नेटफ्लिक्सवाल्यांनो येतेय नवी वेबसिरीज….हुमा कुरेशी दिसणार ‘लीला’मध्ये

नेटफ्लिक्सवाल्यांनो येतेय नवी वेबसिरीज….हुमा कुरेशी दिसणार ‘लीला’मध्ये

हुमा कुरेशीच्या चाहत्यांसाठी आहे खुशखबर! कारण लवकरच हुमा कुरेशी नेटफ्लिक्सवरील वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. वेबसिरीजकडे वळलेल्या अभिनेत्रींमध्ये आणखी एका अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे ते म्हणजे हुमा कुरेशीचे... नेटफ्लिक्सवर ‘लीला’ नावाची एक नवीन वेबसिरीज येत्या जूनपासून सुरु होणार आहे. स्वत: हुमा कुरेशीने या वेबसिरीजचे पोस्टर शेअर केले आहे. विशेष म्हणजे हुमा कुरेशीची ही पहिलीच वेबसिरीज असणार आहे. त्यामुळे हुमा कुरेशीच्या चाहत्यांनो आता अगदी काहीच दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.


कशी असणार ‘लीला’?


huma laila fi


मिळालेल्या माहितीनुसार हुमा कुरेशी या वेबसिरीजमध्ये शालिनी नावाचे कॅरेक्टर साकारणार आहे. तिचे लग्न एका मुस्लिम युवकासोबत होते. त्यांची मुलगी लीला अचानक गायब होते. तिचा शोध घेताना धार्मिक उन्मादाचा सामना करावा लागतो. तिला आलेल्या या त्रासाचीच कहाणी या वेबसिरीजमध्ये मांडण्यात आली आहे. या वेबसिरीजच्या पोस्टरमध्ये हुमा कुरेशीच्या डोळ्याला पट्टी बांधलेली दिसत आहे. ती कशाच्यातरी शोधात असून तिच्या वाट्यात काही गोष्टी अडथळा बनून आली आहे,असे दिसून येत आहे.


10 कारणांमुळे साऊथचा रिमेक 'कबीर सिंह' आहे इंटरेस्टिंग


दीपा मेहतांची आहे ही वेबसिरीज


लीला ही सुप्रसिद्ध निर्माती दीपा मेहता यांची वेबसिरीज आहे. फायर,अर्थ आणि वॉटर या सारख्या चित्रपटांसाठी त्यांना ओळखले जाते. त्यामुळे नेटफ्लिक्सवरील ही वेबसिरीज नक्कीच इंट्रेस्टींग असणार असे म्हटले जात आहे.कारण त्यांनी आधी दिलेले चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले आहे.


हुमा ठरेल का लक्की?

Subscribe to POPxoTV

जर तुम्हाला आठवत असेल तर अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटातून हुमा कुरेशीने इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवले होते. तिचा हा पहिलाच चित्रपट सुपरडुपर हिट झाला होत. त्यानंतरच तिला एकामागोमाग एक काम मिळाली होती. त्यामुळे आता या वेबसिरीजनंतर दीपा मेहता यांचीही ती लक्की चार्म बनणार का हे पाहायला हवे.


...आणि कसौटीतल्या कमोलिकाच्या डेड सीन झाला लीक


यादिवशी रिलीज होणार वेबसिरीज?


आता तुम्हाला वेबसिरीज पाहण्याची उत्सुकता असेल तर 14 जून रोजी ही वेबसिरीज रिलीज होणार आहे.  या सिरीजचा एक टीझर युट्युबवर शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे या वेबसिरीजची चर्चा सगळीकडे होताना दिसत आहे.


सिटी ऑफ ड्रिम्स ठरली सुपर हिट

तर दुसरीकडे राजकारणावर आधारीत सिटी ऑफ ड्रिम्स ही वेबसिरीज येऊन गेली. प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर, सचिन पिळगावकर, अतुल कुलकर्णी, संदीप कुलकर्णी अशी तगडीस्टारकास्ट या वेबसिरीजमध्ये होती. याचा सीझन 1 नुकताच रिलीज करण्यात आला. यातील अनेक गोष्टींची चर्चा झाली. विशेष म्हणजे प्रिया बापटचा तो लेस्बियन सीन... या सीनमुळे ती चर्चेत आली. याशिवाय यातील ग्रे शेडच्या भूमिकेत दिसलेले सचिन पिळगावकर आणि अतुल कुलकर्णी लोकांना अधिक भावले. या निमित्ताने सिद्धार्थचे एक वेगळे रुप यामध्ये पाहायला मिळाले.


(फोटो सौजन्य- Instagram)