बॉलीवूडमध्ये जेव्हा मोठ्या स्टार्सबद्दल बोललं जातं, तेव्हा अर्थातच सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान अथवा सध्या रणबीर कपूर, रणवीर सिंग यांचं नाव घेतलं जातं. पण जेव्हा कसदार अभिनेत्याचं नाव घेतलं जातं तेव्हा त्यामध्ये सर्वात वर नाव येतं ते इरफान खानचं. कसलेल्या कलाकारांपैकी इरफान हे एक नाव आहे. अचानक कॅन्सरसारख्या आजारामुळे इरफानचं आयुष्य गेल्या एक वर्षभर बदलून गेलं होतं. पण आता त्याच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. खऱ्या आयुष्यातही इरफान लोकांसाठी एक प्रेरणा ठरला आहे. कॅन्सरवर मात करत इरफान मुंबईमध्ये आला असून लवकरच मोठ्या पडद्यावर त्याला पाहता येणार आहे. याबद्दल त्याने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
अभिनेता इरफान खानच्या अभिनयातच नाही तर त्याच्या व्यक्तिमत्वातही एक वेगळी जादू आहे. हेच कारण आहे की, इरफानच्या अभिनयाने बरेच प्रेक्षक त्याच्याशी जोडले गेले आहेत. गेल्या वर्षीच इरफानला न्यूरोएंडोक्राईन कँन्सर झाला आणि उपचारासाठी इरफान लंडनला निघून गेला. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी इरफानसाठी खूप प्रार्थना केल्या होत्या. आतापर्यंत इरफानचे चाहते तो बरा होईल ही प्रार्थना करत होते. आता त्यांची प्रार्थना एक प्रकारे कामी आली आहे असं म्हणावं लागेल. इरफान पुन्हा एकदा बरा होऊन मुंबईत आला असून त्याने चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात केली आहे.
लंडनमध्ये उपचार करून आलेल्या इरफानला मुंबई विमानतळावर बऱ्याच मीडियाने स्पॉट केलं. पहिल्यांदा आल्यानंतर इरफानने मास्क लावला होता. त्यावेळी त्याने फोटो देण्यास नकार दिला. पण नुकताच काही तासांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इरफानने मीडियालादेखील मास्क न लावता फोटो दिले. आता एक महिन्यानंतर इरफानने स्वतः आपण व्यवस्थित असल्याचं सांगत आपल्या चाहत्यांचेही आभार मानले आहेत. शिवाय आपण बॉलीवूडमध्ये परत येत असल्याची घोषणाही केली आहे.
इरफान खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपला फोटो पोस्ट करून एक भावनिक पोस्ट लिहिली. इरफानवर उपचार झाल्यानंतर हा पहिलाच फोटो पोस्ट करण्यात आला आहे. यावर इरफानने लिहिलं, ‘जिंकण्याच्या शर्यतीत आपण बऱ्याचदा आयुष्यात प्रेम किती महत्त्वाचं आहे विसरून जातो. जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हाच आपल्याला या गोष्टीची जाणीव होते. मी आयुष्यातील हे कठीण क्षण आता मागे ठेऊन आलोय. तुमच्या प्रेम आणि तुम्ही दिलेल्या साथीबद्दल मी तुमचा खूपच आभारी आहे. तुमच्या प्रार्थनांमुळेच मी ठीक होऊ शकलो. मी आता परत आलोय आणि त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानत आहे’
— Irrfan (@irrfank) April 3, 2019
असं म्हटलं जात आहे की, इरफान खान ‘हिंदी मीडियम 2’ या चित्रपटातून परत येत आहे. पण या चित्रपटामध्ये अजून कोणत्याही अभिनेत्रीला फायनल करण्यात आलेलं नाही. पण त्याच्या मुलीच्या भूमिकेसाठी राधिका आपटे आणि राधिका मदान या दोन अभिनेत्रींची नावं सध्या समोर आहेत.
फोटो सौजन्य - Instagram, Twitter
हेदेखील वाचा -
आजारावर मात करत परतला इरफान खान, लवकरच करणार शूटिंगला सुरुवात
कपिल शर्माने सुनील आणि इतर प्रकरणांवरुन उठवला पडदा