जाहिराती ज्यांनी दाखवून समाजाला दाखवून दिले महिलांचे अनोखे रुप

जाहिराती ज्यांनी दाखवून समाजाला दाखवून दिले महिलांचे अनोखे रुप

असं म्हणतात ‘जाहिराती’ या समाज जीवनाचे दर्शन घडवणाऱ्या असतात. कमीत कमी वेळेत आणि शब्दात मांडल्या जाणाऱ्या या जाहिराती समाजात बराच बदल घडवून आणतात. आयुष्याचे वेगवेगळे पैलू मांडणाऱ्या जाहिराती वेगवेगळ्या पद्धतीने मांडल्या जातात. महिला सक्षमीकरण, स्त्री पुरुष समानता अशा अनेक विषयावर आतापर्यंत अनेक जाहिराती आल्या आहेत. पण काही जाहिराती अशा असतात ज्या मनात कायमच्या घर करुन राहतात. 2021 हे वर्ष ही नव्या विचाराने सुरु झाले आहे. या नव्या वर्षात नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महिला सज्ज झाल्या आहेत. या विषयांना घेऊन काही जाहिराती तयार करण्यात आल्या आहेत. अशाच काही जाहिराती आहेत ज्यांनी सोशल मीडियावर एक नवा आदर्श घालून दिला. जागतिक महिला दिन हा 8 मार्च रोजी साजरा केला जातो. या निमित्ताने जाणून  घेऊया अशाच काही दर्जेदार जाहिराती.

देख ले तू देखते हुए..

प्रवास असो किंवा काम पुरुषांच्या नजरा कायमच तिच्याभोवती असतात. काळ जरी  बदलला तरी देखील अजूनही काही ठिकाणी महिलांना शोभेची वस्तू म्हणून पाहिले जाते. पण पुरुष काय करतात महिलांना कशाप्रकारे बघतात हे त्यांना दाखवून देणे गरजेचे आहे. जाऊ दे  म्हणण्यापेक्षा त्यांना जर आरसा दाखवला तर जास्त बरे! हेच दाखवून देणारी ही जाहिरात आहे. जी पाहिल्यानंतर आपल्यावर होणाऱ्या चुकीच्या गोष्टीसाठी आवाज हा उंचवायला हवा हे दाखवून देते. ही जाहिरात अनेकांच्या आवडीची आहे कारण ती महिला ही कुठेही कमी नाही दे दाखवून देते.

माय सुपर हिरो

लग्न, मुलं, संसार या सगळ्यामध्ये बाईची इतकी फरफट होते की, तिला तिची बरीच स्वप्न तिथेच सोडावी लागतात असे अनेकांन वाटते. पण आता तसे मुळीच राहिलेले नाही. आता महिला सगळ्या गोष्टी अगदी योग्य सांभाळतात. कोणत्याही कामाच्या जबाबदाऱ्या इतरांवर ढकलण्यापेक्षा त्या पूर्ण करण्यासाठी त्या कायम धडपडतात. पण मोठ्या सचोटीने त्या सगळ्या कामात माहीर असतात. त्यामुळे महिलांना कमजोर समजणाऱ्या वर्गाला चपराक देणारी अशी ही जाहिरात आहे.

 

तूम रहने दो

महिला या महिलांसाठी काहीही करु शकत नाही असे अनेकांना वाटते पण असे मुळीच नाही. प्रत्येक महिलेची काळजी घेणे प्रत्येकीला चांगलं जमतं. स्त्रियांमध्ये भेदभाव करण्याची वृत्ती नसावी हेच दाखवणारी ही जाहिरात आहे.आई होण्याचा आनंद हा सगळ्यांना असतो. अगदी आपल्याकडे काम करणाऱ्या मोलकरणींना सुद्धा. पोट भरण्यासाठी गरोदर असतानाही त्या काम करतात. पण थोडा समजूतदारपणा दाखवून आपणही काही गोष्टी केल्या की, तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. अशीच ही जाहिरात आहे.

हम भी देखे

एखादी महिला सुंदर असेल तर तिला कामाच्या ठिकाणी नक्कीच प्रमोशन मिळणार असे अनेकांना वाटते. केवळ तिच्या सौंदर्यावर भाळून तिला सगळ्या गोष्टी दिल्या जातात असा सगळ्यांचा गैरसमज असतो. ही जाहिराती थोडी वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आली आहे. सगळ्यांच्या मनात किरण नाव घेतल्यामुळे एकच गोंधळ उडतो. ही किरण महिला असणार असे वाटू लागते. पण प्रत्यक्षात तो एक मुलगा निघतो. या महिला दिनी महिलांची ही इमेज पुसून त्यांचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी महिला दिन शुभेच्छा नक्की पाठवा

वो तुम्हारी परछाई होगी

सध्याचा काळ खूपच बदलला आहे. लाईफस्टाईल, स्पर्धा या सगळ्या गोष्टी आरोग्यावर परिणाम करतात. अशावेळी काहींच्या नशीबात योग्य वयात आई-वडील होणे नसते. पण आपल्या समोर इतरांना हे सुख मिळाल्यानंतर त्यांच्यासोबत हा आनंद साजरा करणेही तितकेच गरजेचे असते. हा आनंद सांगणारी ही जाहिरात आहे. जी तुमच्या डोळ्यांच्या कडा नक्की पाणावते.महिला या अबला नाही सबला आहेत. त्यांच्या सक्षमीकरणासाठी महिला सक्षमीकरण घोषवाक्य ही प्रेरणादायी आहेत