सेटवर साफसफाईचे केले काम, गाण्याने केले युवराज मेढेने परीक्षकांना थक्क

सेटवर साफसफाईचे केले काम, गाण्याने  केले युवराज मेढेने परीक्षकांना थक्क

अनेक रियालिटी शो येत असतात. त्यापैकी काही शो हे प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहेत. त्यामधील स्पर्धक पटकन प्रेक्षकांची मनं जिंकून घेत असतात. असाच एक रियालिटी शो येत असून याचे काही प्रोमो प्रसारित करण्यात आले आहेत आणि यामध्ये लक्ष वेधून घेतलं आहे ते मराठमोळा गायक युवराज मेढे याने. नुकताच युवराजचा एक प्रोमो प्रसारित झाला असून सोशल मीडियावर हा चांगलाच व्हायरल होत आहे. युवराजचे गाणे ऐकल्यानंतर या स्पर्धेतील परीक्षक नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि विशाल दादलानी खूपच भावूक झाले आणि त्याचे कारणही तसेच खास होते.

सना खानशी तुलना झाल्यामुळे सोफिया हयातला आला राग, अध्यात्मिक बाबतीत केले हे विधान

सेटवर साफसफाई करणारा ठरला हिरो

येत्या शनिवारपासून ‘इंडियन आयडल’ (Indian Idol) हा रियालिटी शो सुरू होत आहे आणि त्यातील काही स्पर्धकांचे प्रोमो सध्या व्हायरल होत आहेत. त्यापैकी एका प्रोमोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे आणि तो प्रोमो म्हणजे मराठमोळ्या युवराज मेढेचा.  युवराजने परीक्षकांसमोर ‘खेळ मांडला’ हे मनाचा भेद करणारे अजय - अतुलने संगीत दिलेले गाणे गायले आणि परीक्षक स्वतःला आवरू शकले नाहीत. युवराजला तो काय करतो हे विचारल्यानंतर त्याने सांगितलेल्या उत्तराने परीक्षक भावूक झाले. युवराज मेढे हा त्याच सेटवर साफसफाईचे  काम करत होता आणि काम करता करताच तो गाणे शिकला. जेव्हा परीक्षक इतर स्पर्धकांना चुका सांगायचे तेव्हा युवराज त्या चुका आपल्याकडून होत नाहीत ना याची काळजी घेत होता.  त्याने अशीच आपल्या गाण्याची तयारी केली आणि हळूहळू गाणं शिकत गेला. हे ऐकून सर्वांनाच आपल्या भावना अनावर झालेल्या दिसून येत आहे. युवराज हा महाराष्ट्रातीलच आहे. केवळ गाण्याच्या प्रेमापोटी आणि परिस्थितीमुळे त्याने स्टेजवरील साफसफाईचे काम स्वीकारले होते. येत्या शनिवारपासून हा शो सुरू होणार आहे. त्यामुळे ऑडिशनमध्ये परीक्षकांचे मन जिंकलेला युवराज आपल्या आवाजाने प्रेक्षकांचेही मन जिंकेल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

राहुल वैद्यला मत देण्यासाठी दिशाने केले ट्विट, दिशाच्या होकाराची चाहत्यांनाही उत्सुकता

विशाल, हिमेश आणि नेहा आहेत परीक्षक

इंडियन आयडल हा शो गेले अनेक वर्ष चालू आहे. त्याचे अनेक सीझन झाले आणि अनेक उत्तम गायक या शो ने बॉलीवूडला दिले आहेत. नेहा कक्करदेखील त्यापैकीच आहे. याशिवाय अभिजीत सावंत, राहुल वैद्य, अरिजित सिंग अशी अनेक नावंही आपल्या डोळ्यासमोर येतात. दरवर्षी या स्पर्धेत अनेक जण सहभागी होत असतात. यावर्षीदेखील उत्तम गायकांचा खजिना प्रेक्षकांसमोर देत असल्याचे परीक्षक विशाल, हिमेश आणि नेहा यांनी प्रमोशनदरम्यान सांगितले आहे. यावर्षी प्रेक्षकांना आवाजातील वेगवेगळी व्हरायटी ऐकायला मिळेल असेही हिमेशने सांगितले असून आतापर्यंतच्या सीझनमधील हा बेस्ट स्लॉट असल्याचेही एका प्रमोशनदरम्यान हिमेशने स्पष्ट केले आहे. तसंच सध्या अनेक प्रोमो प्रसारित होत असून प्रेक्षकांनाही आता या नव्या सीझनची उत्सुकता लागून राहिली आहे. येत्या शनिवारपासून (28 Novemeber) हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

बिपाशा बासूप्रमाणे 'बोल्ड अॅंड ब्युटिफुल' लुक हवा तर फॉलो करा या टिप्स

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक