बॉलिवूडचा ऋतिक रोशन ठरला 2019 मधील 'सर्वात सेक्सी आशियाई पुरूष'

बॉलिवूडचा ऋतिक रोशन ठरला 2019 मधील 'सर्वात सेक्सी आशियाई पुरूष'

बॉलिवूड आणि स्टार्स दोघांसाठी यंदाचं वर्ष विशेष ठरलं आहे. या वर्षी कित्येक सिनेमे बॉक्सऑफिसवर झळकले आहेत. काही सिनेमांनी देशातच नाही तर परदेशातही रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. यादरम्यान नुकतंच इंटरनेटवर एक सर्व्हे करण्यात आला. यातही बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध स्टारनं आपली छाप सोडली आहे. 2019 तसंच या दशकातील ‘सर्वात सेक्सी आशियाई पुरूष’ (Sexiest Asian Men Of This Decade) म्हणून ऋतिक रोशनची निवड करण्यात आली आहे. लंडनमध्ये बुधवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एक ऑनलाइन सर्व्हेद्वारे ही माहिती समोर आली आहे. यापूर्वीही ऋतिकनं ‘ग्रीक गॉड’ खिताब पटकावला आहे. जगभरातून झालेल्या मतदान प्रक्रियेत ऋतिकला हे अव्वल स्थान मिळालं आहे. यावर प्रतिक्रिया देताना ऋतिकनं म्हटलं की, ‘ज्यांनी-ज्यांनी माझ्यासाठी मतदान केलं आहे, मी सर्वांचे आभार व्यक्त करू इच्छितो. मी कोणत्याही व्यक्तिला त्याच्या दिसण्यावरून पारखत नाही. म्हणूनच मी स्वतःच्या दिसण्याकडेही कधीही विशेष असं लक्ष दिलं नाही. मला कोणत्याही व्यक्तीचा प्रवास, त्याची कहाणी आकर्षित करते'. दरम्यान, या यादीमध्ये बॉलिवूड अभिनेता आणि 2017मधील विजेता शाहिद कपूर दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर टीव्ही अभिनेता विवियन डीसेना तर बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ टॉप 10 मध्ये एंट्री घेतली असून तो चौथ्या स्थानावर आहे. 

(वाचा : चर्चा तर होणारच! अर्जुनसंदर्भात सर्वांसमोर मलायकानं केलं मोठं विधान)

जगभरातील टॉप 5 हँडसम पुरुषांच्या यादीत हृतिक रोशन

यापूर्वी हृतिकनं जगातील ‘हँडसम’ पुरुषांच्या टॉप 5 यादीत स्थान मिळवलं होतं. इतकंच नाही तर जगभरातील हँडसम पुरुषांमध्ये त्याने ख्रिस इवान्स, डेव्हिड बॅकहम आणि रॉबर्ट पॅटीसन यांनाही मागे टाकलं. ‘Top 5 Most Handsome Men in the World in August 2019’ या यादीमध्ये हृतिकने पहिल्या अव्वल पाच क्रमांकामध्ये स्थान पटकावलं. यापूर्वी याच यादीमध्ये हृतिक सातव्या स्थानावर होता. त्यावेळी त्याने अभिनेता सलमान खानला या यादीमध्ये मागे टाकलं होतं. हृतिकचा अभिनय आणि त्याचा डान्स यावर अनेक चाहते फिदा आहेत. इतकंच नाही त्याच्या दिसण्याने आजही अनेक तरूणी घायाळ होतात. हृतिकने वयाच्या 45 व्या वर्षीदेखील फिटनेस अप्रतिम ठेवला आहे. अनेक अडचणींवर मात करत हृतिक या क्षेत्रामध्ये आला आणि त्याने या इंडस्ट्रीत सिद्ध केलं. इतकंच नाही तर इतके वर्ष आपलं स्टारडमही टिकवून ठेवलं आहे.

(वाचा : कमालच! 2 वर्षांची चिमुकली गातेय लतादीदींचं गाणं, सोशल मीडियावर धुमाकूळ)

चर्चा रामायण चित्रपटातील कलाकारांची

दरम्यान,  ‘वॉर’ आणि ‘सुपर 30’ सिनेमानंतर ऋतिक लवकरच ‘रामायण’ सिनेमामध्ये दिसणार आहे. आगामी सिनेमा ‘रामायण’ (Ramayana) हा हिंदू धर्मग्रंथावर आधारित आहे. हा सिनेमा नक्कीच बॉलिवूडच्या इतिहासात विशेष ठरेल असं वाटतंय. याचं प्रमुख कारण म्हणजे या सिनेमाचं हटके कास्टिंग. बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) या सिनेमा प्रभू रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सीतेची भूमिका साकारणार आहे. ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी बऱ्याच काळापासून त्यांचे चाहते उत्सुक होते. अखेरही ही जोडी ‘रामायण’ सिनेमाच्या माध्यमातून एकत्र झळकणार आहे.  

(वाचा : शरीर साथ देत नाही, आता निवृत्त झालं पाहिजे… बिग बींचा भावनिक ब्लॉग)

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.