स्टार किड्सने बॉलीवूडमध्ये प्रवेश करणं आता काही नवं राहिलेले नाहीये. पण त्यापैकी काहीच स्टार किड्स असे आहेत ज्यांनी लवकरात लवकर बॉलीवूडमध्ये यावं असं प्रेक्षकांनाही वाटत आहे आणि त्यापैकीच एक स्टारपुत्र आहे इब्राहिम अली खान. सैफ अली आणि अमृता सिंहचा मुलगा इब्राहिम हा दिसायला तर अतिशय सुंदर आहेच पण त्याच्या अभिनयाची झलकही आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवरून दिसून येत आहे. लॉकडाऊनच्या काळात घरात राहून सध्या इब्राहिम अली खान टिकटॉकवर व्हिडिओ करत आहे. त्याने नुकतेच टिकटॉक जॉईन केले असून वेगवेगळे व्हिडिओ बनवत आहे. याआधी आपली बहीण सारा अली खानबरोबर त्याचे #knock चे व्हिडिओदेखील बरेच व्हायरल झाले असून या दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूपच आवडते. इब्राहिम अली खान बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्याआधीपासूनच त्याचा फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. त्याचे व्हिडिओ खूपच आवडीने बघितले जात आहे.
इब्राहिम खानने एक मजेदार व्हिडिओ बनवला असून हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये इब्राहिमने अत्यंत चांगले एक्सप्रेशन्स देत अक्षयकुमारचा संवाद म्हटला आहे, ‘स्टाईल है बाबूभय्या स्टाईल’ त्यानंतर लगेच चष्मा लाऊन बाबूरावचा वेष घेतदेखील त्याने मजेशीर अंदाजात थोबाडीत देत म्हटले, ‘ये बाबूराव का स्टाईल है’. त्याचा हा अभिनय बघताना सैफ अली खान आणि अक्षय कुमार या दोघांच्याही जुगलबंदीची आठवण आल्याशिवाय राहात नाही. दोघांचेही मनोरंजन करण्याचे आणि कॉमेडी टायमिंग त्या काळात अफलातून होते. ही जोडी पडद्यावर हिट होती. इब्राहिमकडे बघूनही असेच वाटत आहे. इब्राहिमदेखील चांगली कॉमेडी करू शकेल असा अंदाज त्याच्या वागण्यातून आणि अभिनयातून नेहमीच दिसून येतो.
अनुराग कश्यपच्या 'बमफाड' मधून अजून एका स्टारकिडची बॉलीवूडमध्ये एंट्री
व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्या फॅन फॉलोईंगची आणि नेटिझन्सच्या प्रतिक्रियाही आल्या आहेत. एका युजरने ‘हा अभिनेता आहे हे तर अगदी कळून येत आहे’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने लिहिले, ‘बॉलीवूडमध्ये यायची पूर्ण तयारी झाली आहे’. इब्राहिम अली खान हा हुबेहूब सैफ अली सारखा दिसतो. त्याचा अभिनय बघून तर आता तो अगदी सैफसारखाच असल्याचा भास होतोय. लवकरात लवकर इब्राहिमने बॉलीवूडमध्ये पदार्पण करावे अशाही कमेंट्स सध्या होत आहेत. मात्र सैफने एका मुलाखतीमध्ये सांगितले होती की इब्राहिमला अभिनयापेक्षा क्रिकेटमध्ये जास्त आवड आहे. बऱ्याचदा त्याचे खेळतानाचे व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल होत असतात. पण त्याला हवं असेल तर बॉलीवूडमध्ये येऊ शकतो असंही त्यावेळी सैफ म्हणाला होता. आता त्याचे हे व्हिडिओ बघून आणि त्याचा अभिनय पाहता इब्राहिमने याचा विचार करायला नक्कीच हरकत नाही असे म्हणायला हवे. कारण त्याच्या मोठ्या बहिणीने सारानेही बॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण केले आणि फारच कमी कालावधीत आपले स्थान पक्के केले आहे.
सैफ आणि अमृताचा मुलगा इब्राहिम हा केवळ 19 वर्षांचा आहे. सर्वात प्रसिद्ध स्टारकिड्सपैकी एक त्याला म्हटले जाते. त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच त्याचा जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. त्यामुळे त्याने जर बॉलीवूडमध्ये पदार्पण केले तर त्याला नक्कीच चांगले भविष्य असेल असे त्याच्या चाहत्यांना वाटत आहे. आता येणारा काळच ठरवेल की इब्राहिम नक्की क्रिकेट की अभिनय यापैकी कशाची निवड करतो.