हृतिक रोशन जगातील ‘हँडसम’ पुरुषांच्या यादीत अव्वल 5 मध्ये

हृतिक रोशन जगातील ‘हँडसम’ पुरुषांच्या यादीत अव्वल 5 मध्ये

बॉलीवूडमध्ये 2000 मध्ये पदार्पण केल्यानंतर हृतिक रोशनने कधीही मागे वळून पाहिलं नाही. तेव्हापासून तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनलेला हृतिक आजही त्याच्या चाहत्यांसाठी आणि इंडस्ट्रीसाठी ‘ग्रीक गॉड’ म्हणूनच प्रसिद्ध आहे. हृतिकने याआधीदेखील जगातील ‘हँडसम’ पुरुषांच्या यादीत नाव मिळवलं होतं. पण आता या यादीमध्ये टॉप 5 मध्ये हृतिकने स्थान मिळवलं आहे. इतकंच नाही तर जगभरातील हँडसम पुरुषांमध्ये त्याने ख्रिस इवान्स, डेव्हिड बॅकहम आणि रॉबर्ट पॅटीसन यांनाही मागे टाकलं आहे. हृतिकच्या चाहत्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. 

बालकलाकार ज्या आता दिसतात ‘ग्लॅमरस’, बघा ओळखता येतं का

ऑगस्ट 2019 च्या यादीत झालं प्रसिद्ध

‘Top 5 Most Handsome Men in the World in August 2019’ या यादीमध्ये हृतिकने पहिल्या अव्वल पाच क्रमांकामध्ये स्थान पटकावलं आहे. भारतासाठी आणि हृतिकसाठीदेखील ही गोष्ट नक्कीच अभिमानाची आहे. यापूर्वी याच यादीमध्ये हृतिक सातव्या स्थानावर होता. त्यावेळी त्याने अभिनेता सलमान खान याला या यादीमध्ये मागे टाकलं होतं. सलमान खानच्या नावाचादेखील या यादीमध्ये समावेश आहे. जगभरात हृतिकची अफाट प्रसिद्धी आहे आणि त्याचे लाखो करोडो चाहतेदेखील आहे. अजूनही बऱ्याच जणांचा हृतिक हा आदर्श आहे. हृतिकचा अभिनय आणि त्याचा डान्स यावर अनेक चाहते फिदा आहेत. इतकंच नाही त्याच्या दिसण्याने आजही अनेक तरूणी घायाळ होतात. हृतिकने वयाच्या 45 व्या वर्षीदेखील फिटनेस अप्रतिम ठेवला आहे. अनेक अडचणींवर मात करत हृतिक या क्षेत्रामध्ये आला आणि त्याने या इंडस्ट्रीत सिद्ध केलं. इतकंच नाही तर इतके वर्ष आपलं स्टारडमही टिकवून ठेवलं आहे. 

Movie Review : अशक्य स्वप्न पूर्ण करण्याची कहाणी ‘मिशन मंगल’

नुकतंच सुपर 30 मधून आला प्रेक्षकांच्या भेटीला

हृतिक रोशनचा नुकताच सुपर 30 प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही कमाल केली. हृतिकच्या कामाला नेहमीप्रमाणेच चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं. विकास बहलने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये हृतिकने आपल्या कसलेल्या अभिनेत्याची चुणूक दाखवली. यामध्ये जिनिअस आनंद कुमारची भूमिका हृतिकने अप्रतिम साकारली आहे. पुन्हा एकदा आपण काय आहोत हे हृतिकने दाखवून दिलं आहे. व्यक्तीगत आयुष्यातील चढउतारांपुढेही न डगमगता त्याने आपलं काम सुरुच ठेवलं आहे. तो त्याच आत्मविश्वासाने आणि त्याच डेडिकेशनने काम करत असल्याचं दिसून येत आहे. त्याचे सहकलाकारही नेहमी त्याच्या या स्वभावाची स्तुती करताना आढळतात. हृतिक जगातील बेस्ट डान्सरपैकी एक असूनही तो आपल्या प्रत्येक परफॉर्मन्सपूर्वी कसून सराव करतो असंही त्याचे सहकलाकार नेहमी सांगतात. कोणतीही गोष्ट मनापासून करण्यात हृतिकची हातोटी आहे आणि म्हणूनच आजही हृतिक अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे. 

प्रेक्षकांना ‘वॉर’ ची प्रतिक्षा

हृतिक रोशनचा लवकरच यशराज बॅनर अन्वये सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘वॉर’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यामध्ये त्याच्याबरोबर टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर दिसणार आहेत. याआधी हृतिकने जितके यशराजचे चित्रपट केले आहेत सर्व चित्रपट यशस्वी ठरले आहेत. या चित्रपटाचं टीझर प्रदर्शित झालं असून प्रेक्षकांना या चित्रपटाची प्रतिक्षा आहे. यामध्ये पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना हृतिक अॅक्शन अवतारात दिसणार आहे. ‘धूम’ चित्रपटानंतर पुन्हा एकदा हृतिकला अशा स्वरूपाच्या चित्रपटात बघण्याची चाहत्यांची इच्छा आता लवकरच पूर्ण होणार असून हा चित्रपट तामिळ आणि तेलुगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे. 

आजारी अवनीत कौरला भावाने हॉस्पिटलमध्ये दिलं ‘हे’ सरप्राईझ रक्षाबंधन गिफ्ट