नेहा कक्करचे लग्न पुन्हा एकदा पब्लिसिटी स्टंट, अनेकांना पडला प्रश्न

नेहा कक्करचे लग्न पुन्हा एकदा पब्लिसिटी स्टंट, अनेकांना पडला प्रश्न

नेहा कक्कर गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते तिच्या लग्नाच्या बातमीमुळे. गायक रोहनप्रीतसोबत ती लग्नगाठ बांधत असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. इतकेच नाही तर तिने रोहनप्रीतसोबत आपले काही फोटोही शेअर केले होते. त्यामुळे अखेर नेहा लग्न करत आहे याचा आनंद तिच्या फॅन्ससोबत अनेक सेलिब्रिटींनाही होता. पण आता काहीतरी भलतीच चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. तिने तिच्या सोशल प्लॅटफॉर्मवरुन दोघांचा असा फोटो शेअर केला आहे की, नेहा कक्करचे लग्न पुन्हा एकदा एखादा पब्लिसिटी स्टंट असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. नेहा कक्करने तिच्या नव्या कामाचा बोलबाला करण्यासाठी केवळ हा स्टंट रचल्याचे अनेकांनी म्हटले आहे. नेमकं असं काय घडलं ते जाणून घेऊया.

Bigg Boss 14: मराठमोळा राहुल वैद्य जिंकतोय सिनिअर्स आणि प्रेक्षकांची मनं

लग्नाची केली घोषणा

 नेहा कक्कर तिच्या गाण्यांसोबतच तिच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत असते. तिच्या लग्नाचा विषय सतत सोशल मीडियावर असतो. अगदी काहीच दिवसांपूर्वी ती पंजाबी सिंगर रोहनप्रीत सिंहसोबत लग्न करतेय अशी बातमी समोर आली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. पण तिच्या लग्नाची बातमी खरी असल्याचे दाखवत तिनेही सोशल मीडियावर #nehupreet  असा हॅशटॅगही ट्रेंड केला. त्यामुळे तिच्या या सगळ्या पोस्टमुळे तिचे लग्न आता लवकरच होईल अशी अपेक्षा होती. पण आता नेहाने या बातमीला थोडा वेगळाच ट्विस्ट दिला आहे. त्याची चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे. 

केला पब्लिसिटी स्टंट

Instagram

लग्न करण्याचा आनंद हा सगळ्या फॅन्सला झालेला असताना नेहाने अचानक एक अशी पोस्ट केली की, ज्यामुळे सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकून गेली आहे. नेहाने एक पोस्टर शेअर केले आहे. त्यामध्ये ‘नेहा द्या व्याह’ असे लिहले असून या पोस्टरमध्ये रोहनप्रीत आणि ती दिसत आहे. पण त्याखाली असलेली एक ओळ सगळे काही सांगून जात आहे. नेहाने एक गाणे लिहले असून या गाण्याच्या अल्बममध्ये रोहनप्रीत आहे. हे एक पंजाबी गाणं असून 21 ऑक्टोबरला ते रिलीज केले जाणार आहे. या पोस्टरकडे पाहिल्यानंतर हे पटकन अल्बम कव्हर आहे हे लक्षात येत नाही. कारण रोहनप्रीत आणि नेहा यामध्ये बसलेले दिसतात. बाजूला लग्नाची तारीख आणि अगदी शेवटी यातील कमर्शिअल बाब लिहिण्यात आली आहे.

इंडस्ट्री सोडण्याची घोषणा केली,पण मेकअपमुळे सना खान झाली ट्रोल

विशाल ददलानीने विचारला अनेकांच्या मनातला प्रश्न

नेहाच्या लग्नाची चर्चा ही चर्चा नसून ते खरं आहे असे अनेकांना पटले होते. पण या फोटोनंतर म्युझिक कंपोझर विशाल दिदलानीलाही राहावले नाही. त्याने या फोटो खाली कमेंट देत आपली बाजू मांडली आहे. त्याने विचारले की, अरे आता मी पुन्हा एकदा गोंधळून गेलो आहे. रोहनप्रीत आणि नेहा तुम्ही खरचं लग्न करत आहात की, हा अल्बम,चित्रपट की गाणं आहे? सरळ सरळ सांगून टाका कारण मला कपडे शिवायचे आहेत की, लाईक, कमेंट आणि शेअर करायचे आहे.  विशाल ददलानीच्या या कमेंटवर आतापर्यंत नेहाकडून कोणताही रिप्लाय आलेला नाही.

Good News: 'विवाह'फेम अमृता राव लवकरच होणार आई, बेबी बंपसह फोटो व्हायरल

कोण आहे रोहनप्रीत

Instagram

रोहनप्रीत सिंह हा देखील रिअॅलिटी शोमधून आलेला गायक आहे. सिंगिग स्टार 2 मध्ये तो रनरअप होता. त्याने आतापर्यंत अनेक गाणी गायली आहेत. नेहा कक्करसोबत लग्न करण्याच्या बातमीमुळे तोही अधिक चर्चेत आला. रोहनप्रीत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून त्याचाही फॅनबेस फार मोठा आहे. 


आता राहिला प्रश्न लग्नाचा तर नेहाने त्यांच्या रिलेशनशीपबाबत अनेक ठिकाणी दुजोरा दिला असला तरी लग्नाच्या बातमीबाबत अजूनही शंकाच आहे.