हटके अंदाजात रोहित शर्माने दिल्या मनीष पांडेला लग्नाच्या शुभेच्छा

हटके अंदाजात रोहित शर्माने दिल्या मनीष पांडेला लग्नाच्या शुभेच्छा

भारतीय क्रिकेट टीममधील मिडल ऑर्डर बॅट्समन मनीष पांडेने दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टी हिच्याशी मुंबईत लग्नगाठ बांधली. मुख्य म्हणजे लग्नाच्या एक दिवस आधी तो सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत होता. हे लग्न दाक्षिणात्य पद्धतीने पार पडलं. हा सोहळा दोन दिवस मुंबईत सुरू राहणार आहे. मनीष पांडेच्या लग्नाचा पहिला फोटो सनराईजर्स हैद्राबादने शेअर केला. 

मनीष पांडेला टीम इंडियाचा उपकप्तान रोहित शर्माने हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या. रोहितने मनीष आणि अश्रिताच्या लग्नाचे फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहीलं की, 'मी प्रार्थना करतो की, तुम्हाला जगातील सर्व आनंद मिळो. माझ्यावर विश्वास ठेव ही तुझ्या आयुष्यातील सर्वात बेस्ट इनिंग असेल.' यासोबतच रोहित शर्माने डोळे मारणारा इमोजीही टाकला होता.

कोण आहे अश्रिता शेट्टी?

View this post on Instagram

👼🏻

A post shared by Ashrita Shetty (@ashritashetty_) on

26 वर्षीय अश्रिता ही दाक्षिणात्या अभिनेत्री आहे. तिने 2012 मध्ये तेलुगू फिल्म 'तेलीकाडा बोल्ली' पासून तिच्या फिल्म करियरला सुरूवात केली. तामिळ चित्रपटातील इंद्रजीत, उधयम एनएच 4 सारख्या चित्रपटात तिने काम केलं आहे. 

ट्रॉफी जिंकल्यानंतर मनीषने दिली होती गोड प्रतिक्रिया

मनीषने रविवारी ट्रॉफी जिंकल्याव सांगितलं की, 'मी भारताच्या पुढच्या सीरीजसाठी तर उत्सुक आहेच. पण त्या आधी माझ्यासाठी एक महत्वपूर्ण सीरीज आहे. उद्या माझं लग्न आहे. ' मनीष रविवारी रात्री सूरतमध्ये कर्नाटकसाठी तामिळनाडू विरूद्ध सैयद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीसाठी खेळत होता. या सामन्यात आपल्या कॅप्टन्सीमध्ये त्याने टीमला हा किताब जिंकवून दिला आणि पुढच्याच दिवशी तो लग्नबंधनात अडकला. मनीष सध्या होम आणि इंटरनॅशनल दोन्ही स्तरांवर सातत्याने क्रिकेट खेळत आहे. लग्नाच्या एक दिवस आधी जिथे तो होम क्रिकेटमध्ये बिझी होता तर आता लग्नानंतर लगेचच तो वेस्टइंडीजविरूद्ध 6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या टी20 आणि वनडे सीरीजमध्ये टीम इंडियासोबत सहभागी होणार आहे.मनीष पांडे आणि अश्रिता शेट्टी या दोघांनाही #POPxoMarathi कडून लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.