रंगपंचमी खेळताना रंग डोळ्यात आणि नाका-तोंडात गेल्यावर करा 'हे' उपाय

रंगपंचमी खेळताना रंग डोळ्यात आणि नाका-तोंडात गेल्यावर करा 'हे' उपाय

रंगपंचमी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. मात्र रंगपंचमी खेळताना अनेकांना काही गोष्टींचे भान राहत नाही. होळीच्या शुभेच्छांसोबतच रंग लावताना चेहऱ्यावर तो विचित्र पद्धतीने लावला जातो. कधी रंग लावण्यासाठी नकार दिल्यामुळे तुमचे मित्रमंडळी बुरा मत मानो होली है म्हणत जबरदस्तीने तुम्हाला रंग लावतात. कृत्रिम रंग जेव्हा तुमच्या नाका-तोंडात जातात तेव्हा त्याचा परिणाम शरीरावर हानिकारक ठरू शकतो. या रंगामुळे तुमच्या डोळ्यांचे नुकसान होऊ शकते. कधी कधी रंग तोंडात गेल्यामुळे त्याचा चुकीचा परिणाम थेट तुमच्या पोट आणि फुफ्फुसांवर होतो. यासाठी शक्य असल्यास नैसर्गिक रंगानी सुरक्षित होळी खेळा. मात्र जर काही कारणाने तुमच्या नाका-तोंडात रंग गेलाच तर काय कराल हे अवश्य वाचा.


holi colors  n eyes


डोळ्यात रंग गेला तर काय कराल


जर खेळताना रंग तुमच्या डोळ्यात गेला तर सर्वात आधी स्वच्छ पाण्याने डोळे धुवा. डोळे धुताना डोळ्यातील पूर्ण रंग निघून जाईल याची काळजी घ्या. यासाठी पाणी चेहऱ्यावर अशा रितीने शिंपडा ज्यामुळे तुमचा त्रास कमी होईल. अती थंड अथवा अती गरम पाणी वापरू नका कारण त्यामुळे डोळ्यांना अधिक इजा होण्याची शक्यता असते. जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेंस वापरत असाल तर ते लगेच काढा. कॉन्टॅक्ट लेंस आणि चष्मा लावून रंगपंचमी कधीच खेळू नका. तसेच या दरम्यान डोळे मुळीच चोळू नका. डोळ्यामध्ये काही थेंब गुलाबपाणी टाका. शिवाय जास्त जळजळ होत असेल तर त्वरीत नेत्र तज्ञाचा सल्ला घ्या. कारण डोळे हा अतिशय नाजूक अवयव आहे. त्यामुळे डोळ्यांबाबत कोणताही हलगर्जीपणा करू नका.


holi colors  in eyes 1


वाचा - होळी स्पेशल रेसिपीज


नाका-तोंडात रंग गेल्यास काय कराल


जर रंगपंचमी खेळताना तुमच्या तोंडात रंग गेला तर लगेच स्वच्छ पाण्याने गुळण्या करा. तोंडात रंग गेल्यास तुमच्या शरीरात तो जाण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच पाण्याच्या फक्त गुळण्या करा पाणी पिऊ नका. तोंडात रंग गेल्यावर जर तुम्हाला उलटी अथवा चक्कर येत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. शिवाय रंग तोंडात जाऊ नये असे वाटत असेल तर रंगपंचमी खेळताना कोणत्याही खाद्यपदार्थांचे सेवन करू नका.


holi eyes


रंगपंचमी खेळताना दुखापत झाल्यास काय कराल


रंग लावल्यावर जर तुमच्या त्वचेवर अथवा एखाद्या अवयवावर खाज अथवा लालसर पुरळ उठले असेल तर त्याबाबत लगेच सावध व्हा. काहीजणांना त्रास झाल्यावर इतरांच्या आनंदावर विरझण नको म्हणून तसेच त्रास सहन करण्याची सवय असते. मात्र चुकूनही असे करू नका कारण याचे परिणाम दीर्घ काळ तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात. शिवाय जर तुम्हाला एखादी दुखापत अथवा जखम झाली तर ती जखम त्वरीत धुवून घ्या. जखमेवर एखादे अॅंटीसेप्टीक लावा. ज्यामुळे तुम्हाला इनफेक्शन होणार नाही.


सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अथवा तुमच्या जीवलग व्यक्तीला रंगपंचमी खेळताना दुखापत झाल्यास शांत रहा. जास्त पॅनिक होऊ नका कारण त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. शक्य असल्यास सुरक्षित रंगपंचमी खेळा आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा द्या. मात्र काही कारणाने तुम्हाला इजा झालीच तर त्यावर त्वरीत उपाय करा आणि भविष्यातील आरोग्य धोक्यापासून सुरक्षित रहा.


जाणून घेऊया रंगपंचमी सणाची माहिती


रंगपंचमी खेळण्याआधी आणि नंतर कशी घ्याल केस आणि त्वचेची काळजी


आपल्या राशीनुसार कोणत्या रंगाने होळी खेळायला हवी जाणून घ्या


Happy Holi Wishes in Hindi


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम