'या' बॉलीवूड अभिनेत्रीकडे पुन्हा एकदा गुड न्यूज

'या' बॉलीवूड अभिनेत्रीकडे पुन्हा एकदा गुड न्यूज

बॉलीवूड अभिनेत्री ईशा देओल दुसऱ्यांदा ‘आई’ होणार आहे. ईशाने सोशल मीडियावरुन तिच्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. ईशा आणि भरत तख्तानी या दोघांना राध्या नावाची एक गोड मुलगी आहे. ईशाने नुकतच तिच्या इन्स्टा अकाऊंटवरुन राध्याच्या एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर ‘आय अॅम बिईंग प्रमोटेड टू बिग सिस्टर’ असं लिहीलं आहे. अर्थांत राध्या मोठी ताई होणार आहे असं तिने शेअर केलं आहे. यावरुन ईशा देओल आणि भरत तख्तानीच्या घरी पुन्हा गुड न्यूज असण्याची शक्यता आहे. वयाच्या 37 व्या वर्षी ईशा पुन्हा प्रेगन्ट होणार आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

 

A post shared by Esha Deol (@imeshadeol) on


ईशा देओल आणि भरत तख्तानी 2012 मध्ये विवाहबद्ध


ईशा देओल आणि भरत तख्तानी  2012 मध्ये विवाहबद्ध झाले होते. लग्नानंतर पाच वर्षांनी त्यांनी राध्याला जन्म दिला होता. राध्या आता दिड वर्षांची आहे.हेमामालिनी कृष्णभक्त असल्याने ईशाने तिच्या मुलीचं नाव राध्या असं ठेवलं. ईशाने तिच्या पहिल्या डोहाळजेवणाचे फोटो आणि प्रेंगन्सीच्या सर्व बातम्या तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावरुन शेअर केल्या होत्या.डोहाळजेवणात ईशाने लाल रंगाचा लेंहगा घातला होता. ईशाची बहीण अहानाने तेव्हा तिच्यासाठी सरप्राईज बेबी शॉवर पार्टी आयोजित केली होती. या बेबी शॉवर पार्टीची थीम लव्हेंडर ठेवण्यात आली होती. कारण ईशाला लव्हेंडर रंग खूप आवडतो. या पार्टीसाठी ईशाने लव्हेंडर रंगाचा गाऊन घातला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. आता पुन्हा ईशा आणि भरत तख्तानी यांच्या घरी लवकरच बाळ होणार असल्याने त्यांच्या घरी आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. लवकरच ईशा तिच्या दुसऱ्या प्रेंगन्सीचे फोटो सोशल मीडियावरुन शेअर करण्याची शक्यता आहे.

isha deol


ईशा देओलचे चित्रपट


लग्नानंतर ईशाने चित्रपटातून काम करणं कमी केलं. यापूर्वी ईशाने ‘क्या दिल ने कहा’, ‘कुछ तो है’, ‘युवा’, ‘धूम’, ‘काल’, ‘नो एन्ट्री’, ‘टेल मी ओ खुदा’ या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच ईशाने तामिळ चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तिला ‘कोई मेरे दिल से पुछे’ या हिंदी चित्रपटासाठी उत्तम अभिनयासाठी फिल्मफेअर पुरस्कारदेखील  मिळाला आहे.


isha deol 1


ईशा अंबानीच्या लग्नाला ईशा देओल उपस्थित होती.


काही दिवसांपूर्वी ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या विवाहसोहळ्यात ईशा देओल तिच्या संपूर्ण कुंटूबासह उपस्थित होती. ईशा आणि आनंदच्या वेडींग रिसेप्शनमध्ये ईशाने पर्पल कलरचा लेंहगा घातला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होते.


isha deol 3


फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम