नन्ही कलीच्या माध्यमातून यंदा '750' गरजू मुलींना मिळणार उत्तम शिक्षण

नन्ही कलीच्या माध्यमातून यंदा '750' गरजू मुलींना मिळणार उत्तम शिक्षण

प्राउड फादर फॉर डॉटर्स च्या सहाव्या आवृत्तीच्या माध्यमातून यंदा 750 ‘नन्ही कलीं’ना शिक्षण देण्यासाठी निधी जमवण्यात आला. 2018 च्या तुलनेत यंदा गोळा झालेल्या निधीमध्ये 66 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे #mission5000 संकल्पनेचा भाग असलेला नन्ही कली हा प्रकल्प या उपक्रमाद्वारे पाच हजार छोट्या मुलींना मदत करण्याच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचलेला आहे. मूल वाढवताना आई आणि वडिलांच्या भूमिकांचा मिलाप साधण्यासाठी 2019 च्या आवृत्तीमध्ये पहिल्यांदाच त्यांच्या आईलाही आपल्या मुलीबरोबर फोटो काढून घेण्यासाठी बोलावण्यात आलं होते. नवे ठिकाण आणि नवे उद्दिष्ट असणारं यंदाचं प्राउड फादर्स फॉर डॉटर्स 2019 हे आतापर्यंतचे सर्वात भव्य प्रदर्शन होतं. या कार्यक्रमातून आई- वडील आणि मुलींचे 300 पोट्रेट्स काढण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलीचे पालक असलेल्या सर्व आई- वडिलांपर्यंत पोहोचून त्यांना त्यांचा एकत्रित फोटो अथवा सेल्फी काढण्याचं आवाहन नन्ही कली प्रकल्पाद्वारे केलं जात आहे. हे फोटो प्रत्येकाने त्यांच्या सोशल हँडलवर नन्ही कलीला टॅग करून शेअर करायचे आहेत. अशा प्रकारे या माध्यमातून आपण मुलींच्या शिक्षणाबाबत जागरूकता पसरवण्यासाठी आणि त्यांना #mission5000 साध्य करण्यासाठी नक्कीच पांठिबा देऊ शकतो.

नन्ही कली प्रकल्पाविषयी

नन्ही कली प्रकल्पाची स्थापना 1996 मध्ये आज भारतातील आघाडीचा उद्योग असलेल्या महिंद्रा समूहाचे अध्यक्ष श्री. आनंद महिंद्रा यांनी केली होती. शिक्षित महिला देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी योगदान देतात हे लक्षात घेत हुंडा आणि बालविवाहासारख्या वाईट सामाजिक पद्धती थांबवण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. आजपर्यंत नन्ही कली प्रकल्पाने 10 राज्यांतील ग्रामीण, आदिवासी आणि शहरी भागातील 3,75,00 मुलींना शैक्षणिक व साहित्यासंदर्भातला पाठिंबा देत सक्षम केले आहे. महिंद्रा समूह आणि प्रसिद्ध फोटोग्राफर अतुल कसबेकर यांनी निर्भया घटनेनंतर सुरू केलेली ही संकल्पना मुलींबद्दलचे पूर्वग्रह आणि त्यांच्याबद्दलची मानसिकता बदलण्याच्या दृष्टीकोनातून तयार करण्यात आली आहे. प्राउड फादर्स फॉर डॉटर्सची पहिली आवृत्ती 2014 मध्ये आयोजित करण्यात आली होती. तेव्हापासूनच या वार्षिक सोहळ्यात भारतातले प्रसिद्ध फोटोग्राफर्स सहभागी होतात आणि वडील आणि मुलीच्या अनोख्या नात्यावर आधारित एकापेक्षा एक सरस फोटो काढतात. गेल्या सहा वर्षांत ‘प्राउड फादर्स फॉर डॉटर्स’ वडील- मुलीच्या जोडीचे तब्बल 1200 फोटो काढण्यात आले असून 2500 वंचित आणि लहान मुलींच्या शिक्षणासाठी निधी जमवण्यात आला आहे. यावर्षी आठ फोटोग्राफर्सनी त्यांचा वेळ आणि गुणवत्ता वडील- मुलीच्या नात्यातले काही खास क्षण टिपण्यासाठी दिला असून त्यात अतुल कसबेकर, कॉल्स्टन ज्युलियन, जयदीप ओबेरॉय, प्रसाद नाईक, तरुण खिवाल, तरुण विश्वा, तेजल पटनी, सुन्हिल सिप्पी यांचा समावेश आहे. समाजाकडूनही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभत असून प्रकल्प नन्ही कलीने प्राउड फादर्स फॉर डॉटर्सचा आनंद असाच पुढे नेण्यासाठी महिन्यातला एक दिवस राखून ठेवण्याचे ठरवले आहे. या दिवशी वडील आणि मुलींना त्यांचे पोट्रेट ऑनलाइन पोस्ट करून या उपक्रमाचा प्रसार करता येईल तसेच लहान व वंचित मुलींच्या शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी इतरांना आमंत्रित करता येईल.

अभिनेत्री पूजा हेगडेने व्यक्त केल्या भावना

नन्ही कली प्रकल्पात सहभागी झालेली अभिनेत्री पूजा हेगडेने याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या “कायम पाठिंबा आणि प्रोत्साहन देणारे पालक मिळाल्याबदद्ल मी स्वतःल नशीबवान समजते. त्यांनी मला सर्वोत्तम शिक्षण आणि संधी देत स्वतःचा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं. या उपक्रमात सहभागी होत अधिकाधिक तरुण मुलींना माझ्याप्रमाणेच आपली क्षमता ओळखण्याच्या संधी मिळाव्यात अशी मी आशा करते. मी यंदा तिसऱ्यांदा या उपक्रमात सहभागी होत आहे, पण हे वर्ष माझ्यासाठी जास्त खास आहे, कारण पोट्रेट शूटसाठी माझ्यासोबत माझी आई आणि आजीसुद्धा यात सहभागी झाली आहे. #मेकएव्हरीडॉटरशाइनसाठी करण्यात येणाऱ्या या कामाच्या भावना शब्दांत सांगणं कठीण आहे. प्रकल्प नन्ही कलीला त्यांचे #मिशन 5000 साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी त्यात सहभागी होऊन मदत करावी असं मी आवाहन करते.”

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

कलाकारांनी सेटवरच साजरी केली दिवाळी फराळ पार्टी

हार्दिक पांड्याही अडकणार लग्नाच्या बेडीत, या अभिनेत्रीसोबत लग्नाच्या चर्चा