ADVERTISEMENT
home / मनोरंजन
‘इंडियन आयडॉल’12 मध्ये सायली कांबळेच्या वडिलांसाठी सुपरहीरो मोमेंट

‘इंडियन आयडॉल’12 मध्ये सायली कांबळेच्या वडिलांसाठी सुपरहीरो मोमेंट

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉलच्या 12 सीझनने प्रेक्षकांना चांगलेच खिळवून ठेवले आहे. कारण या शो मध्ये असते अफाट मस्ती, हास्यविनोद आणि दमदार परफॉर्मन्स. आगामी आठवड्यातील फादर्स डे विशेष भाग कार्यक्रमातील रंजकतेची पातळी आणखीन वाढवणारा असेल. या भागात स्पर्धकांचे कुटुंबीय आपल्या लाडक्या मुला/मुलीचे मनोबल वाढवण्यासाठी आवर्जून उपस्थित असणार आहेत. या भागात भावना आणि मनोरंजन यांचा सुंदर मिलाफ असणार आहे. या शो चा निवेदक आदित्य नारायण सर्व स्पर्धकांच्या माता-पित्याशी गुजगोष्टी करून त्यांच्याकडून त्यांच्या मुलांविषयीचे गमतीदार किस्से काढून घेईल, जे ऐकून सेटवर नक्कीच हास्याची कारंजी उसळताना प्रेक्षकांना दिसणार आहे. परीक्षक अन्नू मलिक, सोनू कक्कर, हिमेश रेशमिया आणि अतिथी परीक्षक मनोज मुंतशिर सादर होणार्‍या परफॉर्मन्सेसचा आनंद घेत घेत स्पर्धकांच्या फिरक्याही घेताना दिसतील.

आई असते जीव तर बाबा आयुष्याचा आधार…(Father’s Day Quotes)

सायली कांबळेसाठी खास दिवस

‘दिलबरो’ हा गाण्यावरील सायली किशोर कांबळेच्या सुंदर परफॉर्मन्सनंतर सेटवर उपस्थित सर्वजण भावूक झालेले दिसून आले. विशेषतः सायलीचे वडील- किशोर कांबळी. अलीकडच्या संकट काळात कोव्हिडचे फ्रंटलाइन वर्कर म्हणून अव्याहतपणे काम करणार्‍या किशोर कांबळी यांचे परीक्षकांनी खूप कौतुक केले. सायलीने आपल्या लहानपणीची एक आठवण सांगितली. ती म्हणाली की तिचे वडील जे काम करायचे, ते तिला आवडायचे नाही. पण हळूहळू तिने स्वतःला समजावले. तिला ही जाणीव झाली की, तिचे वडील किती परोपकाराचे काम करत आहेत. तिला त्यांच्याबद्दल अपार आदर आणि प्रेम वाटते. याविषयी बोलताना सायली म्हणाली, “मी माझ्या वडिलांचा व्यवसाय माझ्या मैत्रिणींपासून लपवायचे कारण त्या सगळ्या तशा डॉक्टर किंवा इंजिनियर यांसारख्या उच्चभ्रू कुटुंबातल्या होत्या. पण कोव्हिडचा उपद्रव सुरू झाल्यानंतर मला हे प्रकर्षाने जाणवले की, माझे वडील एखाद्या सुपरहीरोपेक्षा जराही कमी नाहीयेत. त्यांनी अनेक लोकांचे जीव वाचवले आहेत आणि अनेक रुग्णांची सेवा केली आहे. आज फादर्स डे चे औचित्य साधून मी माझ्या वडिलांचे त्यांच्या उदार, निःस्पृह आणि धाडसी सेवेबद्दल आभार मानते. त्यांची मुलगी असल्याचा मला अभिमान वाटतो. मला ही जाणीव आहे की, मी फारशी शहाणी मुलगी नव्हते. पण त्यांनी मात्र नेहमी माझ्यावर निरपेक्ष प्रेमाचा वर्षावच केला आणि मला आधार दिला. मी सदैव त्यांची ऋणी राहीन.” यावर किशोरजी म्हणाले, “सायली म्हणजे आम्हाला मिळालेले वरदान आहे. तिने आमची सगळी स्वप्ने पूर्ण केली आहेत. तिची प्रतिभा म्हणजे आपल्या कारकिर्दीत ती भविष्यात खूप पुढे जाणार आहे याची साक्ष आहे. मला नेहमीच तिचा अभिमान वाटतो आणि भविष्यातही वाटेल.

लाडक्या बाबांना पाठवा ‘फादर्स डे’च्या कविता (Father’s Day Poem In Marathi)

ADVERTISEMENT

सध्या चुरशीच्या लढाईत सायली पुढे

सायली नेहमीच सुंदर गाते. तसंच ती नेहमीच आतापर्यंत परीक्षक आणि प्रेक्षकांचे मन जिंकून घेत आली आहे. त्यामुळे आता टॉप 5 च्या चुरशीच्या लढाईतही सायली पुढे असलेली दिसून आली आहे. नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाऊन सायलीने प्रेक्षकांचे आणि परीक्षकांचेही मन जिंकून घेतले आहे. तर मराठमोळ्या सायलीचा आवाज अनेक प्रेक्षकांच्या मनावर सध्या मोहिनी घालत असलेलाही दिसून येत आहे. 

जाणून घ्या माहिती आणि महत्त्व पितृदिनाचे (Father’s Day Information)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

18 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT