आता Corona Virusवर बनणार चित्रपट,नावही झाले रजिस्टर

आता Corona  Virusवर बनणार चित्रपट,नावही झाले रजिस्टर

#coronavirus ने सध्या जगभराला विळखा घातला आहे. भारतात या आजाराचा शिरकाव झाल्यानंतर अनेक अशा गोष्टी घडल्या की, त्यामुळे या आजारांचे गांभीर्य लक्षात घेण्याऐवजी अनेकांनी या आजारावर एकापेक्षा एक मीम्स तयार करायला घेतले. आता या सगळ्यांचा उच्चांक म्हणजे आता या Corona virusवर चक्क चित्रपट तयार केला जाणार आहे. हा चित्रपट आणखी कोणी नाही तर भारतीय बनवणार आहेत. या नावाचे रजिस्टर झाले असून आता मेलेल्याच्या टाळूवरचही लोणी विकून खातील ही उक्ती या ठिकाणी चित्रपटनिर्मात्यांच्या बाबतीत खरी ठरली असे म्हणावे लागेल.

अनुराग उर्फ पार्थ समथानच्या आयुष्यातील गर्लफ्रेंड्सची लिस्ट

कोण करणार या चित्रपटाची निर्मिती

shutterstock

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार बाजीराव मस्तानी, तनु वेड्स मनू या चित्रपटाची निर्मिती करणारी EROS यांनी ‘कोरोना प्यार है’अशा नावाने हे रजिस्ट्रेशन केलेले आहे, असे कळत आहे. या नावाने रजिस्टर केली जाणारी ही पहिली फिल्म असणार आहे.  पण या चित्रपटाच्या स्क्रिप्टचे काम अद्याप सुरु झालेले नाही. यावर अजून काम सुरु आहे. पण लवकरच म्हणजे कोरोनाचा कहर थांबल्यानंतर यावर काम सुरु करण्यात येणार आहे. याची स्टारकास्टही निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे अद्याप या चित्रपटांबद्दल काहीच सांगता येणार नाही. पण हा चित्रपट बिग बॅनर चित्रपट असल्याचेही कळत आहे. साहजिकच याची स्टारकास्टही मोठी असणार आहे.

चित्रपटाची कहाणी असणार लव्हस्टोरी?

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट एक लव्ह स्टोरी असणार आहे. आता तुम्हाला कोरोना प्यार है हे नाव ऐकल्यानंतर कहोना प्यार है या चित्रपटाची आठवण होणे अगदी साहजिक आहे. पण या चित्रपटाशी त्याचा काहीच संबंध नाही. असे देखील सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता तरी या संदर्भात काहीच गोष्टी कळू शकणार नाही. ही एक प्रेम कहाणी असणार आहे यावर मात्र शिक्कामोर्तब झाले आहे. 

40 वर्षांनंतर परतणार ही अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीत

सध्या तरी चित्रपटाला बुरे दिन

Instagram

कोरोना व्हायरसचे रुग्ण सापडल्यानंतर देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी लोकांनी जाऊ नका असे सांगण्यात आले आहे. कोरोनाचे विषाणू पसरु नये म्हणून थिएटरदेखील बंद करण्यात आले आहे. 31 मार्चपर्यंत चित्रपटगृह बंद राहणार आहेत. त्यामुळे या आठवड्यात रिलीज होणाऱ्या सगळ्या चित्रपटांवर याचा परिणाम होणार आहे. या निर्णयामुळेच अनेक मोठ्या चित्रपटांच्या रिलीजच्या तारखा पुढे ढकलण्यात आले आहेत. 

शुटींगही झाले रद्द

 कोरोना व्हायरसचा परिणाम हा चित्रपटाच्या शुटींगवरही झाला आहे. सध्या चित्रपटांच्या शुटींगवर स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक चित्रपटांचे शुटींग सध्या बंद आहे. त्यामुळे अनेकांचे नुकसानसुद्धा झाले आहे. अनेक चित्रपटांचे शुटींग मध्यावरच थांबवण्यात आले आहे. तर अनेक चित्रपटांचे प्रमोशनही थांबवण्यात आले आहे. 


 आता हा Corona Virus वर येणारा चित्रपट नेमका काय धुमाकूळ घालणार त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.