ADVERTISEMENT
home / मनोरंजन
‘कितीतरी रात्री मी झोपू शकलो नाही’ – करण जोहर

‘कितीतरी रात्री मी झोपू शकलो नाही’ – करण जोहर

भारतीय क्रिकेट टीमचा ऑलराऊंडर हार्दिक पंड्या आणि के. एल. राहुलच्या कॉफी विथ करणमधील वक्तव्याच्या वादविवादानंतर पहिल्यांदाच करण जोहरने चुप्पी तोडली आहे. करण जोहरच्या चॅट शो मध्ये क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि के. एल. राहुल आले असता, त्यांच्या महिलांविरोधी वक्तव्याने बराच वाद वाढला होता. त्यानंतर हार्दिक पंड्या केवळ ट्रोलच नाही झाला तर दोघांनाही बीसीसीआयने निलंबित करून त्यांच्यावर कारवाई केली. इतका मोठा विवाद चालू असूनही दिग्दर्शक आणि या चॅट शो चा होस्ट करण जोहरने मात्र यावर कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं. पण पहिल्यांदाच करणने यासंदर्भात आपलं मौन सोडलं आहे.

वाचा – ‘दबंग 3’ च्या चुलबुलला टक्कर देणार साऊथचा सुपरस्टार खलनायक

करणने मागितली माफी

एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये करणने यासंदर्भात माफी मागितली आहे. शिवाय या सर्व गोष्टींची जबाबदारीही स्वीकारली आहे. या सगळ्या विवादांंमुळे आपण बऱ्याच रात्री झोपू शकलो नाही असंही या मुलाखतीमध्ये करणने सांगितलं. ‘मी केवळ इतकंच सांगू इच्छितो की,या सर्व गोष्टींना मी स्वतःला जबाबदार मानतो. कारण हा माझा चॅट शो आहे, माझा प्लॅटफॉर्म आहे. मी त्या दोघांनाही पाहुणे म्हणून माझ्या शो मध्ये बोलावलं होतं. त्यामुळे त्यांनी दिलेल्या कोणत्याही कमेंट्सची जबाबदारी ही सर्वस्वी माझी आहे. हा विवाद सुरु झाल्यानंतर कितीतरी रात्री मला झोप लागली नाही आणि मी हाच विचार करत राहिलो की, मी हे सर्व कसं काय भरून काढू शकतो. माझं म्हणणं कोण ऐकून घेईल. हे सगळं अशा वळणावर निघून गेलं की, माझ्या हातात काहीच राहिलं नाही. सर्व काही आऊट ऑफ कंट्रोल अर्थात नियंत्रणाबाहेर निघून गेलं. हे सर्व काही माझ्या शो मध्ये घडल्यामुळे मी मनापासून माफी मागत आहे,’ असं यावेळी करण जोहरनं सांगितलं.

ADVERTISEMENT

koffee with karan -6
करिअरसंदर्भात सर्वात जास्त करण दुःखी

करणने पुढे असंही सांगितलं की, इतर सेलिब्रिटींना जे प्रश्न विचारले जातात तेच या क्रिकेटर्सनादेखील विचारण्यात आले. इतकंच नाही तर महिला सेलिब्रिटींनादेखील अशाच प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात. त्यामुळे त्यांच्याकडून जे उत्तर येतं त्यावर त्याचं कोणतंही नियंत्रण असू शकत नाही. पोस्ट प्रॉडक्शनमध्ये अनेक महिला काम करतात पण त्यांना या उत्तरानं कोणताही प्रॉब्लेम नव्हता. हे प्रकरणं इतकं वाढेल याचा विचारही आमच्या मनात आला नाही. तर या दोन्ही क्रिकेटर्सबरोबर जे काही झालं त्याबद्दल आपल्याला अतीव दुःख असल्याचंही करणनं सांगितलं. करिअरसंदर्भात करणला सर्वात जास्त दुःख होत असल्याचं त्यानं या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. शिवाय ‘ लोकांचं म्हणणं आहे की, या विवादामुळे शो चे टीआरपी वाढलं आहे. पण मला त्याने काहीच फरक पडत नाही. इथे मला माझ्या आणि त्यांच्या करिअरची चिंता आहे. एका इंंग्लिश शो च्या टीआरपी रेटिंगमुळे कोणताही फरक पडत नसतो’ असंही करण यावेळी म्हणाला. या सर्व प्रकरणानंतर आता शो मध्ये येणाऱ्या सेलिब्रिटींना प्रश्न विचारतानाही दहा विचार करतो असंही करणनं यावेळी स्पष्ट केलं.

वाचा – खतरों के खिलाड़ी- 9: जिगर पे ट्रीगर घेण्यासाठी सेलिब्रिटींना किती मिळतात पैसे

hardik pandya

ADVERTISEMENT

यापूर्वीही बऱ्याच वेळी घडल्या आहेत कॉन्ट्रॉवर्सी

कॉफी विथ करणमध्ये नेहमीच येणाऱ्या सेलिब्रिटीजमुळे कॉन्ट्रॉवर्सी घडल्या आहेत. यापूर्वी दीपिका पादुकोणने रणबीरसंदर्भात केलेलं कंडोमचं वक्तव्य असो वा कंगना राणौतने बॉलीवूडमधील नेपोटिझमबद्दल केलेलं वक्तव्य असो. या सर्वामुळे नेहमीच मोठे वाद घडले आहेत. प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या मनात या विवादांनी नेहमीच घर केलं आहे. या सीझनमध्ये हा वाद घडल्यामुळे मात्र परिणाम जास्तच गंभीर झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 

वाचा – तर सपना चौधरी घेऊ शकते करीअर सोडण्याचा निर्णय

फोटो सौजन्य – Instagram 

ADVERTISEMENT

 

23 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT