ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
मोठ्या पडद्यावर पुन्हा होणार इरफान खानची भेट

मोठ्या पडद्यावर पुन्हा होणार इरफान खानची भेट

मागचा आठवडा सिनेरसिकांसाठी फारच दुःखद ठरला. बुधवारी अभिनेता इरफान खानचं निधन झालं तर गुरूवारी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. या दोघांच्याही निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला. एकीकडे जिकडे लोक इरफानच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवू शकत नव्हते तोच चिंटूजींच्या निधनाची बातमी आली होती. पण बॉलीवूडच्या नियमाप्रमाणे शो मस्ट गो ऑन. इरफानच्या मृत्यूने हळहळलेल्या फॅन्ससाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे इरफानला तुम्हाला अजून दोनदा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. कसं ते वाचा.

इरफानचा हॉलीवूड चित्रपट

इरफान खानचा शेवटचा सिनेमा अंग्रेजी मीडियम असल्याचं सांगितलं जातं होतं. परंतु तसं नाहीय. अंग्रेजी मीडियम नंतर इरफानचा एक हॉलीवूड प्रोजेक्ट आणि अजून एक सिनेमा रिलीज होईल. इरफान हा बॉलीवूड आणि हॉलीवूड अशा दोन्ही चित्रपटात चांगल्या भूमिकांसाठी ओळखला जातो. हॉलीवूडमध्येही त्याने चांगलंच नाव कमावलं आहे. त्यामुळेच कॅन्सरमधून बरा झाल्यावरही त्याला एक हॉलीवूड चित्रपट मिळाला होता. इरफानच्या हॉलीवूड प्रोजेक्टचं नाव आहे मंत्रा : सन्स ऑफ स्कॉर्पियन्स. या चित्रपटात इरफानसोबत इराणी अभिनेत्री गोल्शिफ्ते फरहानीची मुख्य भूमिका आहे.

या चित्रपटात एका राजस्थानी मुलीच्या आयुष्यावरील कहाणी दाखवण्यात येणार आहे. जी आपलं गाणं ऐकवून आजारी लोकांचा इलाज करत असते. पण एक दिवस तिला कळतं की, कोणीतरी तिच्याच आयुष्यात विष कालवलं आहे. तेव्हा ती स्वतःचं अशा गाण्याच्या शोधात बाहेर पडते. जे तिला बरं करू शकेल. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांचीही प्रमुख भूमिका आहे.

इरफानचा बॉलीवूड चित्रपट

इरफानचा दुसरा चित्रपट म्हणजे अपनों से बेवफाई हा चित्रपट, जो बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे प्रकाश भालेकर यांनी. हा चित्रपट खरंतर 2 एप्रिलला रिलीज होणार होता. पण लॉकडाऊनमुळे याचं रिलीज थांबवण्यात आलं. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, हा चित्रपट दोन वर्षांपूर्वीचं तयार झाला होता. पण पैश्यांच्या कमतरतेमुळे हा रिलीज करण्यात आला नाही.

ADVERTISEMENT

एकीकडे इरफानचे दोन सिनेमा रिलीजसाठी तयार आहेत तर दुसरीकडे ऋषी कपूर यांचे चित्रपट मात्र अपूर्णच राहतील. ऋषी यांच्या शर्माजी नमकीन या आगामी चित्रपटाची खूप चर्चा होती. तसंच ते बऱ्याच कालावधीनंतर जूही चावलासोबत या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार होते. तसंच दीपिका पदुकोणसोबतही ते द इंटर्न या हॉलीवूड चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार होते. पण या चित्रपटाचं शूटींग सुरू होण्याआधीच ऋषींजीनी जगाचा निरोप घेतला.

तिखट स्वभावाचा ’गोड’ माणूस ऋषी कपूर

दोन वर्षांपासून सुरू होता कॅन्सरशी लढा

ऋषी कपूर आणि इरफान खान हे दोघंही कॅन्सरशी झुंज देत होते. या दोघांनीही परदेशात राहून उपचार घेतले आणि दोघंही भारतात परतले होते. दोघांनी चित्रपटात काम करायला सुरूवात केली होती. ऋषी कपूर यांचा शेवटचा रिलीज झालेला सिनेमा होता इम्रान हाश्मीसोबतचा ‘द बॉडी’, तर इरफानचा ‘अंग्रेजी मीडियम’ हा होता.

03 May 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT