सुझान खान ऋतिक रोशनच्या घरी परतली, ऋतिक झाला भावूक, शेअर केली पोस्ट

सुझान खान ऋतिक रोशनच्या घरी परतली, ऋतिक झाला भावूक, शेअर केली पोस्ट

ऋतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान खान यांना वेगळं होऊनही बरीच वर्ष झाली आहेत. पण त्यानंतरही हे दोघे आपल्या मुलांसाठी नेहमीच एकत्र येताना दिसतात. सध्या कोरोनाच्या काळात सर्वांंनाच एकमेकांची गरज आहे. याचसंदर्भात आपली पूर्वपत्नी सुझान खान हिच्याबद्दल ऋतिक रोशनने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या मुलांसाठी आपली पूर्वपत्नी घरी परत आली असून आपल्या मुलांना या अनिश्चित काळात त्यांच्या आई वडिलांंपासून दूर राहाव लागू नये म्हणून तिने हा निर्णय घेतल्याचंही त्याने सांगितलं आहे. देशासाठी हा अत्यंत कठीण काळ असून अनेक कुटुंबातील मुलांसाठी आणि कुटुंबांसाठीही हा अत्यंत कठीण काळ आहे. त्यामुळे अशावेळी आपल्या आई वडिलांसह मुलांनी असणं हे किती गरजेचं आहे हेच यातून ऋतिकला सांगायचं आहे. 

प्रेरणादायी गोष्ट मुलं नक्की सांगतील - ऋतिक रोशन

सध्या घातक कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्याशाठी 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. जगभरात सर्वच या परिस्थितीशी लढा देत आहेत. तर अशा या वातावरणात वेगळ्या झालेल्या आई - वडिलांसाठी एक प्रेरणादायी गोष्ट आता ऋतिक आणि सुझान या जोडीने केली आहे. आई वडील वेगळे झाल्यानंतर मुलांची कस्टडी एकाकडेच असते. पण असं असूनही ऋतिक आणि सुझान नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेताना दिसून आले आहे आणि ऋतिक रोशन वेगळे झाल्यानंतरही सुझानचा तितकाच आदर करतानाही दिसून येतो. त्याने सुझानच्या फोटोसह शेअर केलेल्या या पोस्टमधूनही हेच दिसून येत आहे. 

सेलिब्रिटीजवर आली आहे भांडी घासायची वेळ, लॉकडाऊनचा परिणाम

ऋतिकने लिहिली भावूक पोस्ट

ऋतिक रोशनने आपल्या मनातील भावना व्यक्त करत लिहिले की, ‘अशा परिस्थितीत आपल्या मुलांपासून दूर राहण्याचा विचार करणंही एखाद्या आई वडिलांसाठी अकल्पनीय आहे. संपूर्ण देश लॉकडाऊनच्या या परिस्थितीतून जात आहे.  अनिश्चित काळासाठी आणि काही महिन्यांसाठी सामाजिक दूरी ठेवणं आणि संभावित लॉकडाऊन दरम्यान संपूर्ण देशाला एकरूप होताना पाहणं हे खूपच संवेदनशील आहे.

जेव्हा संपूर्ण जग मानवतेसाठ  एकत्र होत आहे तेव्हा मला वाटतं की, मुलांची कस्टडी असणाऱ्या आई - वडिलांसाठीही ही वेगळीच भावना आहे. कोणत्याही पालकांचा अधिकार हा आपल्या मुलांवर समसमान असतो. त्यामुळे त्याचे उल्लंघन न होता आपल्या मुलांना कसं एकत्र ठेवयाचं हेदेखील महत्त्वाचे आहे. 

हा माझी प्रिय सुझान (माझी पूर्वपत्नी)चा एक फोटो आहे, जिने आपल्या घरून इथे येण्याचा निर्णय घेतला जेणेकरून आमची दोन्ही मुलं आम्हा दोघांपासून दूर राहू नयेत.

सहपालन करण्यात आपल्या दोघांच्याही आयुष्यात इतकी समजूतदारी दाखवल्याबद्दल सुझान तुझे खूप आभार

आपली मुलं तीच गोष्ट सांगतील जी आपण त्यांच्यासाठी निर्माण करू

मला आशा आहे आणि मी प्रार्थना करतो की, आपल्या आणि आपल्या प्रिय व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण सर्व अगदी मनापासून प्रेम, सहानुभूती, साहस आणि शक्तीचा योग्य  मार्ग निवडाल.’ 

बॉलीवूडने केलं लॉकडाऊनचं समर्थन

ऋतिकच्या या पोस्टने सेलिब्रिटीही झाले भावनाप्रधान

ऋतिकची ही पोस्ट नक्कीच बऱ्याच लोकांसाठी प्रेरणा आहे. ऋतिकने ज्या तऱ्हेने आपल्या पूर्वपत्नीसाठी ही पोस्ट लिहिली आहे त्यामुळे आपल्याप्रमाणेच सेलिब्रिटीही भावनाप्रधान झाले असून अनेकांनी ऋतिकच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. यामुळे ऋतिक आपल्या पूर्वपत्नीचा किती आदर करतो हेदेखील दिसून येते. 

ऑनलाईन अंताक्षरीने लावले सगळ्या सेलिब्सला वेड, तुम्ही ट्राय केले का?

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.