. पण त्याशिवाय बिझनेसवुमन म्हणूनही सुष्मिताकडे पाहिलं जातं. सुष्मिताचं मुंबईमध्ये ‘बंगाली माशी- Bengali Mashi’ प्रसिद्ध आहे. या रेस्टॉरंटमध्ये सर्व प्रकारचे बंगाली पदार्थ मिळत असून हे रेस्टॉरंट प्रसिद्ध आहे.


मलाइका अरोरा- बिपाशा बासू


The Label Life
सहसा आपल्या कॅट फाईट्ससाठी अभिनेत्री प्रसिद्ध असतात असं म्हटलं जातं पण आता ट्रेंड बदलत आहे. मलायका अरोरा (Malaika Arora)  आणि बिपाशा बासू (Bipasha Basu) ने ऋतिक रोशन की एक्स पत्नी सुझान खानसह आपला फॅशन ब्रँड ‘द लेबल लाइफ- The Label Life’ लाँच केला आहे. याचं कलेक्शन खूपच लोकांना आवडतं. शिवाय मलायका अरोराने आपली योगा इन्स्टिट्यूट ‘दिवा’देखील लॉन्च केली आहे. मलायका फिटनेस फ्रीक असून तिचा हादेखील बिझनेस आहे.


शिल्पा शेट्टी


Shilpa Shetty Kundra
‘धड़कन’ गर्ल शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ने मोठा पडदा गाजवला आणि आता छोट्या पडद्यावर रियालिटी शो ची जज म्हणूनदेखील ती प्रसिद्ध आहे. याशिवाय शिल्पा युट्यूबवर आपल्या कुकिंग आणि योगा बुक्ससाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. शिल्पा अतिशय उत्कृष्ट योगा करते. तिच्या अनेक योगा सीडी उपलब्ध आहेत. याशिवाय शिल्पाचं मुंबईमध्ये एक स्पा सेंटर आणि क्लबदेखील आहे. शिल्पा एक उत्कृष्ट बिझनेसवुमन आहे.


ट्विंकल खन्ना


Twinkle Khanna
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) बरोबर लग्न केल्यानंतर ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) ने आपल्या बॉलीवूड करिअरला रामराम केला असला तरीही ट्विंकल अतिशय क्रिएटिव्ह असून ती एक लेखिका आहे. शिवाय ती इंटिरिअर डिझाईनिंग आणि कँडल बिझनेसमध्ये अग्रेसर आहे.


सनी लिओन


Suny Leone
बॉलीवूड अभिनेत्रीसनी लिओन (Sunny Leone) एक यशस्वी बिझनेसवुमन आहे. आपली फ्रेग्रन्स लाईन ‘लस्ट- Lust’ बरोबरच सनीने एक कॉस्मेटिक ब्रँडदेखील लाँच केला आहे. शिवाय एका अॅडल्ट ऑनलाईन स्टोअर‘IMBesharam.com’ की ब्रॅंड अँबेसेडरदेखील आहे. याशिवाय सनी लिओन PETA शी जोडली गेली आहे.


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर करणार एप्रिलमध्ये लग्न


महाशिवरात्रीनिमित्त ट्राय करा उपवासाच्या 'या' पौष्टिक रेसिपी


कंगनाच्या रडारवर रणबीर कपूर,राजकारणावरुन दिला टोमणा