आजारावर मात करत परतला इरफान खान, लवकरच करणार शूटिंगला सुरुवात

आजारावर मात करत परतला इरफान खान, लवकरच करणार शूटिंगला सुरुवात

जवळपास वर्षभरापूर्वी अभिनेता इरफान खानला न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर झाल्याचं अचानक समोर आलं आणि प्रत्येकाला धक्का बसला. इरफान खानला स्वतःलादेखील धक्का बसला आणि यातून आपण बाहेर पडू की नाही अशीही शंका त्याला होती. त्यामुळे इरफान खरंच इतका डिप्रेस झाला आहे की काय अशी चिंता त्याच्या चाहत्यांना सतावत होती. त्यावेळी त्याच्या चाहत्यांनीही त्याला खूप पाठिंबा दिला. आता इरफान खान पुन्हा ट्यूमरवर मात करत भारतात परतला असून सर्वांनाच आनंद झाला आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना जिंकून घेणाऱ्या इरफान खानबद्दल आता वेगवेगळ्या चर्चांनाही सुरुवात झील आहे. काही चर्चांनुसार इरफान या 22 फेब्रुवारीपासून ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटाच्या सिक्वलच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. तर काही चर्चांनुसार आता इरफानवर मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये इलाज करण्यात येत आहे. अभिनेता इरफान खानच्या अगदी जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, इरफान मुंबईत परत आला आहे हे खरं असलं तरीही बाकी चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या सर्व चर्चा वायफळ असल्याचं या व्यक्तीने सांगितलं आहे.


irrfan khan
चाहते वाट पाहत आहेत इरफानची


गेल्या वर्षभरापासून इरफान एका गंभीर आजाराशी लढत आहे आणि त्याने सोशल मीडियाद्वारे या भावना व्यक्त केल्या होत्या. पण त्यानंतर इरफानकडून कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यापाठोपाठ सोनाली बेंद्रेलादेखील कॅन्सर झाल्याचं कळलं होतं. सोनाली बेंद्रेदेखील आजारावर मात करत मुंबईमध्ये परतली असून तिने चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता इरफानदेखील या गंभीर आजारावर मात करूनच मुंबईत परतला आहे आणि पुन्हा एकदा इरफानला मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे. तर त्याच्याजवळील व्यक्तीने अशीही माहिती दिली आहे की, लवकरच अभिनेता इरफान खानची भेट घ्यायला जाणार असून त्याच्या तब्बेतीची विचारपूस करून मगच कामाला सुरुवात करता येईल. अजून इरफानची नक्की तब्बेत कशी आहे याची कोणालाही कल्पना नाही. त्यामुळे ‘हिंदी मीडियम’ सिक्वेलच्या चित्रीकरणाला नक्की कधी सुरुवात होणार याचा अजून अंदाज नाही.


‘हिंदी मीडियम’ अप्रतिम चित्रपट


साकेत चौधरीद्वारे दिग्दर्शित 2017 मध्ये प्रदर्शित झालेला ‘हिंदी मीडियम’ हा चित्रपट खूपच हिट झाला होता. यामध्ये अशा कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांना आपल्या मुलीला सर्वोत्तम शिक्षण द्यायचं आहे, जेणेकरून समाजातील उच्च वर्गाद्वारे त्यांचा स्वीकार करण्यात येईल. या चित्रपटामध्ये इरफानबरोबर पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरचीदेखील मुख्य भूमिका होती. आता दिनेश विजन प्रॉडक्शन अन्वये बनण्यात येणारा ‘हिंदी मीडियम 2’ हा चित्रपट एक दशक पुढची कथा घेऊन येणार आहे. पण त्यामध्ये इरफान खानच काम करेल असं आधीही स्पष्ट करण्यात आलं आहे. पुढच्या दोन आठवड्यात या चित्रपटासंदर्भात घोषणा करण्यात असल्याचं निर्माता दिनेश विजन याने सांगितलं आहे. त्यामुळे आता लवकरच इरफान खानला पुन्हा बघता येणार अशी आशा प्रेक्षक आणि चाहत्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. वास्तविक सोनाली बेंद्रेने आजारी असतानाही तिच्याबद्दल बरीच माहिती सोशल मीडिायद्वारे पोस्ट केली होती. पण इरफान खानने सुरुवातीलाच माहिती दिली आणि त्यानंतर त्याच्याकडून कोणतीही माहिती न मिळाल्यामुळे आता त्याच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. इतकंच नाही तर लवकरात लवकर इरफान बरा व्हावा यासाठीदेखील चाहत्यांनी प्रार्थना केली आहे.


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


अभिनेत्री सारा अली खान करतेय ‘एक नवी सुरूवात’


कपिल शर्माची ‘रिंकू भाभी' शोमध्ये परतणार ?


अभिनेत्री अदिती द्रविडचा ‘राधा’मय नृत्यविलास