कतरिना कैफच्या 'चिकनी चमेली'वर ऋतिक रोशनची जबरदस्त एक्शन, व्हिडिओ झाला व्हायरल

कतरिना कैफच्या 'चिकनी चमेली'वर ऋतिक रोशनची जबरदस्त एक्शन, व्हिडिओ झाला व्हायरल

ह्रतिक रोशन बॉलीवूडचा ग्रीक गॉड म्हणून प्रसिद्ध आहे. सहाजिकच फक्त बॉलीवूडच नाही तर संपूर्ण जगभरात त्याचे चाहते आहेत. ह्रतिक रोशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. ह्रतिक स्वतः सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेच पण त्याचे चाहतेदेखील त्याच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. एका फॅन क्लबवर शेअर केलेला ह्रतिक रोशनचा असाच एक अॅक्शन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यावर स्वतः ह्रतिकने 'हाहा नाईस' अशी कंमेट दिली आहे. पाहा कोणता आहे हा व्हिडिओ आणि काय आहे त्याची खास बात

काय आहे हा व्हिडिओ

ह्रतिक रोशन म्हणजे जबरदस्त डान्स आणि अॅक्शन असं समीकरणच आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये ह्रतिक चक्क कतरिनाच्या 'चिकनी चमेली' आयटम सॉंगवर जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरील युझर्स आणि फॅन्समध्ये खूप व्हायरल झाला आहे. ह्रतिक रोशन फन क्लब कोलकत्ता असं नाव असलेल्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. आश्चर्य म्हणजे ह्रतिक रोशनने स्वतः हा व्हिडिओ पाहिला आणि त्याला छान अशी कंमेट दिली. ह्रतिक रोशन हा चाहत्यांशी नेहमीच नम्रपणे वागतो. तो चाहत्यांनी पोस्ट केलेले असे व्हिडिओ फक्त पाहत अथवा लाईकच करतो असं नाही तर बऱ्याचदा तो त्याच्या सोशल हॅंडल वरून असे व्हिडिओ शेअरदेखील करतो.  चिकनी चमेली हे गाणं अग्रिपथ या चित्रपटातील आहे. ज्यामध्ये ह्रतिक रोशनने विजय दिनानाथ चौहान ही भूमिका साकारली होती.अग्निपथ चित्रपट 2012 साली प्रदर्शित झाला होता. या आयटम सॉंगवर कतरिना कैफने जबरदस्त डान्स केला होता आणि आता ह्रतिक या आयटम सॉंगवर जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. 

ह्रतिक रोशनचे आगामी चित्रपट

ह्रतिकने 2000 साली कहो ना प्यार है या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने अनेक हिट चित्रपट बॉलीवूडला दिले. 2017 साली काबिल चित्रपटात त्याने नेहमीपेक्षा हटके भूमिका साकारून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. त्यानंतर ह्रतिक रोशन टायगर श्रॉफ आणि वाणी कपूरसोबत वॉर या चित्रपटात शेवटचा दिसला होता. वॉर मधील ह्रतिकच्या अभिनय, अॅक्शनचे चांगलेच कौतुक झाले होते. मात्र या चित्रपटानंतर बराच काळ झाला तरी तो कोणत्याही चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तो लवकरच फराह खानच्या सत्ते पे सत्ता या चित्रपटातून दिसण्याची शक्यता आहे. सत्ते पे सत्ता हा अमिताभ बच्चन यांच्या सत्ते पे सत्ता या चित्रपटाचा रिमेक असणार आहे. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या त्यामुळे या चित्रपटात तो त्यापैकी नेमकी कोणती भूमिका साकारणार, शिवाय या चित्रपटाचे कथानक काय असणार अशी चर्चा सध्या सुरू आहे. असं असलं तरी याबाबत अजुनही कोणती अधिकृत माहिती निर्माते अथवा ह्रतिकने शेअर केलेली नाही. 

Instagram