धडक' बॉय ईशान आणि स्टुंडंट अनन्या दिसणार एकत्र, फोटो केला शेअर

धडक' बॉय ईशान आणि स्टुंडंट अनन्या दिसणार एकत्र, फोटो केला शेअर

करणच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातील स्टार किड अनन्या पांडे हिचे नशीब सध्या चांगलेच फळफळले आहे. एका मागोमाग चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्स तिला सध्या येत आहेत. आता हाती आलेल्या माहितीनुसार ती आणखी एका चित्रपटातही लवकरच दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ‘धडक’ बॉय ईशान खट्टर असणार आहे. हो हे खरं असून अली अब्बास जाफरच्या ‘खाली पिली’ या चित्रपटात ते एकत्र दिसणार असून सध्या त्यांचा या चित्रपटातील एक लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

#BBM2 नंतर शिवानी सुर्वेची दुहेरी भरारी

दोघं पहिल्यांदाच करणार स्क्रिन शेअर

 ईशान आणि अनन्या यांनी या आधी कधीही एकत्र काम केलेले नाही. पहिल्यांदाच ते एकत्र स्क्रिन करणार आहे. अनन्या पांडेने करण जोहरचा 'स्टुडंट ऑफ द इयर' हा पहिला चित्रपट केला. तर इशान अनन्यापेक्षा या क्षेत्रात सिनिअर आहे. त्याने ‘धडक’ च्या आधी ‘बियांड द क्लाऊड’ नावाचा चित्रपट केला आहे. पण या दोघांनी कधीही म्हणजे कोणत्या जाहिरातीसाठीही स्क्रिन शेअर केली नाही. त्यामुळे आता ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

पहिला लुक होतोय व्हायरल

Instagram

ईशान आणि अनन्या यांच्या या चित्रपटाचे नाव ‘खाली पिली’ असून या चित्रपट अली अब्बास जाफरचा आहे. या चित्रपटातील सध्या व्हायरल होणाऱ्या गोष्टींबद्दल सांगायचे झाले तर यात त्यांचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. 'खाली पिली' असे नाव घेताना त्यांच्या या लुकमध्ये मागे काली पिली टॅक्सी पाहायला मिळत आहे. शिवाय या दोघांचा लुक या मध्ये रस्टी असलेला पाहायला मिळत आहे. ईशानने डेनिमचे स्लिवलेस जॅकेट घातले असून अनन्या हॉट शॉर्टमध्ये दिसत आहे. 

कधी होणार चित्रपट रिलीज

या चित्रपटाबद्दल कोणतीही अधिक माहिती देण्यात आलेली नाही. पण हाती आलेल्या माहितीनुसार हा चित्रपट म्हणजे एका रात्रीची गोष्ट आहे असे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचे सगळे शुटींग मुंबईमध्ये होणार असून ही जोडी धम्माल करणार आहे असे सांगण्यात येत आहे.  त्यामुळे आता यांच्या या धम्माल मस्ती आणि एका रात्रीच्या गोष्टीसाठी थोडी वाट नक्कीच पाहावी लागणार आहे. 

विशाल सिंगने सिद्ध केलं कलेला नसतं भाषेचे ‘बंधन’ 

पती पत्नी और वो मध्येही दिसणार अनन्या

Instagram

वर सांगितल्याप्रमाणे अनन्याकडे कामांच्या रांगा लागायला सुरुवात झाली आहे.  खाली पिली आधी तिला ‘पती, पत्नी और वो ’ या चित्रपटाची ऑफर आली. या चित्रपटाचे काम सध्या सुरु असून तिच्यासोबत या चित्रपटात  भूमी पेडणेकर आणि कार्तिक आर्यन दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच फ्लोअरवर येणार आहे. 

ईशान शाहीदच्याच पाऊलांवर

Instagram

ईशान खट्टर हा शाहीद कपूरचा सावत्र भाऊ आहे. पण या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर ते  बऱ्याचपैकी सारखेच दिसतात. शाहीदने बालकलाकार असल्यापासून कामाला सुरुवात केली आहे. डान्स हा शाहीदचा जीव आहे. तर ईशानच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. डान्स ही त्याची आत्मा आहे. जशी छाप शाहीदने चॉकलेट बॉय म्हणून निर्माण केली अगदी तशीच इमेज ईशानचीही झाली आहे. सावत्र भाऊ असून देखील ईशान आणि शाहीदचे नाते एकदम खास आहे. 


आता ईशान आणि अनन्याचा हा  नवा चित्रपट नेमका काय असणार यासाठी थोडी वाट पाहावी लागेल कारण पिक्चर अभी बाकी है….

आमीर खानची मुलगी इरा खान झाली विचित्र ड्रेसमुळे ट्रोल, फोटो व्हायरल