जेव्हा संगीताचा देव ए. आर. रहमान करतो मराठमोळ्या अंजलीची स्तुती…

जेव्हा संगीताचा देव ए. आर. रहमान करतो मराठमोळ्या अंजलीची स्तुती…

टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय संगीत रियालिटी शो, इंडियन आयडॉल 12 मधील आगामी महा म्युझिकल विकेंड प्रेक्षकांची संध्याकाळ नाट्य, मनोरंजन आणि संगीताने भरून टाकण्यास सिद्ध आहे. त्याला कारणही तसंच आहे.  महान संगीतकार आणि ऑस्कर विजेता ए. आर. रहमान अर्थात ज्याला संगीत क्षेत्रातील देव मानले जाते तो या भागाची शोभा वाढवणार आहे. स्पर्धकांच्या सुमधुर गीतांचा आस्वाद घेत घेत रहमान काही रोचक किस्से देखील सांगणार आहे. दुसरीकडे, ऋत्विक धनजानी पहिल्यांदाच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे आणि परीक्षक आणि स्पर्धकांना बोलते करून कार्यक्रमाची रंगतही वाढणार आहे. 

बॉलीवूडला घेरतोय कोरोना, अनेक कलाकारांना कोरोना

मोकळ्या वेळात ए. आर. रहमान ऐकतात अंजलीची गाणी

कार्यक्रमात गप्पांच्या ओघात ऋत्विकने ए आर रहमान यांना विचारले की, मोकळा वेळ असताना त्यांना कोणत्या प्रकारची गाणी ऐकायला आवडते? त्यावर रहमानने उत्तर दिले, “मी जेव्हा दामलेला असतो किंवा माझ्याकडे निवांत वेळ असतो, तेव्हा मी अंजली आणि तिची बहीण नंदिनी यांची शास्त्रीय गीते ऐकतो. मी त्यांना यूट्यूबवर ऐकले आहे आणि अंजलीने तर माझ्या सचिन: ए बिलियन ड्रीम्स या चित्रपटात आवाज देखील दिला आहे.” तो पुढे म्हणतो, “मी त्या दोघींना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.” असंही यावेळी रहमानने सांगितले. तर रहमान यांच्या कौतुकाने भारावून जात युवा गायिका अंजली म्हणाली, “सचिन: ए बिलियन ड्रीम्स या चित्रपटासाठी ए आर अमीन (ए आर रहमान यांचा मुलगा) सोबत ‘मर्द मराठा’ सारखे गाणे म्हणायची संधी मला मिळाली हा मी माझा गौरव मानते. संगीताचे साक्षात दैवतच आज मंचावर अवतरले आहे, हे आमच्यासाठी वरदानच आहे. आणि इतक्या मोठ्या मंचावरून ते आम्हाला मार्गदर्शन करत आहेत. या कौतुकामुळे मी भारावले आहे आणि गाण्याच्या कारकिर्दीत पुढे जाण्यासाठी आणखी प्रयत्न करून अशा आणखी संधी मिळवण्यासाठी मला प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाले आहे.”

अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता 'या' चित्रपटात दिसणार एकत्र

अंजलीने याआधीही जिंकला आहे रियालिटी शो

अंजली गायकवाडने याआधीही एक गाण्याचा रियालिटी शो जिंकला आहे. मात्र त्यावेळी अंजली लहान गटात होती. तर आता इंडियन आयडलच्या मंचावरून आपल्या आवाजाने सर्वांनाच अंजलीने मंत्रमुग्ध केले आहे. अंजली लहानपणापासूनच गायनाचे धडे गिरवत असून अंजलीची बहीण नंदिनीदेखील गाणे गाते. दोघीही बहिणी उत्कृष्ट गातात हे दोघींनीही नेहमीच दाखवून दिले आहे. तर आता या मंचावरून अंजली आपल्यातील विविध कला दाखवत असून वेगवेगळ्या बाजाची गाणी गात परीक्षकांचेच नाही तर अगदी प्रेक्षकांचेही मन जिंकून घेत आहे. या शनिवारी आणि रविवारी ए. आर. रहमान यांनी आपल्या उपस्थितीने सर्वांचेच मन जिंकून घेतल्याचे सोनी एंटरटेनमेंटवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुळातच ए. आर. रहमान खूपच कमी कार्यक्रमांना उपस्थित राहात असल्यामुळे या भागांमध्ये खूपच मजा येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्याशिवाय स्पर्धकांनाही ए. आर. रहमान यांच्याकडून अमूल्य असे मार्गदर्शनही मिळणार आहे. साक्षात संगीताच्या दैवताकडून त्यांना मार्गदर्शन मिळणार असल्याने सर्वच स्पर्धकही आनंदी आहेत. 

कोरोनाचा नेटफ्लिक्सला या कारणामुळे बसतोय फटका

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक