ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘ह.म.बने तु.म.बने’ समजवणार ‘गुड टच आणि बॅड टच’

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘ह.म.बने तु.म.बने’ समजवणार ‘गुड टच आणि बॅड टच’

आजकाल आपल्या अवतीभोवती बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात. पण त्या गोष्टींमधून काय घेतलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहायला हवं किंवा स्वतःला कसं जपायला हवं हे समजणं गरजेचं आहे. विशेषतः लहान मुलांना या सर्व गोष्टींची जाण असणं गरजेचं आहे. हल्ली अनेक वाईट प्रकार लहान मुलांच्या बाबतीत घडत असतात आणि त्यामुळे लहान मुलांना त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी चांगला आणि वाईट स्पर्श नक्की काय असतो हे समजावणं गरेजचं आहे. हीच महत्त्वाची गोष्ट आता सोनी मराठी वरील‘ह.म.बने तु.म.बने’ मालिकेतून दाखवण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचा विषय जो आपल्या पाल्याच्या हितासाठी आहे, असा विषय या मालिकेत दाखवणार आहे आणि तो विषय म्हणजे ‘चांगला आणि वाईट स्पर्श कसा ओळखावा’.

PICTURE 1 %281%29

कसा हाताळणार विषय?  

पार्थच्या बाबतीत घडलेला एक प्रसंग आणि त्यामुळे हर्षदाच्या भूतकाळातील जागी झालेली कटू आठवण या कथानकावर आधारित एक एपिसोड प्रत्येकाच्या भल्यासाठी, सुरक्षिततेसाठी असणार आहे. एकेदिवशी पार्थ शाळेतून चॉकलेट खात-खात घरी येतो आणि तो सर्वांना सांगतो की त्याच्या एका मित्राच्या वडिलांनी तो नको म्हणत असतानाही आग्रहाने त्याच्या हातात चॉकलेट ठेवलं. तुलिका याकडे ब-यापैकी कौतुकाने बघते की पार्थ कसा सगळ्यांचा लाडोबा आहे आणि कसे प्रत्येकाला त्याचे लाड करावेसे वाटतात. पण याकडे हर्षदाचा बघण्याचा दृष्टिकोन जरा वेगळा आहे. कारण पार्थच्या या प्रसंगामुळे हर्षदाला तिच्या भूतकाळातील एक प्रसंग आठवतो जो तिला अस्वस्थ करुन टाकतो. कधीही आठवला जाऊ नये असा प्रसंग हर्षदाला आठवतो आणि तिच्या मनाची घालमेल सुरु होते. अस्वस्थता घालवून टाकण्यासाठी नेहमीच उपयोगीचा ठरतो तो म्हणजे ‘संवाद’.

ADVERTISEMENT

अस्वस्थ झाल्यास साधायला हवा संवाद

picture 4 %281%29

विचित्र, अस्वस्थ करणारे प्रसंग जेव्हा घडतात तेव्हा प्रत्येकवेळी आपण ते कोणाकडे शेअर करतोच असं नाही. ब-याचदा अशा प्रसंगावर बोलले जात नाही कारण मनात एक भीती दडलेली असते. जे झालं ते बदलू शकत नसलो तरी पण त्याविषयी कोणाकडे तरी बोलून आपण मोकळे होऊ शकतो. मनात ठेवण्यापेक्षा विश्वासू व्यक्तीजवळ हे जर उघडपणे बोललो तर मनाची घालमेल होत नाही. मुलांना काय चांगलं आणि काय वाईट हे चांगल्या संवादातूनच आपण पालक म्हणून समजावून द्यायला हवं.  ‘ह.म.बनेतु.म.बने’ मालिकेने नेहमीच वेगवेगळ्या विषयांतून समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यापैकीच हा एक विषय आहे, जो नक्कीच यापुढे अनेकांच्या उपयोग पडेल. हर्षदा आणि तुलिकाने आपल्या मुलांच्या बाबतीत जागरुक राहण्यासाठी कोणता स्पर्श कसा आहे हे कसं ओळखायचं याविषयी त्यांना स्पष्टपणे आणि मोकळेपणाने सांगितले. त्याचप्रमाणे आपणही आपल्या मुलांना व्यवस्थितपणाने या स्पर्शाची ओळख करून द्यायला हवी. कारण आजकाल मुलं अतिशय स्मार्ट असतात. शिवाय काही मुलं पटकन एकमेकांमध्ये मिसळून जातात. पण अशा स्पर्शांविषयी त्यांना जाणीव नसते. त्यामुळे कोणीही मुलांना सहज फसवू शकतं. लहान मुलांना फसवण्याचे प्रकार आजकाल खूप वाढत आहेत. त्यामुळे अशा स्पर्शाची जाणीव त्यांना वेळीच करून द्यायला हवी. 

हेदेखील वाचा 

ADVERTISEMENT

अभिनेत्री नूतन यांच्या स्मृतींना उजाळा देत प्रनूतनच्या ‘नोटबुक’ चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित

रॉम-कॉम ‘ती अँड ती’ टीमसोबतचा दिलखुलास संवाद

स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली माडेचं नवीन गाणं ‘माझ्या रानफुला’

24 Feb 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT