अभिनेता इरफान खानवर दुःखाचा डोंगर, आईचे अंतिम दर्शन घेणं झाले नाही शक्य

अभिनेता इरफान खानवर दुःखाचा डोंगर, आईचे अंतिम दर्शन घेणं झाले नाही शक्य

बॉलीवूड अभिनेता इरफान खानवर नवा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. इरफान खानला मातृशोक झाला आहे. गेल्या काही वर्षांंपासून इरफान खानची आई सईदा यांची तब्बेत ठीक नव्हती. त्या 95 वर्षांच्या होत्या. राजस्थानमधील टोंकमधील नवाब खानदानामध्ये जन्म घेतलेल्या सईदा यांनी जयपूर या ठिकाणी आपला अंतिम श्वास  घेतला. मात्र स्वतःच्या तब्बेतीमुळे इरफान खान सध्या परदेशात उपचार घेत असल्यामुळे आपल्या आईचे शेवटचे दर्शनही त्याला घेता आले नाही. इरफानने आपल्या आईचे अंतिम संस्कार हे एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाहिले असल्याचे सांगण्यात येत आहे. जयपूरच्या बाहेर इरफानच्या आईवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र कुटुंबातील काही जणांनाच कोरोनामुळे यामध्ये जाता आले. तर इरफानचा मोठा भाऊ सलमान याने हे संस्कार पूर्ण केल्याचेही वृत्त आहे.  

Good News: इरफान खान कॅन्सरवर मात करून मुंबईत परत

वृद्धत्वाने झाले निधन

सईदा यांच्या निधनाच्या बाबतीत इरफानचा मोठा सलमानने सांगितले की, त्यांच्या आईची तब्बेत गेल्या काही दिवसांपासून खूपच खालावली होती. शनिवारी सकाळी अचानक तब्बेत बिघडली. नुकतीच काही दिवसांपूर्वी तिने इरफानच्या तब्बेतीचीही चौकशी केली असल्याचे त्याने सांगितले. इरफान 2017 पासून कॅन्सरसारख्या आजाराशी लढा देत आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या तब्बेतीत सुधारणा झाली होती.  त्यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्णही केले. लॉकडाऊन होण्याच्या काही दिवस आधी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.  मात्र लॉकडाऊनमुळे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना जाता आले नाही. 

मराठमोळ्या ‘राधाकृष्ण’ सुमेध मुदगरलकरचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल अवाक

चित्रीकरणानंतर पुन्हा परदेशात रवाना

इरफानची तब्बेत चित्रीकरणानंतर पुन्हा एकदा खराब झाल्यामुळे त्याने पुढील उपचारांसाठी परदेशात जाणे योग्य समजले. त्यानंतर चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही इरफान इथे नव्हता. पण तरीही जेव्हा चित्रपट ऑनलाईन प्रदर्शित करण्यात आला तेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इरफान आपल्या चाहत्यांना भेटला होता. याशिवाय  आपल्या तब्बेतीची माहिती वेळोवेळी इरफान आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे देत असतो. पण आता आपल्या तब्बेतीसह आपल्या आईच्या नसण्याचं दुःखही इरफानला पचवावं लागणार आहे. इरफानच्या तब्बेतीत आता हळूहळू सुधारणा होत असल्याचंही सांगण्यात येत आहे. 

अंकिताशी लग्न करण्याआधी मिलिंद सोमणच्या आयुष्यात होत्या या हॉट अभिनेत्री

इरफानने लिहिली होती भावनिक पोस्ट

इरफानने याआधीदेखील आपल्या तब्बेतीत होणाऱ्या सुधारणेसाठी चाहत्यांचे आभार मानले होते. इरफान खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपला फोटो पोस्ट करून एक भावनिक पोस्ट लिहिली. इरफानवर उपचार झाल्यानंतर हा पहिलाच फोटो पोस्ट करण्यात आला होता. यावर इरफानने लिहिलं, ‘जिंकण्याच्या शर्यतीत आपण बऱ्याचदा आयुष्यात प्रेम किती महत्त्वाचं आहे विसरून जातो. जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हाच आपल्याला या गोष्टीची जाणीव होते. मी आयुष्यातील हे कठीण क्षण आता मागे ठेऊन आलोय. तुमच्या प्रेम आणि तुम्ही दिलेल्या साथीबद्दल मी तुमचा खूपच आभारी आहे. तुमच्या प्रार्थनांमुळेच मी ठीक होऊ शकलो. मी आता परत आलोय आणि त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानत आहे’  यानंतरच त्याने अंग्रेजी मीडियम चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आणि पुन्हा उपचारासाठी रवाना झाला. मात्र लॉकडाऊनमुळे आता त्याला आपल्या आईच्या अंतिम दर्शनासाठी येणेही शक्य झाले नाही. इरफानसाठी हा नक्कीच कठीण काळ असून यातून तो लवकरच सावरेल अशी अपेक्षा आणि प्रार्थना त्याचे चाहते करत आहेत हे नक्की.