महेंद्र सिंह धोनी आणि सचिनच्या जीवनावर बायोपिक आल्यानंतर आता आणखी एका क्रिकेटरवर बायोपिक करणार असल्याची चर्चो जोर धरत आहे. हा बायोपिक अन्य कोणी नाही तर बीसीसीआईचा अध्यक्ष भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीवर होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. सध्या सगळीकडे आयपीएलची जोरदार तयारी सुरु असताना या बातम्या येऊ लागल्यामुळे दादावर खरंच बायोपिक येणार की, ही नुसती चर्चा आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता हा बायोपिक येणार अशी चर्चा होत असताना दादाच्या भूमिकेसाठी कोण योग्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यानेच याचे उत्तर दिले आहे. त्याचा बायोपिक करण्यासाठी ऋतिक रोशन योग्य असल्याचे त्याने म्हटले आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याने या गोष्टींबद्दल आपली मतं मांडली आहेत. पण यामागचे सत्य काय ते आता जाणून घेऊया.
अनुष्का शर्माचा नवा फोटो विरुष्काच्या फॅन्समध्ये होत आहे वायरल
नेहा धुपियाच्या शोवर विचारला प्रश्न
सध्या लॉकडाऊनमध्ये अनेक कार्यक्रमांचे शूटिंग अद्यापही सेटवरुन सुरु झालेले नाही. तर घरातूनच अनेक जण हे शूट करत आहेत. नेहा धुपिया अँकरींग करत असलेल्या ‘नो फिल्टर’ या सेलिब्रिटी मुलाखतीचा सध्या पाचवा सीझन सुरु आहे. सौरव गांगुली याची मुलाखत घेताना नेहाने त्याच्या बायोपिकबद्दल प्रश्न विचारला.तिने हा रोल ऋतिक रोशन साकारत आहे का असा प्रश्नही सौरवला केला. त्यावर या दिलखुलास चर्चेत सौरवने अजिबात न कचरता विनोदी पद्धतीने याचे उत्तर दिले. तो म्हणाला की, हे कोणी सांगितलं. पण हे खरं असेल तर ऋतिकला माझ्यासारखी बॉडी कमवावी लागेल. त्यावर एकच हशा पिकला. आता दादावर बायोपिक बनते आहे की नाही हे अद्याप गुलदस्त्यात राहिले आहे.
व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘या’ मराठी चित्रपटाला पुरस्कार
बायोपिक आला तर
बॉलिवूडमध्ये एखाद्या गोष्टीची उगीच चर्चा होत नाही. याधीही महेंद्र सिंह धोनी आणि सचिन तेंडुलकर यांचा जीवनपट उलगडणारे बायोपिक आले आहे. या बायोपिकला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आणखी एका चांगल्या क्रिकेटरची या बायोपिकमध्ये भर पडली तर नवल वाटायला नको. पण अद्याप या गोष्टीचा म्हणावा तसा खुलासा करण्यात आलेला नाही. सौरवने दिलेल्या माहितीनुसार त्याला त्याच्या भूमिकेसाठी ऋतिक रोशन जास्तच भावलेला दिसत आहे. असे असले तरी ही बातमी खरी की अफवा यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.
सध्या आयपीएलमध्ये आहे व्यग्र
सौरव गांगुली सध्या दुबईमध्ये आहे. त्याच्या सोशल मीडियावर त्याने सारजा स्टेडिअमवरील एक फोटो शेअर केला आहे. आयपीएलची धाकधूक सुरु असताना अनेक फॅन्सनाही या बायोपिकची उत्सुकता आहे. त्यामुळे त्याच्या फॅन्समध्ये ही जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पण सध्या सौरवचे लक्ष हे आयपीएलकडे अधिक असणार आहे. कारण आता कुठे देश कोरोनामधून बाहेर येत आहे. अशामध्ये सगळ्या गोष्टींची काळजी घेत हे सामने क्रिकेटर्सना खेळावे लागणार आहे.
सौरव गांगुली हे नाव भारतीय क्रिकेटविश्वात चांगलेच गाजलेले आहे. त्याचा बायोपिक आला तर त्याच्या आयुष्यातील कोणता भाग यामध्ये दाखवण्यात येईल याचीही प्रतिक्षा अनेकांना असेल.
मलायकाला सतावतेय म्हातारी होण्याची भीती, लवकर लस शोधा म्हणाली मलायका