सोनम कपूरकडे आहे गोड बातमी, व्हायरल होतोय फोटो

सोनम कपूरकडे आहे गोड बातमी, व्हायरल होतोय फोटो

सोनम कपूर काही दिवसांपूर्वीच आपला पती आनंद आहुजासह लंडनवरून परतली आहे. त्यावेळी तिने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लंडनच्या तुलनेत भारतातील विमानतळावरील तपासणी आणि सुरक्षा किती चांगली आहे हेदेखील सांगितले. तसंच ती सध्या कशाप्रकारे सोशल डिस्टन्स घरातही आपल्या सासूसह ठेवत आहे याचा व्हिडिओ तिने शेअर केला होता. खाली घरात जाऊन भेटण्यापेक्षा ती खिडकीतूनच आपल्या सासूशी संवाद साधत असल्याचा व्हिडिओ तिने शेअर केला होता.  पण या व्हिडिओमुळे आता सोनम कपूरकडे गोड बातमी आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. सोनम कपूर गरोदर असून ती सध्या घरी आराम करत असल्याचं या फोटोवरून बोलले जात आहे. 

सोनमने घातलेल्या कपड्यांवरून काढला जात आहे अंदाज

सोनम कपूर अथवा तिच्या निकटवर्तीयांकडून अशी कोणतीही बातमी देण्यात  आलेली नाही. मात्र सोनम कपूरने जो व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि पायजमाम घातला आहे. हा शर्ट अतिशय ढगळ असून तिचे  बेबी बंप दिसत आहे. त्यामुळे सोनमने घातलेल्या कपड्यांवरून तिच्या चाहत्यांना असा अंदाज काढायला सुरूवात केली आहे. तिचा फोटोही सध्या व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये सोनम गरोदर असल्याचं जाणवत असल्याचं म्हटलं जात आहे. एका दुसऱ्या फोटोमध्ये सोनमने आपल्या एका मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्येही तिचे बेबी बंप दिसत आहे. मात्र सोनमने याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. 

रणबीर-आलियाच्या नात्याबाबत नेटीझन्समध्ये कुजबूज

शेवटच्या क्षणी घोषणा करण्याची शक्यता

सोनम कपूर गरोदर असल्याच्या अनेक बातम्या सध्या येत आहेत. पण अशी कोणतीही अधिकृत घोषणा मात्र सोनम कपूर अथवा आहुजा कुटुंबीयांकडून करण्यात आलेली नाही. सोनम कपूरने नेहमीच आपलं  खासगी आयुष्य खूपच खासगी ठेवलं आहे आणि अगदी आपल्या लग्नाची घोषणाही तिने लग्नाच्या काही दिवस आधी केली होती. त्यामुळे जर ती गरोदर असल्याची बातमी खरी असेल तर शेवटच्या क्षणी सोनम कपूर ही गोड बातमी शेअर करेल अशी तिच्या चाहत्यांना अपेक्षा आहे. सोनम कपूर ही बॉलीवूडमधील फॅशनिस्ता म्हणून ओळखली जाते. इतकेच नाही तर सोनम कपूर तिच्या बिनधास्त बोलण्यामुळेही प्रसिद्ध आहे. तिने आपली मतं नेहमीच परखडपणे मांडली आहेत. त्यामुळे तिला पत्रकारही बऱ्यापैकी घाबरूनच असतात. 

बिग बॉसच्या स्पर्धकाच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडे केली तक्रार

सध्या कोणत्याही चित्रपटात दिसली नाही

सोनम कपूर मागच्या वर्षी ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटात राजकुमार राव आणि वडील अनिल कपूर यांच्यासह दिसली होती. मात्र सध्या सोनम कपूर कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. तसंच तिने कोणताही चित्रपट अजून साईन केला आहे असे कळलेले नाही. सोनम सध्या पती आनंद आहुजासह मजेत आयुष्य घालवत असून लंडनहून आल्यापासून तिने self quarntine करून घेतले आहे. ती आपल्या सासूशीदेखील अगदी बऱ्यात अंतरावरून संवाद साधत आहे. त्यामुळे आता सोनम कपूर खरंच गरोदर आहे की काय अशी शंका प्रत्येकालाच वाटू लागली आहे. जर सोनम गरोदर असेल तर ही खरंच कपूर आणि आहुजा कुटुंबीयांसाठी आनंदाची गोष्ट आहे. शिवाय हे तिच्या चाहत्यांसाठीही खूप मोठं सरप्राईज असेल. आता सोनम कपूर ही गोड बातमी कधी घोषित करणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे. 

जय-वीरुची जोडी पुन्हा दिसणार पडद्यावर तेही मराठी चित्रपटात

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.