एखाद्या क्रिकेटरचे कोणत्या अभिनेत्रीशी नाव जोडणे आता काही नवीन राहिलेले नाही. आता अभिनेत्रीशी अफेअर असण्यामध्ये आता आणखी एका क्रिकेटरचे नाव जोडले गेले आहे ते म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा बॉलर जसप्रीत बुमराह.. बुमराह याचे साऊथ चित्रपटात काम करणाऱ्या एका अभिनेत्रीसोबत नाव जोडले गेले असून या विषयी चर्चा होऊ लागल्यानंतर एका अभिनेत्रीनेच त्यांच्या नात्यावर खुलासा केला आहे. ती काय म्हणाली आणि या सगळ्याविषयी बुमराह काय म्हणाला हे माहीत करुन घेणे गरजेचे आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साऊथच्या चित्रपटात काम करणाऱ्या अनुपमा परमेश्वरनसोबत सध्या जसप्रीतची तार जुळली आहे,असे सांगण्या येत आहे. अनुपमा तेलुगु चित्रपटात काम करत असून तिने अनेक चित्रपट केले आहेत. ही दोघं सोशल मीडियाच्या माध्यामातून एकमेकांच्या संपर्कात असतात,असे कळत आहे. पण याचा ठोस पुरावा अद्याप तरी कोणीच देऊ शकणार नाही. पण जसप्रीत आणि अनुपमा यांच्या अफेअर्सच्या चर्चांनी सध्या लक्ष वेधून घेतले आहे. काही गोष्टींमुळे लोकांनी त्यांचे नाते असल्याचे म्हटले आहे.
सध्या वर्ल्डकप सुरु आहे. जसप्रीत बुमराहची कामगिरी पाहता त्याचा चाहता वर्ग हमखास वाढला आहे. त्याच्या ट्विटवरील फॉलोअर्स वाढत असताना त्याची एक फॉलोअर आकर्षणाचा बिंदू ठरली ती म्हणजे अनुपमा परमेश्वन.. अनुपमा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अॅक्टिव्ह असते. तिने अगदी काही दिवसांपूर्वी जसप्रीतला फॉलो केले असून ती त्याच्या फोटोवरही आवर्जून कमेंट देत आहे. त्यामुळे अनेकांचे लक्ष अनुपमा आणि बुमराहकडे लागले आहे. या सगळ्या फॉलो प्रकरणावरुनच जसप्रीत आणि अनुपमाच्या लव्ह अफेअर्सची चर्चा सुरु झाली आहे.
अनुपमाचा नवा चित्रपट लवकरच फ्लोअरवर येणार आहे. याच्या तयारीत ती असताना तिला अनेक जण जसप्रीत बुमराहबद्दल विचारत आहेत. पण तिने या सगळ्याला उत्तर दिली आहेत. तिने जसप्रीत हा माझा केवळ मित्र असल्याचे म्हटले आहे. बाकीच्या सगळ्या अफवांवर लक्ष देऊ नका हे सांगायलाही ती विसरली नाही.
जसप्रीतसोबत या आधीही एका अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे. साऊथच्याच चित्रपटात काम करणाऱ्या राशी खन्नासोबत त्याे अफेअर्स असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. पण या चर्चांचे खंडन राशीनेच केले. तिने सांगितले की, जसप्रीत हा एक क्रिकेटर म्हणून मला माहीत आहे. बाकी माझीआणि त्याची कोणतीही ओळख नाही.
क्रिकेटरनी बॉलीवूड अभिनेत्रींना डेट करणे काही नवीन नाही यामध्ये आवर्जून नाव घेतले जाते युवराज सिंहचे. युवराज सिंहने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींना डेट केले आहे. अखेर त्याने अभिनेत्री हेजल क्रिचसोबत लग्न केले. दीपिका पदुकोण, मिनिषा लांबा, रिया सिंह, किम शर्मा, प्रीती जहांगनी,आंचल कुमार, नेहा धुपिया यांच्यासोबत त्याचे नाव जोडले गेले होते.
जसप्रीत मात्र या सगळ्या प्रकरणावर अद्याप काहीही बोललेला नाही. अनुपमाकडून त्यांच्या या नात्याचे स्पष्टीकरण आल्यानंतर जसप्रीत या सगळ्याविषयी काय बोलेल हे नक्कीच पाहावे लागेल. पण त्याआधी वर्ल्डकप महत्वाचे आहे.