ADVERTISEMENT
home / आरोग्य
तुम्ही जर चहाचे चाहते असाल तर लक्षात ठेवा काही गोष्टी

तुम्ही जर चहाचे चाहते असाल तर लक्षात ठेवा काही गोष्टी

बऱ्याच लोकांना सकाळी उठल्या उठल्या सर्वात पहिल्यांदा कोणती गोष्ट हवी असते ती म्हणजे चहा. चहाशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. काही लोक तर चहाचे इतके चाहते असतात की, चहा अक्षरशः पाण्यासारखा पितात. तसं पाहायला गेलं तर चहा प्यायल्यामुळे शरीरामध्ये एक वेगळी स्फूर्ती आणि उत्साह येतो.  पण कोणतीही गोष्ट अति केली तर त्याचे परिणामही वाईट होत असतात हे तुम्हाला समजून घ्यायला हवं. चहाचंदेखील असंच आहे. तुम्ही दिवसातून जर तीन कपापेक्षा अधिक चहा पित असाल तर तुम्ही तुमही ही सवय वेळीच बदलण्याची गरज आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार चहा आपल्या शरीरातील इंद्रियांवर फारच वाईट प्रभाव टाकतो. यामधील कॅफिनमुळे बऱ्याच जणांना चहा पिण्याची सवय होते. जी अतिशय वाईट सवय आहे.

अति चहा प्यायल्यामुळे नक्की काय नुकसान होतं ते जाणून घेऊया –

1 –  ज्या व्यक्ती चहाचं अतिसेवन करतात त्यांना चहाची एकप्रकारे नशा असते. चहा हव्या त्या वेळेला न मिळाल्यास अशी माणसं चिडचिडी होतात. बऱ्याचदा अशा माणसांना अति राग येताना आणि चिडचिड करताना पाहिलं गेलं आहे. चहा न मिळाल्यास या व्यक्ती विचित्र व्यवहार करतात.

2 – जास्त चहा प्यायल्यामुळे दात पिवळे दिसू लागतात आणि त्याशिवाय दात अतिशय कमकुवत होतात.

3 – यामुळे पचनशक्तीक्रिया कमी होते

ADVERTISEMENT

4 – जास्त चहा पिण्यामुळे त्वचेचे आजार होऊन त्वचेवर अलर्जीदेखील होते

5 – चहा पिण्यामुळे झोप न येण्याची समस्यादेखील वाढते

गरम चहा पिण्याने होतं नुकसान

hot tea

तुम्हाला उकळता अर्थात अगदी वाफाळलेला चहा प्यायला आवडत असेल तर हीच ती वेळ आहे आताच ही सवय बदला. गरम गरम चहा हा तुमच्या शरीरातील मेटाबॉलिजम घटवतो आणि तुमची भूक मारून टाकतो. त्यामुळे अशा तऱ्हेने चहा प्यायल्यास, अल्सरची समस्या उद्भवते. शिवाय तुम्हाला तोंड येण्याची तक्रारही वाढते. इतकं नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेक्स करण्याची क्षमताही घटते. अमेरिकेमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात हे सिद्ध झालं आहे की, जास्त गरम चहा पिण्यानं गळ्यामध्ये कॅन्सर होण्याची शक्यताही असते. कारण अति गरम चहा प्यायल्यामुळे खाण्याच्या नळीत होणाऱ्या कॅन्सरचा धोका जास्त उद्भवतो. ईराण देशामध्ये चहाचं सेवन अति प्रमाणात केलं जातं. तिथले लोक मादक पदार्थांचं सेवन करत नाही. तरीही त्यांच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण आढळलं असून ते केवळ चहाच्या सेवनामुळे झालं असल्याचं आता समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

रिकाम्या पोटी चहा अजिबात पिऊ नका

जे लोक सकाळी उठून रिकाम्या पोटी चहा पितात त्यांना बऱ्याचदा या गोष्टीमुळे उलटी होते. तसंच त्यांच्या शरीरामध्ये अपचनाचा त्रास जास्त प्रमाणात होतो. या सगळ्या गोष्टीमुळे दिवसभर तुम्हाला असह्य होत राहतं. कधी कधी यामुळे उलटी, थकवा, चिडचिडेपणा, पोटदुखी यासारख्या समस्यादेखील उद्भवतात. त्यामुळे कधीही रिकाम्या पोटी सकाळी उठल्यावर चहा पिऊ नये. कितीही सवय असली तरीही ही सवय तुम्ही वेळच्यावेळी बदला.

mrn tea

चहा पिण्याची योग्य पद्धत

तुम्हाला जर चहा आवडत असेल तर तो पिण्याची एक पद्धत आहे. ही पद्धत अवलंबून तुम्ही बऱ्याच आजारांंपासून  वाचू शकता. नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा की, चहा जास्त गरम अथवा जास्त थंड असू नये.

1. तज्ज्ञांच्या सांगण्याप्रमाणेदेखील चहा उकळल्यानंतर तो कपात ओतेपर्यंत साधारणतः पाच मिनिटांचं तरी अंतर असावं. वास्तविक गॅसवरून चहा उतरवल्यानंतर लगेच कपात ओतून चहा पिणाऱ्या लोकांमध्ये कॅन्सरचा धोका बळावतो. तर दुसऱ्या बाजूला काही लोक असेही असतात जे चहा थंड करून पितात. अर्थात त्यांना कॅन्सरचा धोका नसतो. पण त्यामुळे शरीरामध्ये अॅसिडीटीचं प्रमाण वाढतं.

ADVERTISEMENT

2. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवसभरात तीन कपापेक्षा अधिक चहा पिऊ नये. इतकंच नाही तर, एकदा केलेला चहा पुन्हा पुन्हा गरम करून पिऊ नका. हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

3. तुम्ही जर सकाळी उठून रिकाम्या पोटी चहा पिणार असाल तर त्याबरोबर कोणतंतरी बिस्किट अथवा काहीतरी नाश्ता असणं गरजेचं आहे.

4. तुम्ही जर दोन वेगवेगळ्या चहाचे ब्रँड एकत्र करून चहा बनवत असाल तर तुम्ही चुकूनही असं करू नका. एका निष्कर्षानुसार, असं केल्यामुळे शरीरावर नशेप्रमाणे परिणाम होतो.

5. काही जण जेवणानंतर लगेच चहा पितात. पण असं करू नये. तसं तुम्ही करत असल्यास, तुमच्या शरीरातील असलेल्या आयर्नवर परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होतो आणि भूक मेल्यामुळे तुम्ही जास्त बारीक होता.

ADVERTISEMENT

हेदेखील वाचा – 

Green Tea : मनाला शांत आणि शरीराला निरोगी ठेवणाऱ्या ‘ग्रीन टी’चे फायदे

उन्हाळ्यात अजिबात खाऊ नका ‘या’ गोष्टी, होतो वाईट परिणाम

सकाळचा नाश्ता न केल्यास होऊ शकतात हे साईड इफेक्ट्स

ADVERTISEMENT
27 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT